कविता

हसरतें..!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
11 Nov 2023 - 1:21 am

एका उदास संध्याकाली अचानक मोडक्या तोडक्या हिंदीत शब्द सुचायला लागलेत.. तसेच लिहून काढलेत.
मराठीकरण करायची गरज वाटली नाही. अर्थात् मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर बेलाशक धागा उडवावा.

उनके आनेंकी हसरत में हम ग़ली सजाते चलें गये..
वो घरसे, हमारे जानें की, तारीख बता कर चलें गये.

उनकें लिये दिल का हर कोंना सजाया था चिरागोंसे..
वो अंधेरेसे हमारी वफा की याद दिला कर चलें गये..

उनसे जी भर बातें करने की आंस लिये बैठे थे हम..
मौका ही न मिला, वो बिना बताये चलें गये..

शांतरसकविता

शूर्पणखा

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
26 Oct 2023 - 11:11 am

परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.

कवितामुक्तकभाषाआस्वाद

दसरा की शिमगा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
24 Oct 2023 - 10:24 pm

दसरा की शिमगा?

ते विचारांचे सोने
की टोमणे व रोने
काही दखल नेक?
नुसती चिखलफेक

जाळणार खोकेसूराची लंका
अपात्रतेचा निर्णय कधी, शंका

शिवाजी पार्क वि.आझाद मैदान
कुठे पडणार पुढचं मतांच दान?

मी काम करतो, जातो थेट साईटवर
ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर

गर्दी जमा ची रोजगार-हमी
नाहीतर आहेच जंगली रमी

मानसशास्त्र झूंडीचं
मिडीया बाईट धूंडीत

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण,
शिंदे सरकार देणार म्हणजे देणार
चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी
अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार?

कविता

सृष्टी माया

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
15 Oct 2023 - 1:28 pm

वाजे लडिवाळ घुंगूरवाळा
चरितसे गोजिरी कपिला |

धरती गळा फुलांच्या माळा
फुलपाखरांनी श्वास रंगला |

वाहे धीरगंभीर निर्झर निळा
नाद ,सृष्टी मंदिरा घुमला |

स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा
पाकळ्यांची बरसात रान सजला|

अवचित पावा वाजला सावळा
समाधी मनीची ,हरी हसला |

-भक्ती

कविता

....किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले....(प्रौढांसाठी :) )

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
14 Sep 2023 - 11:02 am

कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी..
=============================================================
किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत..
कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात..
विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात..
इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

कविता

हाक

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
10 Sep 2023 - 12:30 am

रानात आली कुणाची हाक
डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक

वळूनी बघता दिसे न कोणी
पाखरांच्या मुखी आली कशी गाणी

कसा होतो कळेना हा भास
प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस

दूर-दूर मी भांबावूनी पाहते
नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते

आला शिवारी दरवळत रानगंध
वेडावले मी झाली ही काया धुंद

माझी कविताकविता

कावळ्यांची फिर्याद -२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
8 Sep 2023 - 6:16 pm

कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.

संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....

पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.

कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.

लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
हिन कर्म,पाप त्याचे,शाप आपल्या माथी गेला मारूनी.

उकळीकैच्याकैकविताकवितामुक्तक

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Aug 2023 - 8:25 am

चांद्रयान

देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.

"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....

घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला

ट्रम्पफ्री स्टाइलमुक्त कवितारोमांचकारी.कवितामुक्तक

पावसाचं वय....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
16 Aug 2023 - 8:38 pm

मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?

भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?

मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?

उरात उर्मी,अंगात गर्मी
सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ
रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय
सांग ना रे पावसा तुझं काय वयं?

जीवनमनकवितामुक्तक

शपथ

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
15 Aug 2023 - 6:43 pm

धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥

सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे
रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते
कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥
एक सूर...

द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना
हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा
बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥
एक सूर...

स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता
विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता
अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥
एक सूर...

कविता