मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम
बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ)
एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत
एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत
रोजचेच काम
दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास
एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास
हाती ना छदाम
पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम'
ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम
जागीच आराम
हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब
नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब
खांबातळी राम!
*(संध्याकाळ)
वाचने
4180
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
का वाट लावताय?
विडंबनाचे हे असेच होते
चला!
एक खुलासा..
In reply to चला! by बेसनलाडू
सगळेच (!) सदस्य
In reply to एक खुलासा.. by विसोबा खेचर
धन्यवाद,
In reply to सगळेच (!) सदस्य by बेसनलाडू
मी फक्त