दसरा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
8 Oct 2019 - 7:24 pm

जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो

ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो

आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो

सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

शिवकन्या

कविता माझीभावकविताकरुणवीररसरौद्ररसमांडणीसंस्कृतीधर्मइतिहासकवितासाहित्यिकसमाज

आहा ते सुंदर दिन हरपले

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 5:06 pm

आहा ते सुंदर दिन हरपले
---------------------------------
निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम
आठवले स्वीट होम उपाहार गृह
मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह
त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच
इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस
त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे
नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई
फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे

पाकक्रियालेख

पेंन ड्राइव्ह

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 5:02 pm

खूप छान व हॅण्डसम दिसतेस -बघत राहावेसे वाटते -प्रिया म्हणाली

काहीतरी काय- साधा माणूस आहे -सरळ साधा संवेदना क्षम मनाचा तो म्हणाला

म्हणून तर मला आवडतोस -प्रिया

पण तुला माझी पर्वा नाही -प्रिया

असं का बोलतेस ?

तू ज्या ब्यांकेत काम करतोस तिथल्या क्लायंट्स ची लिस्ट माहिती मला हवी होती

माझासाठी ते फार महत्वाचे आहे -माझं प्रमोशन -पगार वाढ सार त्यावर अवलंबून आहे -प्रिया

त्या बदल्यात आपण लग्न करणार अशी तुझी ऑफर आहे -तो

काहीतरी बोलू नकोस -ऑफर मला आली आहे -माहिती त्या बदल्यात प्रमोशन -पगार वाढ -

कथा

जुगार

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 1:24 pm

राकेश व रेवा वाट बघत बसले होते त्यांच्या फ्लॅट वर

रेवाने स्लिव्हलेस ब्लाउज घातला होता

तलम साडीतून तिच्या छातीचा उभार प्रोव्होक करत होता

जमकर जुगार खेळणार -दर वेळी अभि जिंकतो या वेळी त्याला कंगाल करून सोडणार

जपून -तुला भान राहात नाही रेवा म्हणाली

दारावरची बेल वाजली रेवाने दार उघडले

अभि व कामिनी आले होते

कामिनीन आज टॉप ओपन ब्लाउज घातले होते

गळा ओपन असल्याने आतली वक्षस्थळे दिसत होती

शिफॉन ची तलम साडी परिधान केली होती

त्यातून गोरेपान पोट दिसत होते

हाय कामिनी -खूप सुंदर दिसतेस

नाट्य

India Deserves Better - ५. 'आरे'रावी : आरे जंगल, आदिवासी, न्यायालय आणि राजकारण

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
8 Oct 2019 - 4:01 am

नोटः
मुबंईत पवईला कामाला असताना आणि त्या आधीही मुंबईतील वास्तव्याच्या काळात(एकुन २००७ ते २०१४) जवळच्याच आरे जंगलामध्ये कित्येक दा जाण्याचा योग आला होता, त्यामुळे आता जे चालु आहे, ते खुपच क्लेषदायक आहे माझ्यासाठी, म्हणुन लिहिलेच पाहिजे, ५ ऑक्टोंबर ला झाड पाडलेला पहिला फोटो पाहुन डोळे ओलावले होते त्यामुळे लिहिलेच पाहिजे.

"The future will either be green or there will be no future at all"

'आरे वाचवा' आंदोलन आणि स्थानिक आदिवासी

आरे वाचवा आंदोलनावर बोलण्या अगोदर मी भारतातील या अगोदरील दोन आंदोलनांवर बोलु इच्छितो , आणि मग या आंदोलना बद्दल सांगतो.

मदत

दिपुडी's picture
दिपुडी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 12:33 am

काही दिवस किंवा महिन्यांपूर्वी मिपा वर एक लेख वाचला होता,त्यात आपल्याच एका मिपाकराने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचा अनुभव अगदी व्यवस्थित पणे सविस्तर लिहिला होता,
त्यांना अटॅक येतानाचे हाताचे ,खांद्याचे, छातीत दुखणे,त्या वेदना चालू असताना सुद्धा त्यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदत मागवणे(बहुतेक ते परदेशास्थित असावेत)इत्यादी अतिशय छान विवेचन केले आहे,
कृपया मला त्या ध्याग्याची लिंक मिळवून द्यायला मदत मिळेल का?

माहिती