पेरू : भाग ११ : लोकजीवन
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.