राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
4 Jan 2016 - 2:13 pm

(फोटो नोकिया ६३० मोबाइलचे.)

१) पत्रक

२ ) वेगळ्या कोनातून मनोरा

३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-

४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-

५ ) कैलास्पतीचे फळ

६) चेंडुसारखं फूल

७) एक फूल

८) याच झाडाचं फूल आफ्रिकेतल्या महाकाय झाडाचा हा छोटा अवतार.

९) अशोकाच्या जातीतले झाड ऊर्वशी आणि त्याचा गुच्छ.झाड हरिणांच्या कुंपणाच्या आत असल्याने जवळ जाता नाही आलं नियमाने.

१०) पर्जन्य वृक्ष-याने खूप जागा व्यापली आहे.

११) शिवणचे फूल

१२) एक फुलपाखरू

फुलांच्या प्रदर्शनाचा शोध घेताना एक बातमी दिसली - राणीचा बाग भायखळा येथे तीन तारखेस रविवार सकाळी नेचर वॅाक होणार आहे.दुसरं काहीच काम नसल्याने साडे आठलाच हजर झालो.दिलेल्या वेळेवर नऊला चाळीसजण जमले आणि Tree Appreciation Walk या ग्रुपतर्फे उषा यांनी तीन तास पंचवीस एक वृक्षांची माहिती दिली.इथली बरीच झाडे आफ्रिका/द अमेरिकेतली आहेत.झाडे आणली पण फुलांच्या परागीभवनातून फळ बनायला लागणारे खास कीटक नसल्यामुळे काहींना फक्त फुलेच येतात.फळ नाही धरत.उंबर जातीच्या प्रत्येक झाडासाठी वेगळा कीटक लागतो त्याबद्दलच्या लेखाबद्दल सांगितलं जगदीश याने

असे काही कार्यक्रम आपणही करुया अथवा अथवा असं करणारे आपल्या भागातले शहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व दोन्ही साध्य होईल नाही का?

संदर्भ १ ) सहा वर्षांपुर्वी महानगरपालिकेने इथली झाडे तोडून ती जागा "विकसित" करण्याचा आराखडा आणला होता त्याला विरोध करण्यात यश मिळवले त्या ग्रुपबद्दल इथे- http://saveranibagh.org/ourStruggle.php २ ) नेचर वॅाक करणारा ग्रुपचे फेसबुक ग्रुप पेज TAWMumbai ३) अंजीर,वड ,पिंपळ इत्यादी focus पद्धतींच्या झाडांचे फळ तयार होण्यासाठी फुलांचे परागीभवन वेगवेगळे कीटक करतात.त्याविषयी लेख रविवार ३ जानेवारीच्या Indian Express पेपरात आला होता-- http://epaper.indianexpress.com/682553/Indian-Express-Mumbai/03-January-...

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Jan 2016 - 2:25 pm | कंजूस
सर्वसाक्षी's picture

4 Jan 2016 - 2:34 pm | सर्वसाक्षी

हा कूटसंदेश आहे का? की मलाच पडद्यावर काही दिसत नाहे?

सतिश पाटील's picture

4 Jan 2016 - 2:39 pm | सतिश पाटील

काही दिसत नाही ब्वा

कंजूस's picture

4 Jan 2016 - 2:47 pm | कंजूस
कंजूस's picture

4 Jan 2016 - 2:48 pm | कंजूस
कंजूस's picture

4 Jan 2016 - 2:49 pm | कंजूस
तुषार काळभोर's picture

4 Jan 2016 - 2:59 pm | तुषार काळभोर

कळलं.
पुढे काय?

;)

सॅारी माझा लेख (राणीच्या बागेत---) फक्त नाव नोंदले गेले आहे पण लेख अपलोड होत नाहीये error- website encountered unexpected वगैरे.नंतर करून पहातो

सूड's picture

4 Jan 2016 - 6:30 pm | सूड

काहीही दिसत नाहीये

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2016 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार

सर्व फोटो आवडले. पण फक्त ९च फोटो का बारा अपलोडवले?
राणीच्या बागेत बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत.
या निमित्ताने नुलकरकाकांनी काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेतल्या विविध प्रकारच्या झाडांवर लिहिलेला लेख आठवला.

पैजारबुवा,

सुधांशुनूलकर's picture

5 Jan 2016 - 10:09 am | सुधांशुनूलकर

जिजामाता उद्यान कट्ट्याचा दुवा टाकल्याबद्दल.. (इथे सविस्तर लिहायचे कष्ट वाचवलेत, म्हणून)

@कंजूस : फोटो आवडले.
आता उद्यानाला लवकरच भेट देणं आलंच..! कदाचित येत्या रविवारी (१० तारखेला)
कुणी तयार आहे का?

जाणे नक्की होत असेल तर मी येते आहे.

नाखु's picture

5 Jan 2016 - 9:53 am | नाखु

फोटु दिसेना ,धागा कळेना

नाखु खंत करी,जेपी काही केल्या बोलेना....

बाकी नाम माखु

राणी बागेचं आताचं पुर्वीचं प्राणि संग्रहालय हे महत्त्व जाऊन फक्त वनस्पती उद्यान राहिलं आहे.फोटो आणखी बरेच टाकता येतील परंतू इतरांनाही काही काम हवं ना?पंधराच्या वर फोटो गेले की मोबाइलवाले ओरडतात धागा उघडत नाही.

कंजूस's picture

5 Jan 2016 - 10:42 am | कंजूस

पुढच्या महिन्यात BMC FRUIT FLOWER TREE SHOW असणार आहे ( बहुतेक १४-१६ फेब्रु) तेव्हा जाणार आहे.त्यावेळी मिपाकर ठरवून आले तर कट्टा + प्रदर्शन दोन्ही कामं होतील.

माहितगार's picture

5 Jan 2016 - 10:49 am | माहितगार

नेचर वॅाक + Tree Appreciation Walk
शहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व

कल्पना मस्तच आहे, वनस्पतींबद्द्ल फारशी माहिती नसलेली पण औत्सुक्य असलेली बरीच मंडळी असतील, अर्थात फुकट करावयाचे म्हटले की केव्हातरी उत्साह मावळण्याची शक्यता असते, या विषयातील जाणकारांनी 'नेचर गाईड' सारखा व्यवसाय म्हणूनही सुरु करण्यास हरकत नसावी. शाळा महाविद्यालयांचा विद्यार्थीवर्गही कदाचित ग्राहक म्हणून उपलब्ध होऊ शकेल.

लेखात संदर्भ वाढवला आहे.उदा० सेव रानीबाग साइट आणि नेचर वॅाक करणारा ग्रुप /फेसबुक पेज.

नेहमीप्रमाणेच फोटो दिसत नाहीयेत.

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 6:44 pm | दिपक.कुवेत

विशेषत मनोर्‍याचे

प्रचेतस's picture

5 Jan 2016 - 6:53 pm | प्रचेतस

सुंदरच.
अशी अजस्त्र झाडे भीमाशंकरच्या जंगलात पाहिली आहेत. असाच एक कुठला तरी अतीप्रचंड वृक्ष मेणवलीच्या नाना फडणवीसांच्या वाड्याच्या पुढ्यात आहे.
मनोर्‍याचं प्रवेशद्वार बघताना का कोण जाणे पण चैत्यकमान आणि गवाक्षांचा भास होतोय.

पद्मावति's picture

5 Jan 2016 - 10:01 pm | पद्मावति

सुंदर फोटो. मनोरा सकाळच्या उन्हात फारच छान दिसतोय.

नंदन's picture

6 Jan 2016 - 4:11 am | नंदन

फोटो आवडले. कल्पना छान आहे ही, एकदा जायला हवं.

यशोधरा's picture

7 Jan 2016 - 8:12 pm | यशोधरा

मस्त फोटो. अजून सविस्तर वर्णनही आवडले असते.

पैसा's picture

12 Jan 2016 - 6:09 pm | पैसा

झकास फोटो! ही झाडे पाडून कसला विकास करणार होते ते कर्माचा?