झोल? चच्चडी?

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
6 Oct 2019 - 10:41 am

मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे.

पाकक्रियाजीवनमानआस्वादमाहिती

India Deserves Better - ४. शेती , राजकारण आणि त्यातील विसंगती आणि समस्या

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
5 Oct 2019 - 1:50 pm

नोट : शेती या विषयाशी माझा डायरेक्ट काही संबंध नाही, पण माझ्या आसपासच्या समस्या मांडताना, शेती आणि शेतकरी हे घटक त्यातुन सुटु शकत नाहीत. त्यामुळे खोल अभ्यास नसला तरी वरवर जे मला थोडेफार माहीती आहे आणि मला जे वाटते आहे , जे वाचले आहे त्यावरुन लिहितो आहे.
तरीही शेतीतील नेहमीचे जे प्रश्न आहेत, तेच पुन्हा न मांडता त्या व्यतिरिक्त बोलण्याचा थोडा प्रयत्न करतो. शेतकरी आत्महत्या तर मनाला खुपच क्लेष देवुन जातात म्हणुन तो विषय ही मी येथे घेत नाहीये..

मन आणि पृथ्वी

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
5 Oct 2019 - 11:53 am

म्हणे एकदा पृथ्वी मनास,
"चल, खेळ एक खेळू, आजमावू आपापली शक्ती खास."
ऐसे म्हणुनी पृथ्वी क्षणात खेचे सर्व चेतन,अचेतनास,
म्हणे हसुनी," रे मना! तुझ्यासकट ही शरीरांची रास,
तुला आकर्षण्या न उरले काही आता, शांत का झालास?"

मुक्तकविचार

तिखट कडकणी by Namrata's CookBook : १७

Namokar's picture
Namokar in पाककृती
4 Oct 2019 - 1:51 pm

जिन्नस :
१ वाटी मैदा
१ वाटी बेसन पीठ
२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
मीठ
तेल
पाणी
जिरे
ओवा

दो डोळ्यांचे....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Oct 2019 - 12:46 pm

दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे

डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी

गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला

सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा

-शिवकन्या

कविता माझीकालगंगाप्रेम कविताविराणीसांत्वनामांडणीवावरकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना (शॉर्ट-फिल्म)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
4 Oct 2019 - 12:33 pm

वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची. १०-११ मिनिटांच्या छोट्या फिल्ममध्ये वडील-मुलाचे नाते, त्यांची समांतर विश्वे आणि मुलाची उमज हे सहज आणि सुंदरपणे येते.

चित्रपटआस्वाद

मी अजिबात घाबरत नाही....! - २

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
4 Oct 2019 - 9:13 am

भाग २

तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू.

कथाविरंगुळा

आमार कोलकाता - भाग ३

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
3 Oct 2019 - 11:13 am

लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील :

आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320

आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361

आमार कोलकाता - भाग ३

हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतलेख