शशक- निवडणूक २
आधीचा भाग शशक- निवडणूक
आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो.
कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल.
आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी?
कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो.
आबा - काय भाव आहे यावेळी?
कार्यकर्ता- ५०० रुपये.
आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो.
मिसळपाव
त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.