मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कालवण

लाल करा ओ माझी लाल करा

खिलजि ·
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

नाईस टू मीट यू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.

Foolपाखरा

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे?

!! बालदीन !!

नाखु ·
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

॥ कार्तिक कृष्ण पंचमी॥

सूड ·
आज कार्तिक पंचमी आज पंचमी कार्तिक उठा उठा चला आता चला सारेच आर्तिकं आज वार बुधवार आज वार वार बुध गॅस करा आता मंद जाई ऊतू बघा दूध आज मिथूनही रास आज रास ही मिथून तळ्यातल्या गणेशाला फेर्‍या इथून तिथून उद्या वार गुरुवार उद्या वार वार गुरु झाली आजची कविता करा उद्याचीही सुरु

भासं~फुलं!

अत्रुप्त आत्मा ·
पेर्णा... ;) ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात शब्दातून क्रीडेत क्रीडेतून शब्दात व्यासातून आसात आसातून व्यासात शब्दांच्या मनोय्रात मनोय्रांच्या शब्दात अर्थ नाही आशयात आशय नाही अर्थात रिकाम्या कुंथनात कुंथनातून रिकाम्यात.. शब्दकृतींच्या प्र-हारात भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;) कवी- अपना

लिखाण

माम्लेदारचा पन्खा ·
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

सिविपासींच्या कवितांचा तौलनिक व संक्षिप्त आढावा

पिशी अबोली ·
लेखनविषय:
प्रेरणा: आजचं मिपाचं मुख्य पान. माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही एव्हढ्यात हार मानणे नाही , सोपा प्रश्न होता माझा काय मग आतातरी वाटतेय का लाज ? आयुष्याच्या वर्तुळात सलमान करतो ती स्टाईल दोन मोती अजून कुणाची आहे का काही बाकी ? मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ती पाम्बरून गेली होईल सर्व सुरळीत सारे या वळणावर येऊनि थांबतो जात अन पात बघू नका प्रत्येकाला बायको नामक सामान हवं असतं सोमेश्वर गिलास रिकामकर C

(दे कुटाणे सोडुनी...)

खेडूत ·
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या' मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया ! एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको ***** पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली 'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली