Skip to main content

प्रेमकाव्य

चंद्रायण..!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 02/12/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

शहाणी मुलगी....

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 05/11/2020 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते. खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं.. तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस, तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ.. पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून. झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं, शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती. मी नजर अजूनच आवरून घेते. मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय, त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी! मी तिथेच हरवून जाते... भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस. "अं?"

कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 29/10/2020 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाच्या सावलीत सावलीतल्या उन्हात कधीतरी वेडं मन भिजतं ना? गप्पांच्या नादात नादावल्या जगात कुणीतरी गोलगोल फिरतं ना? चहाच्या कपात कपातल्या चहात काहीतरी गोडगोड घडतं ना? मनातल्या प्रश्नाचं मनातलं उत्तर केव्हातरी कुठंतरी मिळतं ना? कसंतरी कुठंतरी कुणीतरी केव्हातरी कधीतरी प्रेमात पडतं ना? पडतं ना?

बात हुई ही नही

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 25/10/2020 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
पिछली चांद की रात तो बरसी बहुत हम फिरभी अपनी तिश्नगी साथ लिये लौटे अजीब है ये वाक़या, मगर बात हुई ही नही दूर उफ़क की लकीर सुर्ख हो चली थी उनके आमद की खबर गर्म हो चली थी सुनते है वो आये तो थे कायनात पे छाये तो थे हम न जाने किस चांद की याद मे मसरूफ़ थे के बात हुई ही नही जो बात रात रात भर बारीशे करते है इस जमी से शायद आसमा के पैगाम हो इस जमी के नाम जैसे ऐसे ही वो बात जो हमे उनसे करनी थी रातें गुजरी मगर बात हुई ही नही ना चांद रुका ना उफ़क पंछि रुका और ना ही बारीशे रुकि रातें बिती, हा हमपे बिती मगर आखिर बात हुई ही नही |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२४/१०/२०२०) उफ़क = क्षितिज आमद = येण्या

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 01/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.. सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता? झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता? काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता?? मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता? म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर! व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो, तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं. आणि online दिसूनही blue tick न दिसणं, काय सांगू?
काव्यरस

(मन भूत भूत ओरडते..)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 20/07/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते... आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन

(मन भूत भूत ओरडते..)

तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी का बाहेरची बाधा होते? मळभ दाटते तेव्हा मन भूत भूत ओरडते.. सहावे इंद्रिय जेव्हा शंकांची उडवीते राळ, आवेग जरा वा-याचा भासतो जणू वेताळ.. मिटताच डोळे माझे उभा मज समोर ठाकतो, रोज मला उठवाया तो झोटिंग बनुनी येतो.. लोक म्हणती आहे वेडा दिवस असो वा रात्र, किंचाळत असतो सारखा ताणूनी सर्व ही गात्रं.. (ही भुताटकी

तू

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 18/07/2020 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
तूला आठवून, तूला गवसणे अन् शब्दांतून तूला सजवणे कधीही न्हवता छंद माझा तरीही मला तू, नकळत सूचणे अंगिकारू पाहील्या काही सवयी तयातून मज तूझी उकल व्हावी काय बरे त्या अद्भूत समयी नशा तूझी मज वरचढ व्हावी आठवणिंच्या प्रवासातले कही क्षण तूझे माझे, विरळ कधी होतच नाही तूझ्या माझ्या नात्याते धागे विरळ कधी ते होतच नाही तूझी कंती, खट्याळ लाजरे हसू, तूझा आवाज प्रितीचा तूझ्या सावळा साज नकारातम्क तूझा होकार नाही रागाला कोणताही आकार घायाळ करती नाजूक नयन अगदी तूझ्या मनाचे दर्पण स्पर्श कोमल तूझ्या हाताचा होता ह्रीदयाचा ठोका चूकतो पटकन मिठीत तूझ्या आगळीच दूनिया तरंग उडती मनी माझीया नको दूरावा, नको विरंगूळा आ

मन राधा राधा होते...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 17/07/2020 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण.. मिटताना डोळे माझे कुशीत मजला घेतो, रोज मला उठवाया पाऊस होउनी येतो.. घनघोर बरसतो वेडा दिवस असो वा रात्र, रुजवात सुखांची नवथर भिजवुनी सारी गात्रं.. (ही राधा खास रातराणीसाठी....:))

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 22/06/2020 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना, आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना, तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन. "अगं, बेल्ट!" मी मग चिडून बेल्ट लावेन. "बोला!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन. गालापाशी नेईन. तू हसशील..म्हणशील, लोक बघतील मी म्हणेन बघुदेत. रहावणार नाहीच मला.. बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन. तुझ्या छातीवर डोक ठेवेन.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे?? तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील.. मी हसून पुन्हा डोकं तुझ्
काव्यरस