Skip to main content

प्रेमकाव्य

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.

दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.

पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्‍या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले

नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
समृद्धतेचे प्रतिक की अडगळ?
दुसरा प्राध्यापक उत्तरला
अर्थात अडगळ!

प्रीतमाळ

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 20/09/2023 09:42 या दिवशी प्रकाशित केले.

हृदयात गुंफूनी हृदय होई एक जीव
ही प्रीतमाळ ओवूनी मांडू नवा डाव

आले सर्व सोडूनी उरली न भीती
युगायुगांचा आता तूच रे सोबती

रूप तुझे मी डोळ्यांत गोंदले 
नक्षीदार सावल्यानी ऊन झाकून गेले

घेऊनी हाती तू माझ्या हातांना
ओंजळीत भरल्या मोगऱ्याच्या गंधखुणा

सांज फुलून येता जावू फुलांच्या गावी  
चालता चालता वाट नक्षत्रांची व्हावी

काव्यरस

कर जरा कंट्रोल...! :-)

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 21/07/2023 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू
कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू

मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी
तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी

राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे
लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे

फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले
चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले

ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो
एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो

नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला
बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला?

शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे
माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेर्ना - मातीचे पाय

पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते

मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल

मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या

अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?

प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि

काव्यरस

निरोप

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 02/07/2023 20:52 या दिवशी प्रकाशित केले.

रस्त्यावरून या तू
चालू नकोस आता
निक्षून ती म्हणाली
हातात हात होता

(आला सुवास तोच
ती बैसता समीप
पण साठवू कसा तो
मन क्षुब्ध, हात कंप)

हळवे जुने तमाम
तू आठवू नको ते
कसलाच अर्थ नाही
उरला न जीव तेथे

नाही मी राहिले ती
तूही आता निराळा
वेड्या मनास लागे
वेडा निरर्थ चाळा

मैत्री असेल अपुली
भेटू अधूमधून
नजरेस मात्र ठेव
अपुल्या जरा जपून

नजरेत ना दिसू दे
ती ओल पावसाची
एकांत तो मनस्वी
ती रात्र मीलनाची

काव्यरस

छाट्या

लेखक अहिरावण यांनी गुरुवार, 22/06/2023 14:24 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा : ओळखा पाहू

गावोगाव हिंडून
दारोदार भिक्षा मागतांना
कुणी दान दिलेल्या
कुणी फेकून दिलेल्या
कुठून कुठून मिळवलेल्या
गोळा केलेल्या
सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी
छाट्या

आज वाटून मोकळे होऊ
उद्या मोकळे होऊ
म्हणता म्हणता
दिवस सरता सरता
अजुन एक भर पडून
नीट घडी करुन,
जपून ट्रंकेत ठेवलेल्या
याने दिलेली
त्याने दिलेली अन
ती छाटी तर...
आठवणींची मोरपिसे
हळुवार उलगडून
हुळहुळत निश्वास
सोडायला लावणा-या
छाट्या

सख्या रे..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 14/06/2023 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..

न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.

न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.

न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.

न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..

काव्यरस

चांदणचुरा !

लेखक फिझा यांनी बुधवार, 05/04/2023 04:26 या दिवशी प्रकाशित केले.

चांदणचुरा !

प्रेम एकदाच होतं आयुष्यात !
त्या नंतर उरते ती
फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स !

भरती ओहोटी ने कोरडे झालेले
ते डोळे पुसून घ्यायचे ,
उसवलेलं पुन्हा विणून घ्यायचं ,
तू नाहीयेस इथे म्हणून
चंद्राची समजूत काढायची ,
झोंबणाऱ्या गार वार्याला
मिठीमध्ये सामावून घ्यायचं ,
बरंच काही सांडलेले
पुन्हा गोळा करून चालत राहायचं !

हूर हूर लावणारी ती रोजची निःसंग संघ्याकाळ
एकदा पार पडली, कि मग सारं आलबेलच !

(अगं, जे घडिलेचि नाही)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 03/04/2023 14:05 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही

एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला
चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला)

पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले
सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले

अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला
गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला !

-
शृंगाररात्री

_

मनात माझ्या

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 11/01/2023 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या बटांतून अवखळ वारा
छेदित जातो सळसळ पाने
मनात माझ्या तुझ्या ओठीचे
अल्लड आणिक अचपळ गाणे

नदी वळावी कटी पाहूनी
ओठांवरती लाली नभाची
मनात माझ्या कवेत घ्यावी
मोहक मूर्ती तुझ्या तनाची

फिकेच पडती सागर येथे
इतुके चंचल नयनी पाणी
मनात माझ्या खोल आतवर
तुझ्या प्रीतीची अबोल वाणी

सुरेख बांधा घट्ट कंचुकी
पदर जरीचा त्यावर तारे
मनात माझ्या चुंबून घ्यावे
पाठीवरचे कोंदण प्यारे

लाखेचे ते चढवूनी कांकण
साद कशाला नुपूर पदांना
मनात माझ्या इथे टिपावे
तुझ्या खोडकर खेच अदांना