सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

Primary tabs

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
16 Apr 2015 - 11:40 pm

(काही दिवसांपूर्वी, "How to take care of your wife" ह्या शीर्षकाचा एक लेख वाचला होता. त्या लेखाचा स्वैरानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी स्वानुभवाचे बोल देखील पेरले आहेत.

आपण आयुष्यात खुश राहू इच्छिता ?? –

हा घ्या गुरुमंत्र

आपापल्या बायकाना सदा खुश ठेवा ? कसे ? अगदीच सोपे आहे, खालील नियम पाळा म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ----------’ ह्याची गँरंटी.

१) बायकोला आवडेल असे काहीतरी करा म्हणजे तुमच्या खात्यात मार्क जमा होतील.
२) बायकोला आवडणार नाही असे काहीतरी केले तर तुमचे मार्क्स कमी होतील.
३) बायकोला जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही केलेत – सॉरी, नो मार्क्स फॉर दँट, ते तुमचे नवरा म्हणून कर्तव्यच आहे.

(कंसात तुम्हाला मिळणारे अथवा कमी होणारे मार्क्स दिले आहेत.)

घरातले नियम

- तुम्ही रात्री झोपण्यासाठी बिछाने घातलेत (+१)
- तुम्ही बिछाने तर घातलेत, परंतु चादरींना साजेश्या उश्या ठेवायला विसरलात (०)
- बिछान्यावरची चादर चुरगळलेली आहे (-१)

- तुम्ही बाजारात बायकोला हवी आहे ती वस्तू आणायला निघालात (+५)
- अगदी भर पावसात (+८)
- पण फक्त बीअर घेऊन परत आलात (-५०)

- रात्री काहीतरी शंकास्पद आवाज आला म्हणून झोपेतून उठून तो आवाज कोठून आला ते बघायला निघालात (०)
- काहीही शंकास्पद आढळले नाही (०)
- काहीतरी शंकास्पद वाटले म्हणून अर्धवट झोपेत तुम्ही काठीने ‘ते काहीतरी’ झोडपले (+५)
- ‘ते काहीतरी’ बायकोची आवडती मांजर होती (-५००)

सोशल गँदरींगमधले नियम

- संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (०)
- थोडावेळ तुम्ही बायकोबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका परिचीताशी गप्पा मारू लागलात (-२)
- त्या परिचिताचे नाव ‘टीना’ आहे (-५)
- टीना एका नाईट क्लब मध्ये डान्सर आहे ( -५०)

बायकोच्या वाढदिवसाचे नियम
(सुचना - वाढदिवस विसरलात तर पुढचे वाचायची गरज नाही, तुम्ही ‘वाचणार’ नाहीत, गँरेंटेड)

- बायकोला सर्वात आधी, प्रेजेंट देऊन विश केलं (०)
- बायकोला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलात (०)
- ज्या हॉटेलमध्ये बार नाही अश्या हॉटेलमध्ये नेलेत (+१)
- समजा हॉटेलमध्ये बार आहे (-५)
- हॉटेलमध्ये बारबाला देखील आहे (-१५)
- तिच्याबरोबर तुम्ही ‘चढती जवानी मेरी चाल मसतानी’ वर नाच केलात (घराचे दरवाजे तुम्हाला बंद)

सिनेमाला घेऊन जायचे नियम

- बायकोला तुम्ही सिनेमाला नेलेत (+२)
- तिच्या आवडीच्या हिरो-हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (+५)
- तुमच्या, अगदी ना-पसंत हिरो-हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (+८)
- तुमच्या आवडीच्या सिनेमाला नेलेत (-५)
- त्या सिनेमाचे नाव ‘मँडमँक्स – २’ असे होते (-२०)
- तुम्ही तिला ‘तो फॅमिली ड्रामा आहे’ असे खोटेच सांगितले होते (-५०)

खरेदीला जायचे नियम
- बायकोला खरेदीला नेलेत (० मार्क – विसरलात ? ते तर तुमचे आद्य कर्त्यव्यच आहे)
- बायको म्हणेल त्या दुकानात गेलात (०)
- “अगं तुला चपला घ्यायच्या आहेत ना ? मग ह्या कपड्यांच्या दुकानात काय आहे ?” (-५००)
- “अगं, तू हे जे बघते आहेस ना ते ‘झिरो’ साईजचे आहे” (-५००)
- “तुझ्यासमोर जे काही मांडले आहे ते बघ ना, दुसरीचे कशाला ओढतेस ?” (-५००)
- “मी ह्याला निळा रंग म्हणतो, तू त्याला, आकाशी म्हण, जांभळा म्हण की मोरपिशी म्हण, तो तुझा प्रश्न आहे” (-५००)
- “दीपिकाला जे शोभते ते तुला देखील शोभेल हा गैरसमज आधी काढून टाक” (-५००)

(तुमच्या) शरीरसौष्ठवाचे नियम
- तुमचे पोट सुटले आहे (-१५)
- तुमचे पोट सुटले आहे आणि ते आत घालण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करीत आहात (+१०)
- तुमचे पोट सुटले आहे आणि ते लपवण्यासाठी तुम्ही ढगळ पँट आणि शर्ट घालता आहात (-३०)
- तुम्ही तिला म्हणालात, “त्यात काय झाले, तुझे देखील पोट सुटले आहे” (-५०००)

संवादाचे नियम
- तिने विचारले, “मी जाडी दिसत्ये?” (-१०, तुमचे उत्तर काहीही असो, तुमचे मार्क्स कमी होणारच)
- तुम्ही उत्तर देताना आढेवेढे घेतलेत (-१०)
- तुम्ही विचारलेत, “कोठे?” (-१००)

- ती तिचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकल्यासारखे दाखवता आहात आणि चेहर्यावर साजेसे एक्स्प्रेशन्स देखील आहेत (०)
- तुम्ही सतत तीस मिनिटाच्यावर, वरीलप्रमाणे ‘ऐकता’ आहात. (+३०)
- तुम्ही सतत तीस मिनिटाच्यावर, टीव्हीकडे एकदा देखील न पाहता, वरीलप्रमाणे ‘ऐकता’ आहात (+५००)
- तिला तुमचे नाटक कळले आहे कारण तुम्ही घोरायला लागला आहात (-२०००)

- तिच्या माहेरच्या लोकांचे वर्णन तुम्ही तन-मन-धन अर्पून ऐकता आहात. (+५०)
- तिच्या माहेरच्या लोकांचे वर्णन ऐकता ऐकता भान हरपले, थोडक्यात झोपलात (-५००)
- तुमच्या माहेरच्या लोकांचे ‘गुणगान’ कपाळाला आठ्या घालून ऐकताय. (-५००)

तर काय मंडळी आहे की नाही एकदम सोप्पे !!

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 11:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणजे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी बायकोसमोर "प्रीटेंड" करणं मस्टं आहे तर. सच्चाई का जमानाही नही रहा. :(

आनन्दिता's picture

16 Apr 2015 - 11:57 pm | आनन्दिता

=)) धम्माल !!

स्रुजा's picture

16 Apr 2015 - 11:59 pm | स्रुजा

हाहा, आवडलं :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 12:04 am | श्रीरंग_जोशी

लै भारी.

आता याच्या विडंबनाची वाट पाहणे आले.

बॅटमॅन's picture

17 Apr 2015 - 1:10 am | बॅटमॅन

अगदी असेच्च म्हणतो.

मराठे's picture

17 Apr 2015 - 1:19 am | मराठे

अरेरे , 'सुखी वैवाहिक जीवनाचा' असं सांगून तुम्ही फक्त 'बायकोला कसं खुष ठेवाल' याचाच गुरूमंत्र दिला आहे. म्हणजे फक्त बायकांमुळेच वैवाहिक जीवन सुखी होत नाही असा छुपा संदेश तुम्ही इथे याठिकानी दिलेला आहे. याबद्धल समस्त विवाहीत म्हैलांतर्फे निषेध! आणि (बिच्चार्‍या) पुरूषांना खूष ठेवण्याचा गुरूमंत्र दिलेला नसल्यामुळे समस्त विवाहीत पुर्ष्यांतर्फेपन निषेध!

संदीप डांगे's picture

17 Apr 2015 - 7:15 am | संदीप डांगे

"पुरूषांना खुष ठेवायचं?"

चला काहितरीच काय, असं कुठं असतं काय?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 8:26 am | अत्रुप्त आत्मा

@ "पुरूषांना खुष ठेवायचं?"
चला काहितरीच काय, असं कुठं असतं काय?>> +++१११ खरच (का हो? ;-) )... मलाही जाणायचय कुठे कुठे काय काय कसं कसं असू शकत असं!?

खुषी प्रेमी :- आत्मू! ;-)

जुइ's picture

17 Apr 2015 - 1:59 am | जुइ

laugh

आज जेवण खूप छान बनवले होतेस (-५०) (कारण बाकीच्या दिवशी खराब असते का?)
काही बोल, जेव्हा रात्री तुझ्या हातचे जेवण जेवतो ना तेव्हाच बरं वाटतं बघ.! (संशयीत नजरेसहीत +१)
त्यादीवशी त्या शेजारणीने भाजी दीली होती तशी बनवायला जमेल का तुला? (जळजळीत कटाक्षासह -५००)
आज ब्युटी पार्लरला जाउन आलीस का गं? (गालातल्या गालात हास्यासहीत +१)
आज फीरायला जाउया, तुला एक साडी घेउया आणि मग बाहेरूनच जेउन येउ (+५०)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Apr 2015 - 6:47 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो ऎसे का फ़ॉर्मूले देऊन काही होते!!! प्रत्येक बाई वेगळी असते बहुतेक (कारण मला अनुभव फ़क्त आंमच्या चीरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी चा) आम्हाला पक्के माहिती आहे की आमची पकड़ एके सत्तेचाळीस वर असुदेत कितीही , घरी बसल्येय ती आमची महाबोफोर्स आहे!! पण गुलाम प्रेम बी लै करतात बायका आपापल्या नवर्यावर!!! म्हणुन

"भावसाहेब तो चिमटा असते पर आपल्या बैकु चा असते म्हणुन मजा बी येते"

जयन्त बा शिम्पि's picture

17 Apr 2015 - 8:31 am | जयन्त बा शिम्पि

१) बायकोच्या माहेरची मंडळी आली आहे , तुम्ही तोंडभरुन स्वागत केले ( ० गुण )
२) 'त्या ' माहेरच्या मंडळींना हॉटेलात नेले आणि झकास पार्टी दिलीत ( + ५ गुण )
३) त्यतल्या त्यात ' साल्याला ( सभ्य भाषेत शालकाला ) ' खुश केलेत ( + ५ गुण )
४) स्वागत करतांना , कपाळावर आठ्या पडल्यात ( - ५० गुण )
५) ' ती ' मंडळी येणार असे समजल्यावर , तुम्ही " ऑफिशियल टूर " काढून बाहेरगावी सटकलात , ( - ५०० गुण )

अशी ही यादी बरीच लांबू शकते, पण " दिलको खुश रखनेके किये ,गालीब , ये खयाल अच्छा है "

जेम्स बॉन्ड ००७'s picture

17 Apr 2015 - 9:00 am | जेम्स बॉन्ड ००७

च्च च्च च्च.. असं सरधोपट सरसकटीकरण णाही हो करता येत. आणि गुण प्लस/मायणस हे जे काही दिलं आहे त्याचा काही विदा आहे का? असल्यास द्यावा.

तसंही other things being equal हे फक्त microeconomics मध्येच असतं, प्रत्यक्षात अणेक फॅक्टर लक्षात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ..

बिछान्यावरची चादर चुरगळलेली आहे (-१)

आता इथेसुद्धा, चादर कधी चुरगळली आहे, का चुरगळलेली आहे, कोणी चुरगळलेली आहे यावर बरंच काही अवलंबुन असतं.
काही विवक्षित कारणांमुळे चादर चुरगळली असल्यास गुण प्लसही होतात असं Experts सांगतात. (विदा जालावर उपलब्ध आहे, स्वतः शोधावा).

तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा.

सुबोध खरे's picture

17 Apr 2015 - 9:04 am | सुबोध खरे

सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र
अजून गुरुजीनाच सापडलेला नाही मग तुम्ही काय वाटत फिरताय?

नाखु's picture

17 Apr 2015 - 9:14 am | नाखु

मानली तरी :
पुस्तकातली/जालावरची पाककृती प्रमाणे-जिन्नस पाहून करता येईल आणि त्यासूचनेबर हुकुम प्रमाणे-पद्ध्त केली तर रेशीपी यशस्वी व्हायची शक्यता ८०-९० % पर्यंतच जाते.

सुखी वैवाहिक जीवनाची रेशीपी इतकी साधी सरळ सोप्पी नाहिये हेच वास्तव.

पण " दिलको खुश रखनेके किये ,गालीब , ये खयाल अच्छा है " ह्याला +१

हा हा! जमलाय लेख!!मनापासुन लिहिल्यासारखा वाटतोय!!

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2015 - 11:07 am | टवाळ कार्टा

समस्त अनाहितांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 11:11 am | चुकलामाकला

:):):)

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 11:12 am | चुकलामाकला

:):):)

मेन आर फ्रॉम बार्स, एयान्ड विमेन आर फ्रॉम मॉल……
नावाचं पुस्तक काढू शकता, ह्या लेखावरून …।

बापरे इतके गुंतागुंतीचे असते का हे?

मी आणि हिलरी एक नियम अगदी कसोशीने पाळतो.सगळे महत्वाचे निर्णय मी घेतो आणि सगळे कमी महत्वाचे निर्णय हिलरी घेते.महत्वाचे निर्णय कोणते? राजनसाहेबांनी व्याजाचे दर कमी करावेत की नाही, भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगवान करायला जेटलींनी नक्की काय करावे, मोदींचे निर्णय बरोबर आहेत का वगैरे सगळ्या गोष्टी मी ठरवत असतो.आणि घरी इंटिरिअर कोणते करावे, फ्रिज कोणता घ्यावा, हॉटेलात जेवायला जायचे असल्यास कुठे जायचे, कोणती डिश ऑर्डर करायची असे कमी महत्वाचे निर्णय हिलरी घेत असते.

बाकी मी पट्टीचा खाणारा वगैरे नाही त्यामुळे कोणताही पदार्थ कसाही झाला तरी त्याविषयी मी अवाक्षरही काढत नाही. म्हणजे चांगला झाला असल्यास कौतुक नसले तरी चांगला झाला नसल्यास नावेही ठेवत नाही.पदार्थात मीठ कमी आहे की जास्त, तिखट बरोबर आहे का वगैरे क्षुल्लक गोष्टी विचार करण्यायोग्य नसतात असे माझे स्पष्ट मत आहे.त्यामुळे अशा गोष्टींवर माझ्याकडून एकही कॉमेन्ट आयुष्यात कधी होणार नाही.तसेच मोदींनी काय करायला पाहिजे, आआपचे काय व्हावे वगैरे गोष्टी क्षुल्लक असून त्यावर कॉमेन्ट करायची इच्छा हिलरीला होत नाही. चित्रपटाला चल म्हटले की ऑनलाईन तिकिटे काढायची आणि निमूटपणे जायचे एवढेच माझे काम. आपण कुठल्या चित्रपटाला जात आहोत, त्यात नक्की कोण हिरो-हिरवीण आहेत वगैरे गोष्टी माझ्या दृष्टीने क्षुल्लक असतात त्यामुळे त्यावर माझ्याकडून कधीच कुठलीच टिप्पणी होत नाही. म्हणजेच काय की मी तुझा गोष्टींमध्ये नाक खुपसणार नाही आणि तू पण माझ्या गोष्टींमध्ये काही बोलू नकोस असे धोरण असते.

सगळ्यांनी हा उपाय करून बघा म्हणजे वैवाहिक जीवन कसे बहरेल ते बघाच.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 9:13 pm | श्रीरंग_जोशी
How Much Trouble This Would Save You Lol

What Women Really Mean

Posted by Best Funny Videos on Friday, June 21, 2013

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Apr 2015 - 7:05 pm | माम्लेदारचा पन्खा

आमी बाईला रात्री वाड्याव घेऊन जायचो.. आनि तुमी हितं बाईसमोर लोटांगण घालायला लागलाय....

अजून तुमाला राजकारन कळलंच न्हाई म्हना की... भारताची प्रगती कशी आन कधी व्ह्यायची???