१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)