मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छाट्या

अहिरावण · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा : ओळखा पाहू गावोगाव हिंडून दारोदार भिक्षा मागतांना कुणी दान दिलेल्या कुणी फेकून दिलेल्या कुठून कुठून मिळवलेल्या गोळा केलेल्या सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी छाट्या आज वाटून मोकळे होऊ उद्या मोकळे होऊ म्हणता म्हणता दिवस सरता सरता अजुन एक भर पडून नीट घडी करुन, जपून ट्रंकेत ठेवलेल्या याने दिलेली त्याने दिलेली अन ती छाटी तर... आठवणींची मोरपिसे हळुवार उलगडून हुळहुळत निश्वास सोडायला लावणा-या छाट्या छाटीचा मोह ठेवू नकोस एक अंगावर एक दोरीवर छाटीत अडकलास तर संपलं सगळं गुरुने दिलेला इशार विसरुन जमा केलेल्या छाट्या ज्यांना हव्या असतील त्यांनी येऊन घेऊन जाव्या सांगून सुद्धा भर पडत अजूनच वाढत जातात छाट्या गुरुंचे म्हणणे खरे होते मोह फार वाईट मग तो छाटीचा का असेना

वाचने 2272 वाचनखूण प्रतिक्रिया 6

गवि गुरुवार, 06/22/2023 - 14:39
हा हा :-)) मिपाचे जुने दिवस आठवले.