Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माहितगार on गुरुवार, 12/05/2013 - 17:09
आंतरजालावर युनिकोडात मराठी टाईप करण्याच्या आतापर्यंत खूप सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तरीही मराठी विकिपीडियावरील आकडेवारी नुसार आजही ६०% लोकांना मराठी विकिपीडियावर मराठीत टाईपकरणे जमत नाही.दिवसाकाठी किमान २ ते ४ नवी रोमनलिपीतून मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करणारी मंडळी थांबवावी लागते.विवीध पद्धतीने सहाय्य उपलब्ध करून देऊन सुद्धा आपण नेमके कुठे कमी पडतो हे कळेनासे होते. मराठी विकिपीडियावर या रोमन लिपीतून मराठी लिहिणार्या मंडळींना, थांबवले जाताना सध्या दाखवला जाणारा संदेश (दुवा) सराव सुविधा सुद्धा उपलब्ध करतो.(इतरही साहाय्यपाने पॉवरपॉईंट इत्यादी उपलब्ध आहेतच) या संदेशात नेमक्या कोणत्या सुधारणा (उपलब्ध) केल्यास मराठी विकिपीडियावरील मराठी टंकलेखन नवागतांकरीता सुलभ होईल या बद्दल आपणा सर्वांकडून जाणून घेऊ इच्छीतो. आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 17290 views

प्रतिक्रिया

Submitted by वडापाव on गुरुवार, 12/05/2013 - 17:21

Permalink

मराठीत टंकायच्या पद्धती विविध

मराठीत टंकायच्या पद्धती विविध मराठी टायपिंग सॉफ्टवेअर्समध्ये वेगळ्या असतात. श्री-लिपी, शिवाजी, बरहा अशी बरीच सॉफ्टवेअर्स उपलब्ध असतील. यांतील काहींची टंकनपद्धती आंतरजालावरील युनिकोडात होणा-या टायपिंगशी साधर्म्य राखून असते, काहींची एकदमच वेगळी असते. त्यामुळे अशा वेगळ्या टंकनपद्धतीची सवय असलेल्यांना आंतरजालावर सर्वप्रकारचे टंकनसाहाय्य उपलब्ध असूनही मराठीतून टंकणं अवघड जाऊ शकतं असा एक अंदाज.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 12/05/2013 - 19:58

In reply to मराठीत टंकायच्या पद्धती विविध by वडापाव

Permalink

सर्वे

या (दुवा) ऑनलाईन सर्वेक्षणानुसार ४० % लोक ज्या मराठी संकेतस्थळावर जी पद्धती उपलब्ध असेल ती वापरतात.हि आकडेवारी मराठी विकिपीडियावर मराठी टंकनकरू शकणार्या ४०% आकड्याशी क्रॉसटॅली होते. सर्वेनुसार विंडोज आयएमई आणि इन्स्क्रीप्ट मिळून ६ टक्के लोक वापरतात.२२ टक्के लोक गूगलने उपलब्ध केलेली पद्धटी वापरतात(सध्याच्या आकडेवारींनुसार एकच पद्धती वापरणार्र्यात हा टक्का सर्वात मोठा आहे).बराहा गमभन आणि इतर मिळून आकडा ५ ते ६%च्या पुढे जात नाही.मागच्या पिढीतल्या टंकन पद्धती वापरणारी बहुतांश मंडळी उपरोक्त पद्धतीपैकी एखादी पद्धत वापरावयास लागली अथवा इंटरनेट युनिकोड मराठीशी त्यांनी तेवढे जुळवून घेतले नाही.मागच्या पिढीतील इंटरनेट युनिकोड मराठीशी जुळवून न घेणार्यांची संख्याही मोठी म्हणजे दहावीस लाखांच्या घरात तरी असू शकते पण नेमकी आकडेवारी देणे कठीण आहे. मराठी विकिपीडियावर मराठी टंकता न येणारी सध्याची आकडेवारी बहुतांश नवीन पिढीची आणि बरच प्रमाण सेमी अर्बन आणि ग्रामीण क्षेत्रातील असाव.साधारणतः दहावी झाल्यानंतर इंटरनेटवरचा वावर वाढतो जर वर्षाकाठी ९ लाख मुले (मराठी माध्यमातन) दहावी होऊन बाहेर पडत असतील तर त्यांचा मराठी इंटरनेटवरचा वावर फारच कमी आहे हे वास्तव लक्षात घेणे सोपे जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on गुरुवार, 12/05/2013 - 17:31

Permalink

ओह्ह

धाग्याचा विषय पाहून वाटलं मिपावरच्या शुद्ध-लेखनाबद्दल आणि ज्वलंत धाग्यांबद्दल काहीतरी आहे. आमचा पास.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 12/05/2013 - 20:01

In reply to ओह्ह by मी_आहे_ना

Permalink

धन्यवाद

धाग्यास भेट देण्याकरता धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/05/2013 - 17:37

Permalink

विकिपिडिया

विकिपिडियावर मराठी संस्थळांवर लेख तुम्हीच लिहिला आहे का? त्यातली माहिती फार जुनी आहे म्हणून विचारते.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 12/05/2013 - 20:14

In reply to विकिपिडिया by पैसा

Permalink

प्रतिसादाकरता धन्यवाद

आपण मराठी संकेतस्थळे या लेखा बद्दल विचारत असल्यास,आत्तापर्यंत ३५ सहभागी सदस्यांप्रमाणेच मीही त्या लेखात अंशतः लेखन योगदान दिले त्यालाही तीन एक वर्षे लोटली.माझे स्वतःचे ८० टक्के लक्ष साहाय्य विषयक लेखनावर असते. त्या आणि इतर अनेक लेखांची स्थिती हा स्वतंत्र धाग्याचाही विषय ठरावा पण या धाग्यात म्हटल्या प्रमाणे मराठी टंकनातच बॉटलनेक प्रॉब्लेम आल्याने लेखकांची संख्या मिळवण्याच्या महत्वपूर्ण गोष्टीत व्यत्यय येतो.म्हणूनच मराठी विकिपीडियावर प्रत्यक्ष मराठी टंकनाचे प्रत्यक्ष परिक्षणकरून फिडबॅकची मिपाकरांकडून अपेक्षा ठेऊन हा धागा काढला पण अद्यापतरी या धाग्याचा प्रतिसाद पुर्वींच्या धाग्यांच्या मानाने कमी वाटतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/05/2013 - 20:34

Permalink

धागा निटसा कळाला नाही .

धागा निटसा कळाला नाही . पण जर मराठी टंकण्याबद्दल असेल तर , मी google वर जातो , english to marathi translation लिहीतो . मग chingati नावाची वेबसाईट येते . तिथे लेख टंकुन इथे चोप्य पस्ते करतो . अजुनही मला मिपावर मराठी टाईप येत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on गुरुवार, 12/05/2013 - 23:51

In reply to धागा निटसा कळाला नाही . by जेपी

Permalink

http://marathi.changathi.com/

http://marathi.changathi.com/ परम धन्यवाद. आता लिहिणे सोपे झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 12/09/2013 - 12:21

In reply to http://marathi.changathi.com/ by काळा पहाड

Permalink

हि वेबसाईट चांगली आहे पण "र्

हि वेबसाईट चांगली आहे पण "र्‍या" (Ryaa) टाईप केला की त्याचा "र्या" होतो हा प्रॉब्लेम मला अजून सुटला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 07:51

In reply to धागा निटसा कळाला नाही . by जेपी

Permalink

प्रत्यक्ष टंकताना येणार्र्या अडचणी नोंदवून हव्यात

नमस्कार, आपण सध्या वापरत असलेल्या कॉपीपेस्ट पद्धतीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.पण त्याचवेळी मिपाटंकनातील अडचणींची नेमकी नोंदच केली न गेल्यास मिपा टंकन बनवणार्र्यास साहाय्य पान बनवणार्र्यास सुविधेत काय बदल करावयाचा हे ध्यानात येत नाही. अशीच अडचण मराठी विकिपीडियावरही येते. तर या धाग्यातून अपेक्षा अशी की मराठी विकिपीडियाला प्रत्यक्ष भेट दिली जाईल.आणि तेथे टंकण्याचा प्रयत्न करून सध्याच्या सुविधेतील आणि साहाय्यातील उणीवा माहिती करून मिळतील.कारण आपण बनवलेली सुविधा साहाय्य आपले आपल्याला परिपूर्ण वाटते पण वापरकर्त्यांच्या अडचणी समजत नाहीत.त्या समजून घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/05/2013 - 20:34

Permalink

खरे तर

फोनेटिक कीबोर्ड लोकांना टायपिंग करायला अवघड का वाटत असावा याचा मला अंदाज येत नाही. जेव्हा गमभन, गूगल हिंदी इ उपलब्ध नव्हते तेव्हाही मी एक किरण नावाचा एक देवनागरी फॉण्ट होता तो वापरून मराठी/हिंदी टाईप करत होते. आता युनिकोड, आणि इतर सोयी असताना खरे तर मराठी टायपिंग कठीण जाऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 07:58

In reply to खरे तर by पैसा

Permalink

प्रत्यक्ष अनुभव

मराठी विकिपीडियावरचा प्रत्यक्ष अनुभव लोक यातही अडखळतात हाच आहे.नविन शिकताना अथवा इतरांना शिकवताना लोक त्यांच्या अडचणी नोंदवण्याचे टाळतात त्यामुळे नेमके उपाय काय योजावेत ते उमजत नाही. यूजर बिहेवीयर स्टडीवर अवलंबून रहावयास लागते पण नोंदी नसल्यास निव्वळ युजर बिहेवीयर स्टडीवर विसंबण्यात पुरेशी सटीकता आणि परिपूर्णता आणण्यात अडचणी येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/06/2013 - 01:09

Permalink

खालील लीकंवर तर मराठी टंकन

खालील लीकंवर तर मराठी टंकन अत्यंत सोपे झाले आहे. http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 08:03

In reply to खालील लीकंवर तर मराठी टंकन by खटपट्या

Permalink

होय गूगल टंकन सर्वाधिक वापरले जाते

होय सध्या गूगल टंकन सर्वाधिक म्हणजे २२% लोक वापरतात .गूगल टंकन अवजार इतर संस्थळांवर सरळ टंकण्या साठी वापरता येते तरी पण वापर मुख्यत्वे कॉपी पेस्टींगनेच अधिक केला जातो असे आढळून येते.
  • Log in or register to post comments

Submitted by अव्यक्त on Fri, 12/06/2013 - 03:31

Permalink

<strong>धन्यवाद</strong>

खटपट्या आपण उपयुक्त संस्थळ सुचवले त्याबद्दल मनःपूर्वक आभार…अजुन काही संस्थळ आपणांस ठाऊक असल्यास इथे टंकव्यावात…आणि मराठी fonts उदाहरण म्हणजे शिवाजी आणि इतर font जे कळफलका बरहुकुम चालतात अस्से उपलब्ध करावेत…धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/06/2013 - 04:04

In reply to <strong>धन्यवाद</strong> by अव्यक्त

Permalink

अजून एक संस्थळ खालीलप्रमाणे

अजून एक संस्थळ खालीलप्रमाणे http://www.gamabhana.com/gamabhana_ex/demo/ यातील डाव्या खिडकी मध्ये सर टंकायला सुरवात करा. आणि चोप्य पस्ते करा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 11:44

In reply to अजून एक संस्थळ खालीलप्रमाणे by खटपट्या

Permalink

गमभन

मराठी विकिपीडियाचा कळफलक बनवताना गमभनचाही कळफलक विचारात घेतला होता त्यामुळे बरेचसे मॅच होते.प्रतिसादाकरता धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 11:33

Permalink

हे आजचं रोमन इंग्रजी

नमस्कार आज सकाळी सुमारे साडेनऊ वाजता मराठी विकिपीडियाच्या गाळणीने थांबवलेली दोन संपादने उदाहरणाखातर खाली देत आहे. एक रोमनलिपी मराठीत आहे आणि एक चक्क इंग्रजी आहे. : *bharat deshatil tuthpest ani soap cha company chi yadi ani mahiti dene *I would like to know the available courses related to social work. तशीही हि संपादन विश्वकोशीय स्वरूपाची नाहीत पण किमान देवनागरी मराठीतह लिहीली जात नाहीत आणि रोजचे किमान दोनचार लोक मराठी टायपींगला असे पास देत असतील तर बाकी दहा जणांनाही मराठी टायपींग अवघड असत हेच सांगतील. या बद्दल बरेच बदल गेल्या दहा वर्षात करून पाहीले पण सर्वांना मराठी टायपींग सहज जमल पाहीजे हे उद्दीष्ट अजून काही पूर्ण होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/06/2013 - 12:22

In reply to हे आजचं रोमन इंग्रजी by माहितगार

Permalink

एक कारण

एक कारण कदाचित हे असेल की देवनागरी टायपिंग म्हणजे बहुतेकांना तो मराठी टाईपरायटरचा अगम्य इन्स्क्रिप्ट कीबोर्ड आठवतो. त्यामुळे फोनेटिक कीबोर्ड वापरणं किती सोपं आहे हे बघण्याचा हे लोक प्रयत्नच करत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मिलिंद on Fri, 12/06/2013 - 12:56

In reply to एक कारण by पैसा

Permalink

"बहुतेकांना तो मराठी

"बहुतेकांना तो मराठी टाईपरायटरचा अगम्य इन्स्क्रिप्ट कीबोर्ड" इनस्क्रीप्टचे kbdtut वापरुन बघा एकदा म्हणजे अगम्य राहणार नाही. ४ दिवसांत मराठीच काय भारतातल्या कोणत्याही भाषेत टाईप करता येईल. आत्ताच्या घडीला इनस्क्रीप्ट हा एकमेव BIS मानक असलेला किबोर्ड लेआऊट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/06/2013 - 13:30

In reply to "बहुतेकांना तो मराठी by मिलिंद

Permalink

माहितीसाठी धन्यवाद!

पण मला वाटतं प्रत्येकासाठी प्रश्न आपल्याला काय सोपं/कम्फर्टेबल वाटतं हा आहे. जे थोडंबहुत देवनागरी टायपिंग शिकले आहेत त्यांना इन्स्क्रिप्ट वगैरे इतर कीबोर्ड्स कठीण वाटणार नाहीत. पण ज्याला त्यात डोकं घालायची इच्छा नाही आणि कामचलाऊ टायपिंग आलं की पुरे वाटतं त्यांना फोनेटिक कीबोर्ड बरा वाटेल. त्यात बरा-वाईट डावं-उजवं असं काही नसावं.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 12/06/2013 - 15:56

In reply to माहितीसाठी धन्यवाद! by पैसा

Permalink

सहमत

वापरकर्त्यांची आकडेवारी बोलकी आहे २२ टक्के गूगल ट्रांसलीटरेशन वापरतात,४० टक्के ज्या मराठी संस्थळावर जो आहे तो म्हणजे मुख्यत्वे ट्रांसलीटरेशन.गमभन बराहा काही आएमई मिळून दहाटक्के ट्रांसलीटरेशनच वापरतात. तर इनस्क्रीप्ट केवळ सहा टक्के.शेवटी वॉशींग मशिन टॉपलोडींग कम्फर्टेबल का फ्रंटलोडींग कम्फर्टेबल हे वापरकर्त्यांनी ठरवलेल बर. मराठी विकिपीडियावर अक्षरांतरण,फोनेटीक किंवा इन्स्क्रीप्ट पैकी कोणतीही ऑनलाईन सुविधा एनेबल करता येते. प्रश्न तीनही प्रकारच्या सुविधा देऊनही हा धागा लावावा लागतो आहे हा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 12/06/2013 - 12:30

Permalink

.

ऑटोसजेशनवालं टायपिंग सॉफ्टवेअर पाहिलं की आम्ही ते बादच करतो. आपण झरझर लिहित जावं आणि ते मराठीत उमटावं ..
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on Fri, 12/06/2013 - 13:03

Permalink

मी प वर लिहिण्यासाठी अडचण येत

मी प वर लिहिण्यासाठी अडचण येत नहिये. पण तुम्ही लोक smilies कशा तक्ता ते सांगा न. त्यासाठी कुठली लिंक आहे का? कि मी प वरच काही provision आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 12/06/2013 - 13:40

In reply to मी प वर लिहिण्यासाठी अडचण येत by म्हैस

Permalink

.

स्मायलीचीही कुठेतरी इथे लिंक आहे. पण मला इथली एकच स्मायली येते. : आणि ) ही दोन चिन्हे सलग टाइप करा , त्यांच्या आधी नंतर काहीही अक्षर त्याना जोडून ठेऊ नका. आणि मग प्रतिसाद प्रकाशित करा. प्रतिसादात :) ही स्मायली येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 12/06/2013 - 13:41

In reply to . by उद्दाम

Permalink

.

मायबोलिवर या. तिथे भरपूर स्मायल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 12/06/2013 - 22:19

Permalink

मिपा वर सुध्दा मराठी टायपिंग

मिपा वर सुध्दा मराठी टायपिंग होत नाही . इतरत्र टाईप करून पेस्ट करावे लागते
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 12/07/2013 - 05:13

In reply to मिपा वर सुध्दा मराठी टायपिंग by मराठी_माणूस

Permalink

मीपा वर सुद्धा मराठी टायपिंग

मीपा वर सुद्धा मराठी टायपिंग होते. गमभन चे नियम पाळावे लागतात. अडचण एकच आहे. जेव्हा बै-स्पेस दाबतो तेव्हा सगळा गोंधळ सुरु होतो ))
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on Fri, 12/06/2013 - 22:38

Permalink

ऑफलाईन मराठी लिहिण्यासाठी

ऑफलाईन मराठी लिहिण्यासाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? विंडोजमधील पर्यायांचा विचार करू. गमभनच्या एडिटरमध्ये टंकून ते दुसरीकडे चिकटवणे हा पर्याय मला कंटाळवाणा वाटतो. बरहा आजकाल फुकट मिळत नाही. गुगल ट्रान्स्लिटरेट हे शब्दांचा अंदाज करत बसते, जे मला आवडत नाही. अनेकदा मी T दाबले तरीही गुगल त्याला त समजते. मोठा किचकट शब्द टंकायचा असेल तर तो गुगलला कळत नसल्याने तुकडे करून टंकावा लागतो. इन्स्क्रिप्टचा कळफलक नव्याने शिकण्याची इच्छा नाही. लिनक्स-उबंटूमध्ये मी iBus चा मराठी कळफलक वापरतो. हा बऱ्यापैकी फोनेटिक असलेला कळफलक आहे. मी बऱ्याचदा लिनक्सच वापरतो. कधीतरी विंडोज वापरावे लागले, तर गुगल ट्रान्स्लिटरेट वापरतो. विंडोजमध्ये ऑफलाईन वापरण्यासाठी फोनेटिक कळफलक कोणाला ठाऊक आहेत काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/06/2013 - 22:43

In reply to ऑफलाईन मराठी लिहिण्यासाठी by मिहिर

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे

तुमच्या विंडोज सिस्टीमवर भाषांच्या पर्यायामधे युनिकोड अ‍ॅक्टिव्हेट करा आणि भाषाइंडिया (मायक्रोसॉफ्ट) ची http://bhashaindia.com/downloads/pages/home.aspx प्रणाली वापरा. यासाठी पूर्ण सूचना http://raisen.nic.in/pdf/nic/unicode_solution.pdf इथे उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खबो जाप on Tue, 12/10/2013 - 15:12

Permalink

आपण बाबा इथ जातो आणि काय

आपण बाबा इथ जातो आणि काय टायपायाचे ते टायीपतो आणि कापी पेष्ट करतो हाय काय आन नाय काय http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com