कविता

जिल्हे-ईलाही

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
11 Jun 2023 - 10:26 pm

बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी

खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक

तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।

कविता

बस्स! फक्त एवढंच कर...

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
1 Jun 2023 - 9:47 am

दिवस कसाबसा निघून जाईल
कातरवेळ मात्र अंगावर येईल
तू फक्त माझी सय काढू नको
"ती" आली तशी संपून ही जाईल

मग काही अबोल-अनाथ स्वप्ने
वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत
रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील
डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील

त्यांना अजिबात थारा देऊ नकोस
डोळे अगदी घट्ट मिटून घे
हात बाहेर न काढता आतूनच
निग्रहाने "ती" खिडकी बंद कर

मग मऊ केस झटकून जरासे
कुरळ्या बटांना मोकळं कर
सुकलेले ओठ घट्ट करून
पाठीला उशी लावून स्वस्थ बस

मुक्त कविताकवितामुक्तक

आजोळ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 May 2023 - 9:01 pm

आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ

मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ

पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या मागे
धरे सावली पोफळ

कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे

कधी नदीत डुंबणे
कधी नांगर धरणे
करवंदे तोडताना
काटे बोथटून जाणे

तान्ह्या पाडसांची शिंगे
चाचपडून बघणे
आठवडी बाजारात
निरुद्देश भटकणे

कविता

ना कर नाटक !

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
13 May 2023 - 7:10 pm

नफरत चा बाजारबंद,
म्हणाला तो सोनियानंद,
मोहबत की दुकाने खुली
नाही चालला बजरंगबली

अदानीची मोठी ताकद,
तर गरीबांची छोटा कद,
मोदी-शाह यांची जादू
स्वस्त, फूकट्यांचा बांबू

गरीबांना नको तो विकास
गॅससिलींडरने केला नाश
केरल स्टोरीचा ना असर
भाजप तू विजय विसर

कविता

कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
11 May 2023 - 6:01 pm

खोकेबाज धोकेबाज ।
इतरा म्हणत गद्दार!
स्वत: दिला पदभार।
सोडोनिया ।।

ठाकरेंनी जरी घातले,
सर्वोच्च कोर्टा साकडे,
पाऊल पडले वाकडे,
भलतेची।।

अननूभवी कुणी बनला ।
निवडणूकीस न उभारता।
मालमत्ता अर्ज न भरता।
मुख्यमंत्री।।

शाह- नानाने मात दिली।
भाज्यपाल जरी चूकले।
महाविकासआघाडी झूकली।
यामुळेचि।।

आत्मविश्वास अभाव?
अल्पमताची चाहूल?
कि अल्पमतीची हूल।
राजीनामा!!

बंडखोरांची ती सहल।
हाॅटेल डोंगर ती हिरवळ।
16अपात्र म्हणे झिरवळ।
योग्य होते?!

अभंगकविता

चाललोय....

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
9 May 2023 - 8:33 pm

काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या
पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट,
वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे

मुरवत चाललोय....

हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ
विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या
चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं

निरखत चाललोय....

देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ
सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव
नजरेतला नखरा, माळलेला गजरा

आठवत चाललोय....

मुक्त कविताकविता

||इदं न मम||

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
9 May 2023 - 12:31 pm

||इदं न मम||
भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना,
चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना,
उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना,
शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना,
डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये.
मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये.
हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने
अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे.
आणि तृप्तपणे म्हणावं,
इदं न मम|
इदं न मम|

कविता

जेल भरती

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
9 May 2023 - 9:05 am

https://www.lokmat.com/mumbai/during-the-ongoing-written-examination-in-...

पोलीस भरती आधी बेड्या?
अरे हे काय केलस रे वेड्या?!

भरती-पेपर मधे केलीस काॅपी
तुला तर घालायची होती खाकी!

पेन मधे ठेवले सिम
कानात उपकरण,
ही कसली रे थीम
हे काय प्रकरण?

अरे खुळ्या ते आहेत पोलीस
तू मात्र अक्कल ठेवली ओलीस

कविता

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
7 May 2023 - 12:30 pm

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी.

वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू
दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी.

दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती
नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.

पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे
आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी.

हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.

माझी कविताकविता

जोकशाही

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 May 2023 - 10:43 am

हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
सामान्यांच्या हाती
वाणसामानाची जंत्री

भाडोत्री बँडवाले अन्
भाड्याचे वाजंत्री
आकड्यांची कुतरओढ
लोक'शाई'ची जोकतंत्री

लोकल ला अजून लटकतात
ट्रॅफीकमधे अजून अटकतात
तरुण नोकरीसाठी भटकतात
शेतमाल दलाल अंग झटकतात

ह्याची वटवट की
त्याची खटपट
सिहासन चित्रपट कि
राष्ट्रपती लागवट?!

हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
जनतेला पडत नाही फरक.
त्यांना रोजचाच झालाय
समस्यांचा नरक !!

कविता