अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे
खिशाला फुटतात शंभर फाटे
तेवीस किलोत फक्त कपडे चार
आवांतर सामानाची गर्दीच फार
महिनाभर आगोदर येते यादी
म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी
बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी
वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी
कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई
रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई
म्हातार्याची वडवड,चश्म्याची वाट
पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ
सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी
काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी
तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट
म्हातार्याच्या नावानं फाडतीया तिकीट
पिझ्झा, बर्गर... आठवणीने,काटा आला
म्हातार्याचा आधार चकणा न प्याला.
आपलेच दात अन् आपलेच ओठ
आपलाच खिसा अन् आपलेच पोट
काय सांगू मित्रांनो.....
अम्रीकेच्या वारी,भेटे दुधावरची साय
मन पाखरू पाखरू,वारी वारी जाय.
काव्यरस
वाचने
5118
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहहा! थोडे काटे आम्हीही
असे काही नाही....
आ????
In reply to असे काही नाही.... by मुक्त विहारि
तुम्हाला समजेल, ह्याची अपेक्षाच नाही....
In reply to आ???? by अमरेंद्र बाहुबली
पायाला लागले होते तुमच्या असे
In reply to तुम्हाला समजेल, ह्याची अपेक्षाच नाही.... by मुक्त विहारि
आता तब्येत उत्तम आहे....
In reply to पायाला लागले होते तुमच्या असे by अमरेंद्र बाहुबली
तरीही काळजी घ्या! वेळच्या
In reply to आता तब्येत उत्तम आहे.... by मुक्त विहारि
माझ्या पेक्षा तुम्हाला गरज जास्त आहे...
In reply to तरीही काळजी घ्या! वेळच्या by अमरेंद्र बाहुबली
नथू? नको मग! :)
In reply to माझ्या पेक्षा तुम्हाला गरज जास्त आहे... by मुक्त विहारि
रचना आवडली
@श्रीरंग जोशी.
समजू शकतो
In reply to @श्रीरंग जोशी. by कर्नलतपस्वी
वारी म्हटल्यावर...
रचना आवडली.
झकास कविता तालात.
कविता आवडली
छान रचना, आवडली !!