कविता

निरोप

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
2 Jul 2023 - 8:52 pm

रस्त्यावरून या तू
चालू नकोस आता
निक्षून ती म्हणाली
हातात हात होता

(आला सुवास तोच
ती बैसता समीप
पण साठवू कसा तो
मन क्षुब्ध, हात कंप)

हळवे जुने तमाम
तू आठवू नको ते
कसलाच अर्थ नाही
उरला न जीव तेथे

नाही मी राहिले ती
तूही आता निराळा
वेड्या मनास लागे
वेडा निरर्थ चाळा

मैत्री असेल अपुली
भेटू अधूमधून
नजरेस मात्र ठेव
अपुल्या जरा जपून

नजरेत ना दिसू दे
ती ओल पावसाची
एकांत तो मनस्वी
ती रात्र मीलनाची

miss you!कविताप्रेमकाव्य

एकादशीची पहाट

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
29 Jun 2023 - 8:14 am

एकादशीची पहाट
विठ्ठलाकडे पाठ
फोटोफ्रेम मधे आठ
पांडूरंगा ।।

दर्शन घडू दे
पाऊस पडू दे
भक्ती जडू दे
चरणाशी ।।

वारकरी दहा लाख
कोरोना चा ना धाक
असेच आम्हा राख
विठूराया।।

टाळ मृदंग गजर
दिंड्या पताका हजर
नाचे,गाये, बाजीगर
जन्मोजन्मी।।

कविता

भोग

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
27 Jun 2023 - 8:48 pm

अंतरीचा ठाव माझ्या
अजून मी घेतोच आहे
अनंत जन्मांचे हे देणे
अजून मी देतोच आहे

वृक्ष छाया तापलेल्या
धरणीला देतोच आहे
पोळलेल्या हृदयावर मी
ती छाया घेतोच आहे

धीर देऊन भ्यालेल्यांना
मीही तरी भितोच आहे
अमृताच्या प्याल्यातूनही
विष मी पितोच आहे

इतरांची मी कीवच करतो
परंतु मीही तोच आहे
आयुष्याची शाई संपली
तरीही मी लिहितोच आहे

मरणाची मी वाट पाहतो
तरीही मी मरतोच आहे
जिंकिले जरी षड्रिपू तरी
अजून मी हरतोच आहे

कविता

मातीचे पाय

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
27 Jun 2023 - 4:11 pm

पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते

मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ

मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या

आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?

प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही

ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले

कविता माझीदृष्टीकोनमनकलाकवितासाहित्यिक

माया

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
26 Jun 2023 - 1:31 am

अस्पर्शित संध्याकाळ
घनव्याकूळ हे आकाश
मेघांना भिडतो वारा
तुटती थेंबांचे पाश

वाळूत गिरविली स्वप्ने
लाटांनी पुसली जाती
हलकेच उतरतो चंद्र
तिमिराच्या पंखावरती

क्षितिजाने सूर्याचा
मग हात घेतला हाती
अंबरात नक्षत्रांच्या
त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती

पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनात आठवते मग
आईची प्रेमळ माया

भावकविताकविता

वाट्या..

गवि's picture
गवि in जे न देखे रवी...
21 Jun 2023 - 5:14 pm

सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं..
गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं..

बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं..
नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं..

फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या..
उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या..

पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या..
आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या..

मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या..
पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून..
त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या..

कविता

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
21 Jun 2023 - 12:11 pm

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-for...

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....
कशी पडलीस आकर्षणा गं ?

गाजवून एमपीएससी चमत्कारा ग,
आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग

जरी जाहलीस वनाधिकारी ग,
नाही जाणले श्वापद विकारी ग

सावध हरिणी सावध ग,
करील कुणीतरी पारध ग

तुझी बुद्धी गेली वाया ग,
गेली कूजून सुंदर काया ग

कविता

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
15 Jun 2023 - 1:07 pm

सख्या रे...

प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला.

काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली. बघा केलेला शब्दच्छल आवडतो का?
-
-
जाऊ नको सखये,तशी तू
स्पर्शाने माखलेली..
म्हणतील कुठूनं आली
ही कोर डागाळलेली

धग तापल्या तनूची
जाळेल साऱ्या जगाला
म्हणतील लोक सारे
श्रावणात ग्रीष्म कोठुनी आला

उकळीजिलबीदुसरी बाजूदृष्टीकोनकवितामुक्तकशब्दक्रीडा

सख्या रे..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 Jun 2023 - 9:48 am

न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..

न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.

न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.

न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.

न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..

शृंगारकविताप्रेमकाव्य

चक्रीवादळ

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
13 Jun 2023 - 10:25 am

'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष
आमे तैयार छे, गुजरात दक्ष

पाकीस्तानातून भारतात,
बेकायदेशीर! नाही विजा,
आहे ना सोबत गडगडाट,
तेजाळ लखलखाट विजा!!

कडेकडेनेच निघून जा,
हा विनंती अर्ज
पीकपाणी नुकसान नको
फिटलं नाही कर्ज.

करु नको विस्थापीत,
नको उडवू घराचे पत्रे,
हवामान महासंचालक,
कशी वाचवावी लक्तरे?

कविता