मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

प्रीतमाळ

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
हृदयात गुंफूनी हृदय होई एक जीव ही प्रीतमाळ ओवूनी मांडू नवा डाव आले सर्व सोडूनी उरली न भीती युगायुगांचा आता तूच रे सोबती रूप तुझे मी डोळ्यांत गोंदले  नक्षीदार सावल्यानी ऊन झाकून गेले घेऊनी हाती तू माझ्या हातांना ओंजळीत भरल्या मोगऱ्याच्या गंधखुणा सांज फुलून येता जावू फुलांच्या गावी   चालता चालता वाट नक्षत्रांची व्हावी

कर जरा कंट्रोल...! :-)

चलत मुसाफिर ·
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला? शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम बिघडले कोठे

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

निरोप

चलत मुसाफिर ·
काव्यरस
रस्त्यावरून या तू चालू नकोस आता निक्षून ती म्हणाली हातात हात होता (आला सुवास तोच ती बैसता समीप पण साठवू कसा तो मन क्षुब्ध, हात कंप) हळवे जुने तमाम तू आठवू नको ते कसलाच अर्थ नाही उरला न जीव तेथे नाही मी राहिले ती तूही आता निराळा वेड्या मनास लागे वेडा निरर्थ चाळा मैत्री असेल अपुली भेटू अधूमधून नजरेस मात्र ठेव अपुल्या जरा जपून नजरेत ना दिसू दे ती ओल पावसाची एकांत तो मनस्वी ती रात्र मीलनाची वळुनी न पाहताही तत्काळ ती निघाली मी आर्त, स्तब्ध, सुन्न दाटून रात्र आली --- झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून (टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)

छाट्या

अहिरावण ·
लेखनविषय:
प्रेरणा : ओळखा पाहू गावोगाव हिंडून दारोदार भिक्षा मागतांना कुणी दान दिलेल्या कुणी फेकून दिलेल्या कुठून कुठून मिळवलेल्या गोळा केलेल्या सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी छाट्या आज वाटून मोकळे होऊ उद्या मोकळे होऊ म्हणता म्हणता दिवस सरता सरता अजुन एक भर पडून नीट घडी करुन, जपून ट्रंकेत ठेवलेल्या याने दिलेली त्याने दिलेली अन ती छाटी तर...

सख्या रे..

प्राची अश्विनी ·
काव्यरस
न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..

(अगं, जे घडिलेचि नाही)

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला) पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला ! - शृंगाररात्री _ अवघड शब्दांचे अर्थ : १. चत्वारि - चार २. सप्तम भोग : अष्टभोगांतील सप्तम अर्थात शय्या - मऊ बिछाना सुगंध वनिता वस्र गीत तांबूल भोजनम् !शय्या च कुसुमं चैव भोगाष्टकमुदाहतम् ! ३.

मनात माझ्या

किरण कुमार ·
तुझ्या बटांतून अवखळ वारा छेदित जातो सळसळ पाने मनात माझ्या तुझ्या ओठीचे अल्लड आणिक अचपळ गाणे नदी वळावी कटी पाहूनी ओठांवरती लाली नभाची मनात माझ्या कवेत घ्यावी मोहक मूर्ती तुझ्या तनाची फिकेच पडती सागर येथे इतुके चंचल नयनी पाणी मनात माझ्या खोल आतवर तुझ्या प्रीतीची अबोल वाणी सुरेख बांधा घट्ट कंचुकी पदर जरीचा त्यावर तारे मनात माझ्या चुंबून घ्यावे पाठीवरचे कोंदण प्यारे लाखेचे ते चढवूनी कांकण साद कशाला नुपूर पदांना मनात माझ्या इथे टिपावे तुझ्या खोडकर खेच अदांना घरा घरातून दर्प सुटावा देह तुझा की आहे अत्तर मनात माझ्या प्रश्न कितीसे तूच त्यावरी होशी उत्तर गाभाऱ्यातील देव मनाचे

नको ना रे

पाषाणभेद ·
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको