पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र
पाकीस्तान -
पाक म्हणजे पवित्र.
पाकीस्तान म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यवंतांचा देश.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. येथील भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत होती.
पण याच वेळी काही लोक हा विचार करीत होते की केवळ इंग्रजांपासून मुक्ती पुरेशी नाही तर आपल्याला भारतापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आपली प्रगती साधता येणार नाही आणि मग सुरू झाला प्रयत्न हरतर्हेने.