फुलपाखरा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Nov 2017 - 4:36 am

का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण? मी? 
तू जागी आहेस ना म्हणून, 
मी पण जागतोय
.
चमचम चांदणीसारखी टिमटिमत राहतेस
कधी कधी वाटतं
दिवसभर 
थोडा थोडा मी 
जमा होत जातो
तुझ्या डोळ्यात
आणि मग रात्री
झोपेला तुझ्या डोळ्यात
उतरायला जागाच उरत नाही
.
असं होतय का रे फुलपाखरा?
त्रास देतो ना बाबा असा?
दूर निघून जातो
आणि लेकरु बाबाला शोधत राहतं!
.
एक गंमत करुया
आज झोपलीस ना की
बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं
स्वप्नात मग बाबा आणि बाबाची डॉल
खुप खेळतील, हसतील, धावतील
आईला घेऊला का बरोबर?
नको, आधि आपण खुप मस्ती करु
मग मस्ती केली म्हणून 
रागवायला येईलच ना ती?
तेव्हा, तिला पण आपल्या खेळात
सामील करुन घेऊ
तिला कळणारच नाही कि
ती कुणाच्या पार्टीत आहे
मज्जा ना?
.
पण कोकरा, स्वप्नचं रे ते
सकाळी ऊठलीस की संपेल
मग परत मी दिवसभर
थोडा थोडा साचत जाईन
तुझ्या डोळ्यात
आणि परत तु जागत राहशील,
छे.. नकोच्च.. 
.
का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/११/२०१७)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

'बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं' चं 'बोलवावं' करूयात का? बाकी कविता तरल नेहमीसारखीच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2017 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच आवडली,

पैजारबुवा,

पैसा's picture

25 Nov 2017 - 11:29 am | पैसा

छान!