मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सल्ला

उपाय सुचवाल ?

उगा काहितरीच ·
लेखनप्रकार
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?

खादाड अमिता ·
लेखनविषय:
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ.

लै समस्या

डॉ.श्रीराम दिवटे ·
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

PAN ची गंमत

गौरव व्यवहारे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला ही गोष्ट बरिच उशिरा कळली, आता CA असुनही ही गोष्ट एवढ्या उशिरा कळणे म्हणजे खरच लाज आहे, पण म्हणतात ना Its never too late. तर ठिक आहे, तर गंमत अशी की तुम्ही तुमचा PAN ज्याला काही लोक PAN नंबर सुद्धा म्हणतात, आता पॅन म्हणजे Permanant Account Number मग त्याला पुन्हा नंबर का म्हणायचे, काही लोक tds कापला का अस म्हणतात, आता tds म्हणजे tax deducted at source, मग अजुन काय कापणार आहे त्यात, हे म्हणजे दळण दळुन आणल्या सारखे आहे.

अक्षरलेखन - काही टिप्स

पाषाणभेद ·
माझ्या मागच्या एका धाग्यात बर्‍याच जणांनी माझ्या अक्षराचे कौतूक केले होते अन मी 'अक्षर लेखन कसे सुधारावे' याबाबत लेखही लिहीणार होतो. बर्‍याच दिवसांपासून लिहीन लिहीन म्हणत होतो पण वेळ नसल्याने हा लेख लिहीला नव्हता. आता माझे अक्षर फारच छान आहे अशातला भाग नाही. कदाचीत हा लेख माझ्या जुन्या स्मृतींना उजाळा असूही शकतो. लहाणपणाचे माझे अक्षर कसे होते याबाबत मला आठवत नाही. माझ्या लक्षात माझी इयत्ता ५ वी पुढील वर्षे आहेत. इयत्ता ४ थी पर्यंत माझ्या वेळी पाटी अन पेन्सील असायची.

अल्कोहोलिक कॅलोरीस

खादाड अमिता ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद. ३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत.

खरंच stupid विचार करते का मी?

गुंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात. नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की... माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे. ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते. नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे.