त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते...
२५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात.