Skip to main content

रेखाटन

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

धोतर आणी डबा २

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 12/04/2015 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
पोटच्या खळगीसाठी मी शहरात उतरलो शहराच्या वैभवात पार हरवुन गेलो मॉल थिएटर हॉटेलमध्ये सकाळ सरली अचानक पोटातुन माझ्या कळ आली भविष्याच्या कियेची जाणीव तिथे झाली 'त्या' जागेची मागणी तत्परतेने केली सुलभ सुविधा फारच असुलभ होती पाय ठेवण्याचिही तिची लायकी नव्हती मनातला आवेग बाहेर पडु लागला उत्कटता जशी प्र्ेयसी शोधे प्र्ीयकराला अंधारमय भविष्य माझे समोर दिसले थकलेले घामेजलेले पाय थरथरु लागले समोरुन एका बसला जाताना पाहिले उरलेले बळ क्षणात गोळा केले पकडताच बस कंडक्टने मला उतरवले भयानक गर्दिचे कारण पुढे केले गेले चालत जावुन शेवटी स्टॅंड गाठले जागेसमोरील गर्दि पाहुन मन हबकले कुलुपाची चावी त्यांच्याक

आसवांच्या प्रतिबिंबात

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 09/04/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
चेहयावरचे कापड न हटविण्यास सांगितले म्हणुन आसवांच्या प्रतिबिंबात त्यास पाहिले रक्ताळलेला पोराचा हात हाती घेतला टाहो माझा आभाळ छेदुन गेला हुतात्मांच्या नावात एकाची भर होती युद्धाच्या अग्निकुंडाने पोराचीही आहुती घेतली खांदयावर माझ्या सुनेने हात ठेवला अभिमानाने चेहरा होता प्रफुल्लित झालेला "इथे समोर त्यांचे पदक लावेन आयुष्यभर मी त्यातुन त्यांना पाहेन" "एका पदकासाठी मी पोराला गमावले लाखोंच्या बळीतुन कोणी काय साधले? अव्याहत प्रवास हा का आरंभला बलिदानाचा सोहळा दोन दिवस चालला" "व्यक्तिसापेक्षतेची इथे अपेक्ष्ाच नसते परि पदसापेक्षतेला अनेक मुजरे झडले"

दोन कंडक्टर्स

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 11/03/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आयुष्यात लोकल्स, बेस्टच्या बसेस, रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका चांगला असल्यामुळेच मुंबईला दिवस रात्र काम करता येतं. कधी न झोपणारे शहर अशी बिरुदावली मिरवता येते. या सोयींच्या भरोशावरच मुंबई, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यांना व्यापणाऱ्या पट्ट्यात लोक घर आणि व्यवसाय निवडतात, रोज ये जा करतात. या सगळ्या सेवा पुरवणार्यांमध्ये सर्वात कठीण परिस्थिती असते ती बेस्टच्या कर्मचाऱ्यांची. कारण ट्राफिक जामचा सामना त्यांनाच रोज करावा लागतो. रिक्षावाल्यांना जसं हवं तेव्हा, हवं तेवढंच काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, तसं त्यांना मिळत नाही.

Son's Drawing and Writing @ Age of 2 to 4

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 27/01/2015 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या मुलाची चित्रकला व लेखनकला. तो साधारण एक सव्वा वर्षाचा असल्यापासून त्याला एबीसीडी, शेप्स, कलर्स ओळखू येऊ लागले. मग हळूहळू २र्या वर्षापासून स्पीच, एबीए थेरपीस्ट यांच्याबरोबर खेळताना चित्रकला हा एक मुख्य पूल झाला संवादाचा. तेव्हापासून मुलाला चित्रकला , लिहायला खूप आवडते. त्याला जेव्हापासून लिहून दाखवले तर आईला कळते लवकर हे समजले, तेव्हापासून तर अजुन मजा येऊ लागली. अर्थात तो खूप लिहीत नाही. तो आठवड्या-२ आठवड्यातून एखादा शब्द लिहीत असेल. मला त्याला कितीही इच्छा झाली तरी लिहीण्यासाठी फोर्स करायचे नाही. तो मनाने, स्वतःहून लिहील तेव्हाच त्याला त्यात मजा वाटेल.

"ती" दोघं

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 26/12/2014 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
.. महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती. हो, शब्दश: चुळबूळ. खाद्यांवरून आलेल्या ओढणीशी चुळबूळ. पाठीमागून कंबरेपर्यंत आलेल्या केसांशी चुळबूळ. कधी कानाला लटकलेल्या झुंबराशी चाळा, तर कधी हातामधल्या पर्सची उघडझाप. तिथे काहीच न करता उभे राहताना येणारा बावरलेपणा सावरण्याच्या नादात तिची ही धांदल उडत होती. पर्स हाताळण्याची पद्धतही अशी की जणू पहिल्यांदाच पर्स वापरत असावी.

कारुण्य टंकन

लेखक निराकार गाढव यांनी शनिवार, 25/10/2014 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु

निरवतापाची जत्रा

लेखक निराकार गाढव यांनी रविवार, 12/10/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.