मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन

..

प्रमोद देर्देकर ·
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे!

कार्टी काळजात घुसली

समीर_happy go lucky ·
कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक) प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे. कहाणी: कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रय

मन्या आणि डावक्या

सिरुसेरि ·
मन्या आणि डावक्या ============== मन्या आणि डावक्या दोघं एकाच शाळेमध्ये , एकाच इयत्तेत शिकत होते . दोघांचे वर्ग तेवढे वेगळे होते . शाळेला जाण्या येण्याच्या बसमध्ये हे दोघे कायम एकत्र असत . त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती . तसे बघायला गेले तर डावक्याचे खरे नाव "रवीकिरण" असे होते . पण त्याच्या वर्गामध्ये तो एकटाच डावखुरा होता . त्यामुळे वर्गातील इतर मुलांनी त्याचे नाव "डावरया" पाडले होते . तेच पुढे बदलत बदलत "डावक्या" असे झाले होते . आज मधली सुट्टी संपल्यानंतर मन्याच्या वर्गात गणिताचा तास होता . सरांनी काही गणिते सगळ्या मुलांना सोडवायला दिली होती .

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

खुर्ची

सस्नेह ·
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस. दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त. कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

गंगाधर मुटे ·

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.