चुक लक्षात येणे..... (शतशब्दकथा)
"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.
"ठीक…" क्रुरसिंह फुत्कारला
ते दहा दिवस निष्ठारामाने, गजांआडून कुत्र्यांना स्वतः जेवायला वाढले….
मृत्युदंडाच्या दिवशी निष्ठारामाला जेव्हा गजांपलीकडे कुत्र्यांच्या बाजूला ढकलण्यात आले, तेव्हा सर्व कुत्रे त्याला चाटू लागले,