केल्याने होत आहे रे--मोफत वाचनालयवाले दामलेकाका
रोज सकाळी फिरायला जाताना महात्मा सोसायटीजवळ मला एका पाराजवळ अल्टो गाडी उभी दिसायची . गाडीत आणि आजूबाजूला १-२ टेबले मांडून त्यावर पुस्तके ठेवलेली दिसायची. कधी कधी एक वयस्कर काका तिथे दिसायचे तर कधी कधी लोकच पुस्तके चाळताना आणि घेताना दिसायचे. हा काय प्रकार असावा? या उत्सुकतेने एका दिवस मी तिकडे वळलो आणि काकांना गाठलेच.
दामलेकाका एक वल्ली आहेत. त्यांचा मोटार वाइंडिंगचा व्यवसाय होता. १५ कर्मचारी होते. पण मुलांनी वेगळा मार्ग निवडल्याने व्यवसाय बंद केला.मग नर्मदा परिक्रमेचा योग आला आणि त्यांचे जीवन बदलून गेले. तिथे भेटलेली साधी माणसे, त्यांचे निरपेक्ष मदत करणे या सर्वांचा परिणाम म्हणून की काय परिक्रमेहून आल्यावर त्यांनी समाजासाठी काहीतरी करायचे ठरवले.
प्रथम मास्क वाटप सुरु केले. रोज सुमारे १०० या प्रमाणे ३५,००० मास्क त्यांनी फुकट वाटले. यामुळे लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही हे का करताय ? तुमचा काय फायदा? मग नर्मदा परिक्रमेबद्दल बोलणे व्हायचे. मग काकांनी नर्मदा परिक्रमेवरची काही पुस्तके विकत आणली आणि लोकांना वाटली. परत देताना लोक आणखी पुस्तके देऊ लागले. असे करत करत आता त्यांच्याकडे ५००० पुस्तके जमा झाली. त्यातून मोफत वाचनालय चालू करायची कल्पना सुचली.
आता ह्या वाचनालयाचे १५० च्या वर सदस्य आहेत. साधारण ३ वर्षे झाली, कोथरूड कुमार परिसर भागात त्यांचे हे मोफत वाचनालय रोज सकाळी ७ ते ९ चालू असते. अट फक्त एकच, पुस्तक नेताना तिथल्या वहीत आपले नाव,नंबर लिहायचे आणि पुस्तक वेळेत परत आणून द्यायचे.
अवघे पाऊणशे वयोमान असलेल्या दामलेकाकांना मनोमन नमस्कार करून आणि २ पुस्तके काखोटीला मारून मी निघालो.(समाप्त)
वाचने
4342
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
स्पृहणीय आणि कौतुकास्पद!
वा, मस्त !
सिंहगड रस्त्यावरील..
धन्यवाद. हे बघायला हवे. कळवतो
चांगला उपक्रम चालू राहो.
वाह! स्तुत्य उपक्रम!
दामलेकाका जगन्मित्र
In reply to दामलेकाका जगन्मित्र by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
पुढचा कट्टा दामलेकाकांच्या
In reply to पुढचा कट्टा दामलेकाकांच्या by राघव
कट्टा.
In reply to कट्टा. by MipaPremiYogesh
करुया की
एकदम मस्त आणि समाजापयोगी.
स्तूत्य उपक्रम
नवीन माहिती
In reply to नवीन माहिती by राजेंद्र मेहेंदळे
डोंगरवाडी, ताम्हिणी घाट माथा