घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'
मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया !
एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको
बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको
*****
पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही
केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही
लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली
कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही
वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी
सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी
मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा
पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली
'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली
'वायडी' होऊ नये ही प्रार्थना मम ओठांवरी
आखरी संधी तुला मी देईन या सेमिस्टरी
दे कुटाणे सोडुनी अन लाज आता बाळगी
... सुमडीत
काव्यरस
वाचन संख्या
5249
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
M3 चा उल्लेख नसल्याने फाउल
या एम-३ मुळेच सात वर्षे
In reply to M3 चा उल्लेख नसल्याने फाउल by टवाळ कार्टा
७ वर्षे रखडला आणि काही बिघडले
In reply to या एम-३ मुळेच सात वर्षे by खेडूत
डिप्लोमाच्या आधारावर नोकरी
In reply to ७ वर्षे रखडला आणि काही बिघडले by टवाळ कार्टा
विंजिनिअरानी
धन्य!
अगागा
समस्त विंजीनेर णिशेद करतील
वा
जब्रा रचना..! आवडली.