मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम
बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ)
एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत
एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत
रोजचेच काम
दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास
एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास
हाती ना छदाम
पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम'
ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम
जागीच आराम
हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब
नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब
खांबातळी राम!
*(संध्याकाळ)
आर्य
सवलतीची मर्यादा आणि फेरआढावा असा विषय असावा
शैक्षणिक संस्थांत आरक्षण
सहमत
सॅम पित्रोडा