Skip to main content

अगा जे घडिलेचि नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 25/03/2023 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी- दुसर्‍या प्रहरी- नेत्र उघडता तिसरा मितीत चवथ्या- झालो दाखल -(खतरा होता जबरा) पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली अष्टसिद्धी नवविधा भक्तिच्या चरणी शरण जव गेल्या अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा दुमदुमल्या
लेखनविषय:

वाचने 2408
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आवडली कविता, पैजारबुवा,

छान लयबद्ध कविता ! ही सुंदर कविता आवडली ! चाल लावून गाणं केलंत तर नक्की इथे डकवा !