Skip to main content

रेखाटन

दसरा - एक छोटीशी कथा

लेखक स्वलिखित यांनी शुक्रवार, 30/09/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कर्णपुर्याची यात्रा तशी छान वाटली. आज दसर्याच्या दिवशी गर्दीला ऊत आला होता. चार मित्रांसोबत यात्रेत फिरन्याची मजा काही ओरच. लाल निळ्या पिवळ्या ट्युबच्या उजेडाने तो परिसर जनु इंदधनुष्याचा प्रकाश पडावा असे वाटत होते. पारदर्शक मोरपिसतुन पडनार्या प्रकाशा प्रामने यात्रा वाटली, भरपुर गोश्टींचा आनंद लुटला. मंदिरात देवीचं दर्शन घेतल आणि बाहेर पडण्यसाठी मार्ग शोधला. तिथेच एक आजी आजच सोनं विकत होत्या. पाहुन नवल वाटलं. औरंगाबाद सारख्या शहरातही आजकाल आपट्याची पानं विकली जावित याचच काय ते नवल!! आता औरंगाबादही ईतर शहरांसोबत मोजलं जानार याचं दुख:ही झालं. वीस रुपयाला दोन फांद्या विकत घेतल्या.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

काही ठिकाणे आणि माझ्या आठवणी -१

लेखक औरंगजेब यांनी बुधवार, 24/08/2016 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
०१: ब्राम्हण सोसायटी -ठाणे ब्राम्हण सोसायटी हा भाग गोखले रोड आणि महात्मा गांधी रोड ह्यांच्या कत्रीतला भाग . ह्या भागाची आठवण म्हणजे माझी खेळ-शाळा, चिमणी पाखरे मंदिर चिमणी-पाखरे हि बघायला गेला तर माझी पहिली शाळा. सकाळी ९ ते ११ . एकाच वर्गखोली. एका बाजूला घसरगुंडी. म्हणजे वर्गातच. दुसरे ठिकाण म्हणजे फडके बाईंचा चित्रकला क्लास. त्यावेळी आजच्या कर्वे हॉस्पिटल च्या बाजूला २ इमारती सोडून फडकेंचा वाडा होता त्या फडके बाई आमच्याच सरस्वती शाळेत बाळ वर्गाला शिकवायला होत्या त्या चित्रकला क्लास घ्यायच्या घरी . झोपडी , बगळा , होडी , आणि अशा इतर अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आहेत.

एक होते कारतुस.......योद्धयाची गाथा !

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शुक्रवार, 05/08/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
"कारतुस" साहेबांची गाथा स्वतःच्या अपंगत्वावर मात करत आयुष्यात हुकुमी एक्के होणारी माणसे मला तुफान आवडतात, कारण त्यांच्यात ठासून भरलेले असते एक रसायन, त्याचे नाव म्हणजे "फायटिंग स्पिरिट", स्टीफन हॉकिंग ते ऑस्कर पिस्टोरीअस, ते अनाम असे भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू, हे योद्धे चहूबाजूला दिसतात, पण आज आपण एका वेगळ्याच क्षेत्रात चमकलेल्या हिऱ्याची गाथा पाहणार आहोत, क्षेत्रही साधेसुधे नाही, तर भयानक जास्त शारीरिक कष्ट ही गरज असलेले, म्हणजेच आपले थलसैन्य उर्फ इंडियन आर्मी. समजा जर तुम्हाला म्हणले की एक पाय नसलेला माणूस आर्मी मध्ये होता अन मोठ्या हुद्यावर होता तर आपली प्रतिक्रिया काय असेल?

आठवण

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 04/08/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला, पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला, गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!

मनातले माझ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी रविवार, 26/06/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी आज आशेचा किरण शोधु लागले.......
काव्यरस

मला त्या गावी जायचेय...

लेखक हृषिकेश पांडकर यांनी सोमवार, 13/06/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी... स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी.. श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी.. महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा.. मला त्या गावी जायचेय... उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल.

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 02/06/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते. ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.

स्वप्नातली शामली

लेखक दिनु गवळी यांनी बुधवार, 01/06/2016 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण आता येतच नाही , समजावलय मी या वेड्या मनाला. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे, पण या काळजावर दगड ठेवला .. तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला , मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला. तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे. पण हळुहळु ती काजळ फिकी पडली. आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार. तुझ्या विना खरचं मी काहीच नाही . पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे. तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे. ( स्वप्नातली शामली)

चलती का नाम…पॉम पॉम

लेखक अश्विनी वैद्य यांनी मंगळवार, 31/05/2016 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
"चला रे लवकर…अकरा वाजून गेलेत…बारा पर्यंत पोहोचायचंय ना…त्यात traffic असणार…म्हणजे अजून वेळ लागणार…आवरा आता…" नवऱ्याची ही नेहमीची घाई माझ्या अंगवळणी पडलेली. "अरे जेवायलाच जायचंय ना xxx च्या घरी… पोहोचलो १०-१५ मिनिटं उशीरा तर एवढं काय…मुलांचं आवरून निघेपर्यंत इतके तर वाजणारच ना…त्यात आज रविवार….सकाळी उठण्यापासून सगळ्यांचं सगळंच निवांत…आणि त्यांना पण कुकायला जरा वेळ मिळू दे की…" खांद्याला मोठी bag लटकवून लेकाला कडेवर घेवून पायात शूज अडकवत माझा जरा चिडकाच स्वर लागला.