मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक ऐकशील?

मी अश्विनी ·

फटू 12/04/2008 - 13:54
कधीतरी अकरावी बारावीला असताना वाचलेल्या सुहास शीरवळ्करांच्या एका कादम्बरीतील ओळी आठवल्या... तुझं येणं तुझं जाणं, तुझं हसण तुझं रुसण तुझ्या नुसत्या असण्याने माझं जीवन समृद्ध केलं... ... तेव्हढच एक सांगायचं राहून गेलं... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो मी शोधतो किनारा...

आनंदयात्री 12/04/2008 - 14:24
भरती-ओहोटीचा खेळ होईल किनारा परत एकटा राहील याचा अर्थ नीट लागला नाही :( .. किनारा कधी एकटा होउ शकतो का ? जिथे पाणी संपते तिथुन किनारा सुरु होतो अशी सर्वसाधारण कल्पना जनसामान्यात असते, कवियत्रीच्या मनातली कल्पना जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by आनंदयात्री

मी अश्विनी 12/04/2008 - 23:25
हो, किनारा एकटा होऊ शकतो .कारण पाणी सोबत असताना किनार्याला काय आणि किती आनंद होतो ते किनार्यालाच माहित असते.कोणी सोबत असण्याचे महत्तव,कोणी सोबत नसताना कळते. भरती आल्यावर किनार्याला आनंद होतो,आणि ओहोटी झाल्यावर दु:़ख होते.ते एकटेपणाचे दु:़ख असते. अशी माझी कल्पना आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by मी अश्विनी

विजुभाऊ 17/04/2008 - 08:19
हो किनारा एकटा होउ शकतो. कवीतला सोडा अगदी भुगोलाचे उदाहरण घ्यायचे झाले तर उझबेकिस्तान मधे "अरल" नावाचा समुद्र आहे/होता .तीस वर्षापूर्वी पर्यन्त तो चांगला मोठासा माशा/ जहाजांचा नान्दता समुद्र होता. त्या समुद्राला मिळणार्‍या सगळ्या नद्या त्यावेळच्या रशियन सरकारने त्यांवर मोठी मोठीधरणे बान्धुन ते पाणी अडवले आणि ते पाणि सिन्चन साठी वापरले. त्यामुळे समुद्र अक्षरश: आटला. त्या वेळेचे बन्दराचे शहर आता समुद्रापासुन जवळ जवळ १०० की.मी दूर आहे. य इथे पहा अरल समुद्राची दुर्दशा http://youtube.com/watch?v=2hu0Hr9eS_g आता दिसतात केवळ बुडलेली मोठी जहाजे , मिठाचे ढिगारे , आणि वाळवंट.

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री 17/04/2008 - 10:45
अरे बापरे, अरलचे उदाहरण खतरनाकच आहे, भयंकर. >>हो किनारा एकटा होउ शकतो. बाकी किनारा एकटा होउ शकतो याच्याशी असहमत. अहो किनारा अन सागर हे दोन्हीही एकमेकांना पुरक आहेत, किनार्‍याची व्याख्या काय ? जिथे समुद्राचे पाणी संपते तिथे असणारी जमीन, अशी काहितरी, बरोबर ? आता अरल च्या उदाहरणात किनारा कुठे आहे तुम्हीच सांगा, जुन्या बंदराच्या शहरात की सध्या १०० किमी लांब जिथे समुद्र आहे तिथे ? किनारा कधीच एकटा होउ शकणार नाही सर, तुमचा अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट. डिस्क्लेमरः सदर किनारा एकटा होण्याच्या स्पष्टीकरणाचा वरिल कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये, प्रतिसादकाचा उद्देश फक्त "किनारा एकटा होणे" या कल्पनेवर उहापोह करणे आणी त्याचे संबधित मत पटवुन देणे एवढेचा आहे/असेल.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 17/04/2008 - 11:38
अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट.
सहमत. जिथे समुद्र / नदी धरणीला स्पर्श करते तो किनारा. समुद्राला किनारा आणि किनार्‍याला समुद्र हा असणारच.
कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये,
हेच म्हणते.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:50
आयला, इथं कवितेसारखा तरल विषय चालू आहे आणि तुम्ही काय भूगोलात शिरलाय रे? (आणि हे तरल विषय वगैरे 'मी' बोलतोय..च्यायला गंमतच आहे!) अस्तो! आमच्याकडं किनारा एकटा असतो !!! काय म्हणणं आहे? किनारा पण एकटा, लाट पण एकटी, किनार्‍यावर पिउन टाकलेलं शहाळं पण एकटं आणि त्यातली स्ट्रॉ पण एकटी... च्छ्या: लईच एकटं एकटं वाटायला लागलं बॉ !!!! - (भर गर्दीत एकटा) ध मा ल.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/04/2008 - 12:02
वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! 'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-)
बाकी "वो तो है अलबेला .. हजारो मे अकेला" आठवले.
माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां फारतर फार 'हललेला' म्हण...ते ग्रांटेड. -(हललेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 17/04/2008 - 12:10
>>वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) >>'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-) :))))))))))))) हहपुवा .. तुझ्या शब्दात "फुटलो ना मी"! >>माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन ..

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/04/2008 - 12:22
ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) हां मंग !!!! तुला काय वाटला? तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन .. असेल, तसेही असेल. ज्याला जे समजायचं तो ते समजू शकतो. आपण कोणाकोणाची तोंडं धरणार? माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! - (अलबेला'च')ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 17/04/2008 - 12:24
>>माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! बेक्कार डिप्लोमसी ... आयला शिकलं शिकलं .. बेण हुश्शार झालं !

Bandopant 16/04/2008 - 14:18
अर्थ, संदर्भ गोठून जातील जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील पण एकटं असताना तेच तर माझी साथ देतील! झक्क्कास

पिस्तुल्या 16/04/2008 - 20:06
अबब!! लय भारी बुवा. काय कविता आहे . आवडली बुवा. असच॑ मनापासून लिहीत जा. आम्ही फक्त वाचणार बुवा!! -तुमचा आमचा सर्वा॑चा पिस्तुल्या

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!

भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?

अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!

मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?

वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी

नको मारू खडा रे सख्या

फटू ·

शुचि 05/05/2010 - 05:24
आवडली कविता सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव

महात्म्याला आदरांजली.

नीलकांत ·

भाई 11/04/2008 - 23:17
जोतिराव फुलेंनी हिन्दूंच्या देव-देवतांबद्दल किती हिडीस अणि घृणास्पद लिखाण केले आहे हे आपणास माहित आहे काय? महात्मा कशाबद्दल? त्यांच्याइतकेच कार्य करणारे ब्रह्मणही होते सावरकर, आगरकर, कर्वेंसारखे. त्यांनातर वैयक्तिक कारणही नव्हते फुल्यांसारखे. ब्रिटिश राजवट ही ईश्वराने (त्यंच्या भाषेत 'निर्मिकाने') इथल्या शूद्रांस धूर्त आर्यांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी मुद्दाम पाठविले होते. त्यासाठी प्रत्येक गावात एक एक मिशनरी पाठवून त्याला जमीन देऊन त्याच्यावर उपदेशकाचे काम सोपवावे अशी विनंती ब्रिटिश सरकारला करणारे हे महत्मा कसे?

In reply to by भाई

विकास 12/04/2008 - 05:19
तुम्हाला कोणी काही सरळ (डायरेक्ट) सामाजीक त्रास देत नाही. कदाचीत सध्याच्या सामाजीक अवस्थेत राजकारणी जातीव्यवस्थेचा वापर करतात म्हणून काही आलेल्या अनुभवाने गांजलेले देखील असाल. पण तरी इतका त्रागा होतो. परदेशातपण कधी कधी आपल्याला वांशिक अनुभव हलकेच का होईना पण कधीतरी येतात आणि आपण तात्काळा चिडतो (हे अर्थात मी माझ्या अनुभवावरून तसेच इतरांचे जे पाहीले आहे त्यावरून बोलतोय). अगदी गांधीजींचे पण असे झाले तर आपण किस झाड की पत्ती! कुजलेल्या राजकारणाची अथवा छुप्या वंशवादाची चिड येणे हे साहजीक आहे. (शाहू महाराजांचे नाव घेत नाही कारण ते सुधारक असले तरी तथाकथीत अस्पृश्यवर्गातील नव्हते आणि काही झाले तरी राजे होते म्हणून गोष्ट वेगळी) पण मग फुले झाले, आंबेडकर झाले आणि तत्सम अनेक जे शतकानूशतकांच्या ह्या अक्षम्य बेड्यातून शिक्षणामुळे बाहेर पडले आणि स्वतःच्या पूर्वजांचे, स्वतःचे आणि तत्कालीन भाईबंदांचे हाल कळले. अशा वेळेस जर त्यांचा त्रागा झाला आणि काही गैर बोलले असले तरी त्याबद्दल आश्चर्य वाटायचे आणि त्यामुळे त्यांच्या इतर कार्याबद्द्लच्या महात्म्य कमी करण्याची गरज नाही. सावरकर, आगरकर, कर्वे - आपण घेतलेली ही सर्व नावे महान नाहीत असे कोण म्हणतो? आज फुल्यांचा जन्मदीन म्हनून त्यांच्या बद्दल नीलकांतनी लिहीले. त्यात एकाला महान म्हणले म्हणून बाकीचे लहान होत नाहीत. पण जसे आंबेडकर-फुल्यांना केवळ उपेक्षितांचे आणि तेही विशिष्ठ जाती सोडून इतरांचे मानणारे हे त्यांचे कार्य आणि त्यांची महानता कमी करतात (ते या चर्चारंभात नाही हे स्पष्ट करतो), तसेच काहीसे आज सावरकर-आगरकर-कर्व्यांबद्द्ल झाले. त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असो.

In reply to by विकास

चित्रा 12/04/2008 - 05:50
त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असेच.

नीलकांत 11/04/2008 - 23:39
खरंय - गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो? ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो? समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो? शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो? त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो? समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो? महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो? खरंच असे एक ना अनेक प्रश्न मला पडताहेत. भाईंना एक विनंती आहे की आगरकर सोडले तर इतरांचा जो उल्लेख केला आहे त्यांचा आणि फुल्यांचा कालखंड पडताळून बघावा. आगरकरांना का सोडावं तर आगरकरांच काम वैचारीक होतं आणि संघटनात्मक बाजूला त्यांनी स्पर्श केला नव्हता. यामुळे आगरकरांच काम कमी होतं असं नाही. आगरकरांबद्दल स्वतंत्र लिहीनच. पण अशी जीभ उचलून काहीही बोलण्या आधी किमान एक वेळा फुलेंचं चरित्र वाचा. मग बोलूया की कुणाला आणि का महात्मा म्हणावेसे वाटते ते. ह्या विषयावर चर्चा करायला आवडेल. पण मुद्दे असावेत. किमान लेखाच्या खाली दोन या विषयाच्या अधिकारी मानसांच्या लेखांचे दूवे दिले आहेत ते वाचण्याची तरी तसदी घ्या की राव. नीलकांत

In reply to by नीलकांत

भाई 12/04/2008 - 00:22
तोच उद्देश आहे. सध्याच्या दिवसात फुले, आंबेडकर आणि शाहू याच्या कर्तृत्वाबद्दल तौलनिक अभ्यास न होता केवळ मतांसाठी उपयुक्त असल्याने जयघोष केला जातो. मलाही यानिमित्ताने फुल्यांचे महात्मापण समजले तर बरे होईल (निदान 'पुरोगामी'पणाचा शिक्का तरी बसेल). आगरकरांनी संघटना बंधाली नाही म्हणून या संदर्भात त्यांना वगळण्याची कारणमीमांसा समजली नाही. विषय आहे महात्मा का? तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. फुलेंनी उघड उघड ब्रिटीश राज्याची बाजू घेऊन देशद्रोह केला. ब्रह्मणांचा टोकाचा तिरस्कार केला, इतरांच्या धर्मभावना दुखावण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला. ही सारी महात्म्याची लक्षणे? महात्मा याचा संत असा अर्थ होतो. फुलेचे आयुष्य संतासारखे होते का ते आपणही तपासावे. विधवांच्या प्रश्नावर काम कराणारे फुले एकटेच नव्हते. कित्येक जण स्वतःला वैयक्तिकरीत्या त्रास न होऊनही केवळ सहानुभुतीतून खूप मोठी कार्ये करून गेले. त्यांना अनुल्लेखाने मारायचे. फुले एकटे मात्र महात्मा. हे न्याय्य नाही पण फायदेशीर आहे.

In reply to by भाई

धनंजय 12/04/2008 - 02:11
ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते. सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले. फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार? तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.

In reply to by भाई

मुक्तसुनीत 12/04/2008 - 03:08
भाई म्हणतात : तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. नीलकांत यांनी तपशीलवार त्यांच्या कार्याची यादी देऊनही , "केवळ अमुक अमुक केल्याने" असे म्हणणे म्हणजे ऐकून न ऐकण्याचे , किंवा पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे निदर्शक आहे. बरे , बंड केले म्हणजे काय ? हिंसेचा मार्ग अनुसरला ? झुंडशाही केली ? शतकानुशतके काळोखात पडलेल्यांचे प्रबोधन केले. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. गांधींना महात्मा ही पदवी दिली गेली होती हे तुम्हाला अज्ञात असावे. किंवा सोयीस्कररीत्या त्याचा विसर पडलेला असावा. फुले नि आंबेडकर यांच्या नावाचा आज बाजार झाला असे कुणाला वाटत असेल तर त्यात या दिवंगत विभूतिंचा दोष नाही. साप साप म्हणून भुई धोपटणार्‍यानी हे लक्षात घ्यायला हवे.

In reply to by भाई

महाराष्ट्रातील आद्य कर्ते सुधारक, थोर विचारवंत,आणि 'सत्यशोधक समाजा'चे संस्थापक असणा-या म. फुले यांनी आयुष्यभर अस्पृश्य,स्त्रिया,शेतमजूर, इत्यांदींच्या जीवनासाठी वाहून घेतले होते. स्वातंत्र्य, समता,मानवता, विश्वबंधुता या जीवनमुल्यांची प्रत्यक्ष कृती आणि लेखनाद्वारे प्रचार त्यांनी केला. म्हणुनच जनसामान्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे 'महात्मा'म्हणुन संबोधले असावे. भाइसाहेब, जोतिरावांचा विचार मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा होता.समतेकडे नेणारा होता. भारतातील परंपरागत समाजसंस्थाच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष जोतिबा असावेत. सामाजिक जन्मसिद्ध उच्चनीच भाव हे ईश्वरी संकेताने व माणसाच्या पुर्वकर्माने निर्माण झालेले आहेत, म्हणुन यांच्याविरुद्ध प्रयत्न करणे हे महापाप आहे, अशी समजूत येथील समाजमनात होती तेव्हा जोतिबांनी हजारोवर्षापासूनच्या या बंधनांना तोडण्याचे काम केले. शाश्वत नैतिक सत्य हा त्यांच्या विचारांचा पाया होता. सत्यशोधक आंदोलनाच्या मुळाशी विधायक स्वरुपाच्या ध्येयाचा विचार होता आणि तो म्हणजे मानवी हक्काचा विचार म्हणावा लागेल. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करुन सर्व मानवांना मुक्तकरण्याचा विचार जोतिरावांनी दिला. समाज परिवर्तनाच्या कितीतरी चळवळींचा पाया म. फुल्यांनी घातला. धर्मग्रंथाची चिकित्सा केली, जातिव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला, ज्ञानाची महती समाजमनावर बिंबवली, शेतक-यांच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणा-यांवर त्यांनी 'शेतक-यांचे असुड' मधे कोरडे ओढले. अहो, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे शिक्षणाची अमुलाग्र पुनर्चना हा विचार खूप काही शिकवणारा आहे. भाइसाहेब, 'तृतीय रत्न' नाटक वाचा म्हणजे कळेल तेव्हाचा समाज काय गम्मत होती म्हणुन. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी जेव्हा नाटकातून दिला तेव्हा येथील समाज वाचू-लिहू शकत नव्हता तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुल्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. मानव्याच्या विकासासाठी माणूस जागा करण्याचे काम जिवनवादी साहित्यातून म. फुल्यांनी केले. प्रश्नांचे मोहोळ जागे करण्यातच ज्ञानाचा उगम असतो, हे सुत्र फुल्यांनी लेखनातून उचलून धरले. म्हणुन मला तरी म. फुले हे 'महात्माच' वाटतात. नीलकांतने एका महामानवाच्या विचारावर माहिती दिली, लेखनाचे दुवे दिले या निमित्ताने पुन्हा फुल्यांच्या विचारांची उजळणी होईल, चर्चा होईल, त्या बद्दल 'नील' ला धन्यवाद देतो. आणि या समाज क्रांतीच्या दुताला आम्ही विनम्र अभिवादन करतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:37
चर्चेची पातळी योग्य राखल्याबद्दल आधी सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार. फुले हे बंड करण्याचे धाडस दाखविणार्‍यांपैकी एक होते. त्यांनी काही मैलाचा दगड ठरावीत अशी कामे केली. या बाबींबद्दल मी काहीच नाकारले नव्हते तर मग चर्चा त्यावरच केंद्रित का? सर्वसामान्य माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाली की तो चिडतो. त्याच्या कुवतीप्रमाणे तो त्याविरूध्द प्रतिक्रिया देतो. ज्यांनी त्याला त्रास दिला त्यांच्याबद्दल त्रागा करणे (एका प्रतिक्रियेत हेच कारण दिले आहे), त्यांची निंदा नालस्ती करणे, सरसकट त्या समूहाला एकाच मापाने मोजणे, त्याचे गुणही नाकरणे इत्यादी मार्गांनी तो त्याचा सूड व्यक्त करतो. कुवत/ऐपत खूप जास्त असेल तर मग त्या लोकांना नष्ट करण्याचाही मार्ग अवलंबला जातो. फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? महात्मेपणासाठी येशूइतकी कणव असावी सर्वांबद्दल - फक्त माझ्या जातीबद्दल नव्हे. येशूचे नांव परिचित म्हणून घेतले. महाराष्ट्राला ज्ञानेश्वरही लाभले होतेच. इतका छळ सत्रागा''त्रागा' आणि घृणा कधीच दिली नाही. ते खरे संत - महात्मा. स्वानुभुतीमुळे येणारी कणव आणि निव्वळ परानुभुती (एम्पथी) मुळे निर्माण होणारी कणव यात दुसरी अर्थातच श्रेष्ठ आहे. दुसर्‍याला होणारी पीडा जो दूर करायचा प्रयत्न करतो तो खरा सह्रदय - महात्मा. मुसलमानांनी माझ्या पूर्वजांचा छळ केला म्हणून मी आज सर्व मुसलमानांना तिरस्कार केला तर मी संकुचित आणि जातियवादी; पण, मी ब्रह्मणांचा द्वेष केला तर मात्र मी संकुचित तर नाहीच उलट मी पुरोगामी (व जमलेच तर नंतर महात्मा - कल्पना करा - महात्मा मायावती, महात्मा कांशीराम). विचार करा, सावरकर जर स्वतः ब्राह्मण नसते तर? आज त्यांच्या दलितोध्दारक कार्याचा केवढा गवगवा झाला असता? आगरकरांचेही तेच. राजा राम मोहन रॉय? र धों कर्वे (स्वतः विधवेशी लग्न करणारे) असे कित्येक. ज्या सर्व उच्चवर्णिय सुधारकांनी अशाप्रकारे केवळ परपीडेची कल्पना करून, वैयक्तिक स्वार्थ नसताना, स्वतःच्याच गणगोत/आप्तस्वकिय यांच्याशी वैर पत्करून हे काम केले ते खरे 'महात्मा' या शब्दास जास्त जवळ नाहीत? फुले जर ब्राह्मण असते तर आज बहुजन समाजाने त्याना असे डोक्यावर घेतले असते? इथे मी जात आणत नाहीये (संदर्भ- एक प्रतिक्रिया) तर मी फक्त या समाजातली वस्तुस्थिती दाखवतोय. हाच तर जातीवाद नाही का? सावरकरांचे भारतीयांना ब्रिटीश फौजेत जाण्याचा सल्ला देणे हे अथपासून इतिपर्यंत भारताच्या फायद्यासाठीच होते. त्यांनी त्यांचा उद्देश कुठेही लपवला नव्हता. सांगतानाच त्यानी असे का करावे हे अतिशय स्प्ष्टपणे मांडले होते. आणि, सावरकरांची देशभक्ती तोपर्यंत सर्वज्ञात झालेली होती त्यामुळे त्यांच्या सुचनेचा फायदा झाला असता की नाही यावर वाद होऊ शकतो पण त्यामगच्या देशहिताच्या कळकळीबाबत संशय असू शकत नाही. फुल्यांच्या चरित्रात देशभक्तीचे स्थान ठळक नाही. त्यामुळे तुम्ही फुले फॅन असाल तरच तुम्हाला त्यांच्या ब्रिटीशधार्जिणेपणाची शंका येणार नाही. पाहुण्याचा हातून साप मारणे याला म्हणत नाहीत कारण पाहुण्याला घराचा ताबा घेण्याचाच आग्रह आहे हा. जेव्हा मी, स्वत:चे निवांत आयुष्य सोडून समाजासाठी खडतर आयुष्य स्विकारणार्‍या कित्येक ज्ञात/अज्ञात व्यक्तींना सरसकट महात्मा म्हटले जात नाही असे म्हणतो तेव्हा गांधी हा अपवादच असतो. अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? मग एकटे फुले (आणि गांधी - माझ्या आठवणीबद्दल परत शंका नको) तेवढे 'महात्मा' का?

In reply to by भाई

मुक्तसुनीत 13/04/2008 - 04:30
एकूण भाईंचा सगळा रोख आहे तो फुले यांच्यासारख्यांचे नाव घेऊन जो जातिविद्वेष पसरविला जातो त्याकडे आहे असे दिसते. मात्र त्या विद्वेषाकरता ते सरळ फुल्यांबद्द्ल कडवटपणा व्यक्त करतात. थोडक्यात फुले यांना ते , मायावती, कांशीराम (आणि त्यांच्यासारखे इतर) यांच्या रांगेत आणून बसवतात. गांधींबद्दलच्या एका टिपणामधे मी म्हण्टले होते : "गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे." हेच विधान इथे लागू करायला हवे. भाई म्हणतात : फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? फुल्यांच्या "हिंसे"बद्द्ल बोलताना थोडे संदर्भ , अवतरणे दिले असते तर फार बरे झाले असते. नीलकांत यांनी फुल्यांच्या कार्याबद्दल बोलताना कित्येक संदर्भ, विशेष खोलात जाऊन दिले आहेत. फुल्यांवर शब्दिक हिंसेचा आरोप माझ्या मताप्रमाणे थोडा अभिनव आहे. तेव्हा प्रतिवाद करताना - विशेषतः आतापर्यंतच्या रूढ विचारसरणीला तडा देताना - थोडी काळजी घ्यायला हवी. "जर सामर्थ्य असते तर फुले हिंसक बनले असते" हा मुद्दा मला वाटते , "आत्याबाईला मिशा असत्या तर ...." , "मला लाखाची लॉटरी फुटली तर ...." या दर्जाचा (आणि त्यातील आरोपामुळे गंभीर स्वरूपाचा) आहे. ज्या व्यक्तिने सर्व आयुष्य विधायक कार्याकरता वेचले त्यावर असले "जर ..तर" चे आरोप लावणे योग्य आहे काय ? अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? भाईंनी विकास यांचे म्हणणे वाचल्यास त्याना समजेल की त्याना हेच म्हणायचे आहे. भाईंनी जो युक्तिवाद सांगितला आहे त्या न्यायाने, ज्याच्यावर जाति-वंश-वर्ण आदि गोष्टींवर आधारित अन्याय झालेला नाही, परंतु तरीही जो "उद्धार" करण्याचा क्रूस आपल्या खांद्यावर घेतो , केवळ तोच महात्मा ठरावा. या न्यायाने केवळ ख्रिस्त, बुद्ध हेच महात्मा ठरतात. असो. काही विशिष्ट घटकांचे राजकारण, समाजकारण हे निश्चित विद्वेषमूलक आहे ; त्यामधे फुले-आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून द्वेष फैलावला जातो हे अगदी खरे; परंतु या गोष्टींकरता त्या त्या माणासाबद्दलची कटुता बाळगणे चुकीचे आहे.

In reply to by मुक्तसुनीत

भाई 13/04/2008 - 09:01
अगदी नीलकांत यांनी दिलेला दुर्गाबाई भागवतांचा लेख तरी वाचू शकता. त्यात दिलेली वनगीदाखल अवतरणे शब्दिक हिंसेची कल्पना येण्यास पुरेशी आहेत. फुलेंचा स्वतःचा या विषयाचा अभ्यास नसताना हिंदूंच्या देवदेवतांबद्दल अपमानास्पद लिखाण ही शाब्दिक हिंसा नाही तर काय आहे? सामजिक रुढींचा प्रतिवाद तार्किक मांडणी करून करता येतो. त्याकरता हिंदूंच्या देवदेवतांना वेठीस धरायची आवश्यकता नाही. हिंदूंचे देव हे इस्लाम अथवा तत्सम 'पुस्तकाधारीत' धर्मांप्रमाणे रुढी स्वतः निर्माण करत नाहीत. असे असताना इतके तिरस्कारयुक्त आणि विनाधार लिखाण कराण्यामागे काही 'डावपेच' होता का? मुळात तो लेख त्यांना लिहावा लागला याचे कारणही मुळात फुलेंचे लिखाण व बोलणे याबद्दल त्याकाळी (१९८९) निर्माण झालेला असंतोष हेच होते. (किंबहुना, त्या लेखाचा शेवटचा परिच्छेद तर केवळ बचावात्मक वाटतो. तो परीच्छेद नसता तर म.टा. ने तो लेख छापला नसता ना नीलकांत यांनी तो दुवा इथे दिला असता. आणि दुर्गाबाईंना त्याबद्दल काय काय सहन करावे लागले असते ते निराळेच. ). जर एखादी व्यक्ती शाब्दिक हिंसा वारंवार करू शकत असेल तर सामर्थ्य/सत्ता प्राप्त होताच ती प्रत्यक्ष हिंसा करू शकेल हे यथातर्क आहे. फुलेंच्या बहुतेक कार्याबद्दल मला जो काही आदर निर्माण होतो तो त्यांच्या द्वेषमूलक लिखाणामुळे कमी होतो. इथे अनुयायांचा प्रश्न नाही तर मुळात त्या व्यक्तीचाच आहे. आजचे अनुयायी त्या थोर पुरुषांची हीच विचारसरणी उचलू पाहतात कारण त्याला त्यांच्या दृष्टीने नैतिक अधिष्ठान प्राप्त होते - "ब्राह्मणांना हाणा कारण फुलेबाबानी सांगितलया". एकदा त्या माणसाला 'महात्मा' बनविले की मग त्याच्या सर्वच गोष्टी योग्य ठरतात आणि आधार म्हणून घेतल्या जातात. थोर मात्र माणूसच अशी भूमिका असेल तर त्या माणसाची प्रत्येक बाब चिकित्सेला उपलब्ध राहते.

In reply to by भाई

आजानुकर्ण 13/04/2008 - 22:57
आदरणीय भाईसाहेब, महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्‍यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्‍या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती. तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात. संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥ या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे. अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते. आपला, (सविस्तर) आजानुकर्ण एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.

विसोबा खेचर 12/04/2008 - 00:39
ज्योतीरावांना माझेही विनम्र अभिवादन..! तात्या. अवांतर - ( ह घ्या) १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. ज्योतीरावांनी हे मात्र करायला नको होते असे माझे वैयक्तिक मत आहे! ;) तात्या.

आजानुकर्ण 12/04/2008 - 09:03
महात्मा फुले यांना आदरांजली. फुल्यांच्या जीवनकार्याचा आढावा येथे दिल्याबद्दल नीलकांतचा हार्दिक आभारी आहे. (नतमस्तक) आजानुकर्ण

ऋषिकेश 12/04/2008 - 11:38
महात्मा ज्योतिराव फुल्यांना विनम्र आदरांजली. त्याच्या साहित्याचे वाचन आणि मनन सध्याच्या "दलित वोट बँकचे" राजकारण करणार्‍यांना वाचणे सक्तिचे करावेसे वाटते नीलकांत यांचे देव्यांबद्दल आणि एकूण आयुस्यातील प्रमुख घटनांच्या धांदोळ्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आंबोळी 13/04/2008 - 14:28
कुठलाही जातिय अभिनिवेश न बाळगता अत्यन्त समतोल चर्चा केल्याबद्दल निलकान्त्,धनंजय,मुक्तसुनीत,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ,विकास ,भाई आणि इतरान्चे अभिनन्दन.

Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

ढोकळा

चकली ·

वरदा 11/04/2008 - 22:28
पण ते पीठ तू भिजवून ठेवत नाहीस का? मी रात्री बेसन ताकात भिजवते मग सकाळी त्यात बाकीचं साहित्य घालून इनो शेवटी घालून करते...थोडं लसूण पण छान लागतं अर्थात आवडत असेल तर...

In reply to by वरदा

चकली 12/04/2008 - 01:38
वरदाताई मी पिठ भिजवून नाही ठेवले, सर्व जिन्नस एकत्र करून बेसनपिठ भिजवले आणि लगेच ईनो घालून वाफवायला लावले. चकली http://chakali.blogspot.com

प्राजु 12/04/2008 - 00:18
इनो ऐवजी सायट्रीक असीड.. म्हणजे लिंबू फूल म्हणून एक प्रकार मिळतो.. तो घालते. मात्र झाकणाला कापद बांधायचि कल्पना आवडली. नाहीतर ढोकळा तयार झाला की त्यात वरती वाफेचे पाणी पडलेले असते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:07
अतिशय सुंदर पाककृती..! चकलीला धन्यवाद..! तात्या. अवांतर - ढोकळ्याचे प्रकाशचित्रं सुंदरच आहे, ते इथेही द्यावेसे वाटले म्हणून दिले आहे. त्याचप्रमाणे ढोकळ्याच्या प्रकाशचित्राच्या ऐवजी जो दुवा दिला होता तो दुवाही मूळ प्रकाशचित्रं इथे देऊन त्या खाली दिला आहे, जेणेकरून इच्छुकांना त्या दुव्यावर जाऊनही वाचता येईल. हे बदल आपल्या पूर्वपरवानगीशिवाय केले आहेत, क्षमा असावी! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली 14/04/2008 - 21:46
तात्या, पुढच्या वेळेपासून मीच छायाचित्र आणि दुवा देत जाईन, यावेळी ते काम तुम्ही केलेत याबद्दल तुमचे धन्यवाद :) चकली http://chakali.blogspot.com

झाकणाला फडके बांधायची कल्पना मस्त.:) फोटो पाहून आताच करावासा वाटतो. कृती छान आहे, तुझ्यासारख्या सुगरणी कडून अशाच छान छान चवदार रेसिपी येऊ देत, वाट पाहात आहे, पुढच्या रेसिपीची....

ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे. हे ऐकले होते पण कधी करून नाही पाहिले.आता या वेळी ढोकळा केला की असे करून पाहतेच. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:09
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) क्या बात है! याला म्हणतात "दाद!" :) मिपाच्या वैशिष्ठ्याला जागलीस बरं स्वाती! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली 14/04/2008 - 21:58
तात्या, मिपाचे एक वैशिष्ठ्य मला नेहमी जाणवते. मी जेव्हा ब्लॉगवर पाककृती लिहिते ते सिनेमासारखे असते म्हणजे लोक पाहून जातील कदाचित प्रतिक्रिया देतील..पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. सगळ्यांना धन्यवाद चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

विसोबा खेचर 15/04/2008 - 00:53
पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. चकली, वरील वाक्य लिहून तुम्ही मिपाचा सन्मानच केला आहे! मन:पूर्वक धन्यवाद! अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ आणि तुमचे इतरही लेखन मिपावर येऊ द्यात, ही विनंती! मिपा तुमचंच आहे... तात्या.

In reply to by स्वाती दिनेश

चकली 14/04/2008 - 21:52
धन्यवाद स्वाती, लिंबू, साखर व पाणी फोडणीत मिक्स केल्याने खरंच खुप मस्त चव येते. युक्ति अर्थात माझ्या गुजराथी मैत्रिणीची.. मी बराचसा ढोकळा या मिश्रणाबरोबरच खाते अगदी चटणी न घेता.. आणि नुसती तेलाची फोडणी सर्व ढोकळ्याला पुरतही नाही. चकली http://chakali.blogspot.com

वरदा 14/04/2008 - 21:52
काय मस्त दिसतोय..अगं मला ताई नको गं म्हणू अवघी २५ वर्षाची आहे मी... बरं मग आता मी असा करुनच पाहीन..कुणी येणार असेल तेव्हा पटकन करायला बरं... बाकी ते चित्र एकदम सॉलीड आहे...ती कापड लावायची आयडीया मलाही नव्हती माहीत..मस्तच...तुझ्या ब्लॉगस्पॉटलाही भेट दिली मस्तच आहे....

नमस्कार, याप्रकारे ढोकळा मस्त होतो.

थोडे असे, थोडे तसे

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

बंगळूरवासी मिपाकर...

सर्वसाक्षी ·

छोटा डॉन 14/04/2008 - 10:51
अहो कधी पण या, आम्ही आहोत इथेच ... प्रतिक्रीया देण्यास थोडा लेट झाला पण असो या तुम्ही ... आणि जमल्यास नाही नक्की फोन करा ... ९९८०१०३७१० शहंशाह-ए-बंगरूळीस्तान छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वयंभू 14/04/2008 - 12:57
अम्हीही आहोतच ०९८४५६५५५५८ आपला, स्वयम्भू

लेखनप्रकार
बंगळुरात कुणी मिपाकर आहे काय? पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे, जमल्यास गाठ भेट होईल.

भारत एक खोज

परीचा परा ·

नीलकांत 11/04/2008 - 23:06
लहान असतांना :-) ही मालिका बघायचो. तेव्हा आधी व शेवटी येणारे चाचा नेहरू आवडायचे. ह्या मालिकेत शिवाजी महाराजांचे काम नसिरुद्दीन शहाने केले आहे. झकास काम केलं त्यांनी. 'डिस्कव्हरी ऑफ इन्डीया' या पुस्तकाचे लेखन पंडीत नेहरूंनी अहमदनगरच्या तुरूंगात असतांना केलं. या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अनादरपुर्वक उल्लेख होते ज्यावरून त्याकाळी वादंग झाला होता. नीलकांत

रामदास 11/04/2008 - 23:28
हे नासदीय सूक्त आहे. संपूर्ण हवे आहे का? अर्थासहित.विश्व निर्मिती ची संकल्पना त्यात मांडली आहे. दुसरा पर्याय असा की शंकर निकम यांचे विश्व चैतन्याचे काल चक्र हे पुस्तक वाचावे.

In reply to by रामदास

परीचा परा 14/04/2008 - 14:35
अरे रामदासराव द्या की... चांग्ल्या कामासाठी वाट पाहू नये. नासदीय सूक्त माहिती होत असेल तर कोण नाय म्हणेन? पुस्तक नक्की वाचेन.... डोस्क्यात भर पडणार असेन तर कोण नाही म्हणेन. अवांतरः रामदास स्वामि ते काय तुमीच काय? {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

इनोबा म्हणे 11/04/2008 - 23:52
या जवाहरलाल नेहरुचा मी तिरस्कार करतो. ज्याची लायकी नसतानाही केवळ काँग्रेसचा एक नेता असल्यामुळे तो देशाचा पंतप्रधान बनला. टिळक,सावरकर,सुभाषचंद्र, भगतसिंग,सुखदेव्,राजगुरु,आझाद सारख्या सच्च्या देशभक्तांच्या पाठीत सुरा भोसकणार्‍या काँग्रेसचाही धिक्कार असो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अघळ पघळ 13/04/2008 - 01:20
नेहरू गांधींचा तिरस्कार असो..राज ठाकरेंचा विजय असो.

विसोबा खेचर 12/04/2008 - 09:15
जिस के बल पर तेजोमय है अंबर पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर स्वर्ग और सूरज भी स्थिर ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर वा! सुंदर... परंतु...... वाटले मिसळपावकरांबरोबर वाटून घ्यावा हा आनंद...म्हणून आम्ही लिव्हले हाय... ठीक आहे. परंतु त्याचसोबत आपलीही काही रसग्रहणात्मक टिप्पणी त्यावर केली असतीत तर अधिक बरे झाले असते! मिपावर ह्या प्रकारच्या लेखनाला/कॉपीपेस्टला मनाई आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा, ही कळकळीची विनंती..! तात्या. -- छ्या! लोकांना स्वच्छ मराठीत लिहिलेल्या सूचना का समजू नयेत याचे सखेद आश्चर्य वाटते! यापुढे 'पुढे ढकललेले' लेखन किंवा नुसतेच कॉपीपेस्ट केलेले लेखन येथून उडवून लावण्याबाबत अत्यंत कठोर व टोकाची भूमिका घ्यावी लागणार असे वाटते!

आर्य 14/04/2008 - 12:58
परीचा परा आणि रामदास ! मी सुधा लहाणपणी ही मालीका फार आवडीने बघायचो ..........आणि याचे आणि गीत तर जीव की प्राण होता. काही वर्षांन पुर्वी ही शोधण्याचा फार प्रयत्नाही केला होता...........आज हे वाचुन मना पासुन आनंद झाला या करीता परीचा परा , रामदास आणि मी.पावला धन्यवाद ! आपला (आभारी) आर्य

भरपूर वर्षांपूर्वी भारत एक खोज ही मालिका नेमाने पहायचो. तेव्हाचे ते टायटल चे मंत्र जाम आवडायचे आम्हाला. मायाजालावर आम्हाला ते मिळाले ...

काही आठवत नाही

शितल ·

मनापासुन 11/04/2008 - 17:56
११ वीत असताना ...... एक तुच हवी होतीस मला साथ देण्यासाठी मला उगीच वाटले होते की सरकारने लग्नाचे वय कमी करायची उगीच शिफारस केली. बहुदा हे विचार तुम्ही लिहीण्या अगोदर त्याना कळले असावेत.

एक स्पर्श हवा होता धु॑द क्षण जगण्यासाठी हल्ली अकरावीत काय काय मस्त शिकवतात! मजा आहे बॉ तुमची!! बघतांय ना, प्रमोदकाका, चतुरंगजी? आमच्याकाळी कबिराचे दोहे, तुलसीरामायणातले उतारे वगैरेच शिकवायचे!:((( प्रोफेसरणीपण अगदी भांडी-कपडा असायच्या!!:((( हल्लीच्या सारख्या सुस्वरूप (टंच म्हणणार होतो, पण... जाऊद्या!!) नव्हत्या!! हल्लीच्या पिढीचा मत्सर करणारा, पिवळा डांबिस

ही कविता मी ११ वीत असताना वाचली होती एक तारका हवी होती आकाश सजविण्यासाठी एक स्पर्श हवा होता धु॑द क्षण जगण्यासाठी एक तुच हवी होतीस मला साथ देण्यासाठी

नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

सागर ·

मला लहान असताना वाचलेले एक पुस्तक आठवत...नाव होत..."सामर्थ्य कोणाचे गर्व कोणाला" लेखक नाही माहीत.....पण त्या पुस्तकात सर्व उपनिषदातल्या गोष्टी दिल्या होत्या........ सुरेख पुस्तक होत ते एकदम...

मनापासुन 11/04/2008 - 17:13
नचिकेताने यमाला मृत्यु चे रहस्य विचारले. त्यावर यमाने त्याला निरनिराळी प्रलोभने दाखविली. नचिकेत बधला नाही शेवटी यमाने त्याला रहस्य सांगितले

In reply to by मनापासुन

सागर 11/04/2008 - 17:27
हा आताशा थोडेसे आठवले बुवा... मला वाटते नचिकेताला एका प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे होतआहे?""त्याचा मृत्यू केव्हा आहे?" त्याने आधी यमाला विचारले - यम म्हणाला याचे उत्तर मृत्यू देऊ शकतो. मृत्यूला विचारले तो म्हणाला भगवान शंकरांना (की विष्णू)विचारावे लागेल ते सगळे भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरांनी नचिकेताकडे पाहिले आणि नचिकेत मरुन पडला. यम-मृत्यू आणि शंकर (विष्णू) हे तिघे एकत्र आले की नचिकेताचे मरण लिहिले होते... कदाचित हा विनोदही असेन पण ही कथा मात्र आठवली...

In reply to by अवलिया

सागर 11/04/2008 - 17:22
अहो नाना, इकडे बंगळूरात आता कठोपनिषद कोठून आणणार मी? नचिकेताचे उपाख्यान मी लहानपणी वाचले होते. पण आत्ता कप्पाळ आठवत नाही... म्हणून हा चर्चाप्रपंच. आताशा कठोपनिषद इंटरनेटवर मराठीत कोठे मिळाले तर सोन्याहून पिवळे... पण कठोपनिषद वाचण्याआधी नचिकेताची कथा माहीत असणे अधिक चांगले असे मला वाटते... अगदीच कोरी पाटी नको कठोपनिषद वाचताना काय? (नचिकेताच्या आणि यमाच्याही शोधात)सागर

In reply to by व्यंकट

सागर 11/04/2008 - 19:44
व्यंकटराव, मदतीबद्दल आभार. हो मला ती व काही साईटस माहीत आहेत http://www.sanskritweb.org/ http://sanskritdocuments.org/ http://sanskrit.safire.com/Sanskrit.html पण मला मराठीतून माहिती हवी आहे धन्यवाद सागर

झकासराव 11/04/2008 - 17:31
बर्‍याच वर्षापुर्वी कथा वाचली होती. बहुतेक चांदोबात असेल. नचिकेताला त्याच्या वडिलाने तस बोलल्यावर त्याने यमाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो जात राहिला सगळी संकटाना तोंड देवुन. पण यमलोकाच्या दरवाज्या पाशी त्याला तीन दिवस उपाशी पोटीच झोपावे लागले / वाट पहावी लागली. ह्या गोष्टीच पातक नको म्हणून मग यमाने त्याला वर दिला (की तीन वर दिले??) त्यात काहिही माग अस बोलताच त्याने शेवटच्या वरासाठी "ज्ञान" मागितले. (बहुतेक मृत्युच रहस्य वर मनापासुन यानी लिहिल्याप्रमाणे असेल मला नक्कि आठवत नाही) त्यावर यमाने त्याला बरेच पराव्रुत्त केले आणि त्याला निरनिराळी प्रलोभने दाखवली पण त्याने यमाला ते ज्ञान द्यायलाच लावले. ही कथा बर्‍याच वर्षापुर्वी (बहुतेक मी शाळेत असताना) वाचली असेल. खात्री करुन घ्या.

In reply to by झकासराव

सागर 11/04/2008 - 19:48
झकासराव, बरोबर... नचिकेताने ज्ञान मागितले होते आणि त्याचा मृत्यु कसा होणार आहे हे देखील जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित यमाने ही सगळी प्रलोभने त्याला परावृत्त करण्यासाठी दाखविली असावीत. नचिकेताच्या मृत्युबाबत मी सांगितलेली गोष्ट खरी आहे की काय? ( नचिकेताच्या शोधात) सागर

माझ्याकडे एक पुस्तक आहे ज्यात नचिकेतचि गोष्ट आहे , उद्या वाचुन तुम्हाला नक्की सान्गेन [श्राद्ध ] हे पुस्तक प. पुज्य पान्डुरन्ग शास्त्रि ह्यानी लिहिले आहे

In reply to by धनश्रीदिनेश

सागर 11/04/2008 - 19:52
धन्यवाद धनश्री, वाट पाहीन :) (नचिकेताच्या चाहूलीने प्रफुल्लीत झालेला)-सागर

In reply to by धनश्रीदिनेश

सागर 18/04/2008 - 13:39
हरकत नाही धनश्री, येथे बरीच चर्चा जरी झाली असली तरी पण तुमचे मत तुम्ही दिलेत तर मला खूप आवडेल. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. तेव्हा तुम्ही जे वाचले , अभ्यासले आहे त्यातून काही ज्ञानकण येथे पसरले तर अजून चर्चेला मजा येईन नचिकेताचे उपाख्यान हा तसेही गहन विषय आहे. त्यामुळे तुमचे विचार एक वेगळी दिशा देतील असे वाटते सागर

मनापासुन 11/04/2008 - 17:48
खात्री करुन घ्या. कशाची खात्री करुन घ्या? तुम्ही शाळेत होतात याची की तुम्हाला शाळेत असताना वाचता येत होते याची? की तुम्ही तेंव्हा काय शिकलात ते तुम्हाला आठवत नाही याची ? की तुम्हाला ज्याने शाळेत पास केले त्यानी न कंताळता पेपर तपासला होता याची? की तुम्ही बर्‍याच वर्षापुर्वी कथा वाचली होती की वाचलेली कथा नक्की नचिकेताचीच होती की नचीकेत शाळेत जात होता याची. हे मला मनापसुन पडलेले प्रश्न

In reply to by मनापासुन

झकासराव 11/04/2008 - 18:48
मजेशीर प्रतिसाद दिलात. चेहर्‍यावर हसु फुलल :) नचिकेताला यमाने काय दिले ह्या बाबत खात्री करुन घ्या. बाकीच्या माझ्या शाळेच म्हणाल तर मला खात्री आहे बर. :)

In reply to by झकासराव

सागर 11/04/2008 - 19:56
झकासराव, मनापासून धन्यवाद. ही माहिती इंग्रजीतून आहे. आणि मला मराठीतून माहीती हवी आहे सागर

परीचा परा 11/04/2008 - 19:35
हे नचिकेताचे काय गौडबंगाल आहे बुवा? आप्ल्याला तर काय बी माहित नाय... {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

In reply to by परीचा परा

सागर 11/04/2008 - 19:57
अहो मीच नचिकेताच्या शोधात आहे तर तुम्हाला काय सांगू? अवांतरः {परीच्या प्रतिक्षेत} परा .... हे आवडलं.... कोण आहे ती परी? :)

विसोबा खेचर 13/04/2008 - 09:17
मला मुळात हा नचिकेत कोण हेच माहीत नाही, आणि नचिकेतालाही तात्या कोण हे माहीत नाही! ;) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर 14/04/2008 - 13:04
हा हा ... तात्या... छान विनोद केलात. नचिकेताचे माहित नाही... पण आम्हा सगळ्यांना रोखठोक तात्या नक्कीच चांगले माहित आहेत..... ह्या नचिकेताला यमाने जे ज्ञान दिले त्यात यमलोकाचे वर्णन आले आहे. ते ज्ञात करुन घेण्यासाठी हा चर्चाप्रपंच केला आहे सागर

धनंजय 15/04/2008 - 05:12
कठोपनिषदात "कथा" अशी ८-९ श्लोकांत संपते. त्याचा तुम्ही सारांश चांगला दिलेला आहे: "एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे." वाजश्रवा गौतम, हे उद्दालक आरुणींचे पुत्र. त्यांचा पुत्र नचिकेता. एकदा ते सर्व मालमत्ता दान करत होते. बकाल मरायला टेकलेल्या गाईही दान करत होते. त्याने दान मिळणार्‍याला काही फायदा होणार नव्हता असा नचिकेताने विचार केला... त्याने एकदा दोनदा नव्हे तीनदा वडलांना विचारले "मला तुम्ही कोणाला दान म्हणून देणार?" वडील शेवटी रागावून म्हणाले - "तुला मृत्यूला दान करतो." वडलांचे ऐकून नचिकेता यमाच्या घरी जातो. यम घरी नसल्यामुळे तीन दिवस बाहेर उपाशी ताटकळत राहातो. यम परततो तेव्हा पाहुण्याच्या या अवमानाबद्दल त्याला फार वाईट वाटते. त्यानंतर यमाचा नचिकेताशी संवाद सुरू होतो. तो बाकी पूर्ण उपनिषद व्यापतो. यम नचिकेताला तीन वर देतो. नचिकेत तीन वर मागतो ते असे. १. माझ्या वडलांची काळजी दूर होऊन मला परत बघून त्यांना आनंद व्हावा - तथास्तु (२ श्लोक) २. यज्ञातल्या अग्निबद्दल ज्ञान नचिकेता मागतो. (२ श्लोक) यम त्याला माहिती देतो, असे सांगणारे २ श्लोक(पण नेमकी माहिती उपनिषदात नाही). त्या अग्नीलाच "नचिकेता" हे नाव प्रसिद्ध होईल असे यम म्हणतो. त्या अग्नीपासून मिळणारे फायदे, पुण्य सांगतो (४ श्लोक) ३. हा तिसरा मोठा प्रश्न आहे - "मृत्यूनंतर शंका येते, की मनुष्याचे काय असते? कोणी म्हणते काही असते, तर कोणी म्हणते काही नसते. तू मला शिकव, म्हणजे मला कळेल - हा माझा तिसरा वर." (१ श्लोक) यम "नको-नको दुसरे काही माग" असे म्हणतो. नचिकेता हटत नाही. (आणखी १० श्लोक) यमाला पटते की नचिकेता या ज्ञानास पात्र आहे. यम नचिकेताला "श्रेय-प्रेय" आणि "आत्मा-परमात्मा" यांबद्दल सांगतो. (९१ श्लोक) हा प्रकार जाणकारालाही समजवून सांगण्यास थोडे कठिणच जाऊ शकेल. पण मला समजले नाही तरी काव्य म्हणून फार सुंदर आहे, प्रेरणादायी आहे. (हाच उपनिषदाचा उर्वरित भाग आहे.) त्यामुळे या उपनिषदात यमलोकाचे वर्णन फारसे आलेले नाही, असे वाटते. पण बाकी कथा तुम्ही सांगितल्यासारखीच आहे.

In reply to by धनंजय

नंदन 15/04/2008 - 05:55
विस्तृत माहितीबद्दल आभार. एक बाळबोध शंका अशी की, याला नचिकेताचे आख्यान म्हणण्याऐवजी उपाख्यान का म्हणतात? तिन्ही प्रश्नांची उत्तरे हे आख्यान आणि त्यातल्या तिसर्‍या मोठ्या प्रश्नाचे उत्तर (ते ९१ श्लोक) म्हणजे उपाख्यान असे आहे की कठोपनिषद हे पूर्ण आणि नचिकेताचे तीन प्रश्न हे उपाख्यान अशी विभागणी आहे?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by धनंजय

सागर 15/04/2008 - 10:36
धनंजय, सविस्तर माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या विस्तृत माहितीने माझ्या आठवणींची काही दारे नक्कीच उघडली व आठवू लागले आहे. एकूणच यम आणि नचिकेत याचा संवाद खूप महत्त्वाचा आहे. मला नुकतेच मायाजालावर कठोपनिषद मराठीतून ध्वनि स्वरुपात सापडले आहे. जिज्ञासूंनी ऐकावे. ११ भाग आहेत http://www.esnips.com/web/Adhyatma अजून मी ऐकले नाहीत. पण नुकताच हा खजिना सापडल्यामुळे वाटले की माझ्यासारख्या इतरही अनेक नचिकेतप्रेमींना ह्या प्रवचनात रस असेन बाकी नंदन यांना पडलेला प्रश्न मलाही आहेच, याला उपाख्यान असे का म्हणतात? कदाचित कठ 'उप'निषदाचा भाग असल्यामुळे या आख्यानाला 'उपा'ख्यान असे म्हणत असावेत. (नचिकेतमय झालेला) सागर

मदनबाण 14/02/2015 - 21:36
आज तू-नळीवर Kathopanishad वर व्हिडीयो शोधत होतो... तेव्हा खालील व्हिडीयो मिळाला {जो मी पाहिला } तसेच एक जुना प्रतिसाद आठवला आणि जालावर शोधा शोध केली असता हा धागा सापडला. तसेच लोकसत्ताचा एक लेख देखील वाचनात आला { साल २०१२ } त्यामुळे व्हिडीयो आणि लिंक इथे देतो आहे. Katha Upanishad आर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }

शशिकांत ओक 16/02/2015 - 15:22
मित्रांनो, काही काळापुर्वी अहमदाबाद मधील अक्षर धाम मंदिर संकुलात जल विद्युत चलित नाट्यातून नचिकेतसची कहाणी सादर केलेली अनुभवली. प्रा अद्वयानंद गळतगे सरांनी यावर लेखन केले आहे. त्याचा धागा सादर करेन.

मदनबाण 16/02/2015 - 15:27
उपनिषद गंगा नावाची मालिका आहे त्याचे सर्व भाग इथे पहावयास मिळतील :- https://www.youtube.com/user/upanishadganga/videos मी काही भाग पाहिले आणि ते आवडले देखील. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }

नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय? असेल तर कृपया सांगावे ही विनंती. एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल. एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे. त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान. यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे. मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे. कोणी सांगेल का? (वेदोपनिषदप्रेमी) सागर

बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर

मनिष ·

ठणठणपाळ 11/04/2008 - 21:34
कविता चांगल्या आहेत पण प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही जनरल डायरची परवानगी घेतली आहे का?

In reply to by ठणठणपाळ

मनिष 12/04/2008 - 00:25
लेख माझाच आहे, रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; पण धोरणाशी विसंगत वाटल्यास हे डिलीट केले तरी चालेल.

विसोबा खेचर 12/04/2008 - 08:48
छानच आहेत कविता...! 'बरेच काही उगवून आलेले' हा कवितासंग्रह वाचला पाहिजे एकदा.. धन्यवाद मनिषराव. आपण फार चांगला परिचय करून दिला आहे.. अवांतर - रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; अगदी सहमत आहे. मिपाच्या सभासदाने स्वत:ची माहितीपर/रसास्वादात्मक किंवा भाषातरात्मक/अनुवादात्मक अशी कुठलीही टिप्पणी न केलेले, मिपाचे सभासद नसलेल्यांचे लेखन किंवा मिपाबाह्य साहित्य/लेखन उगाच जसेच्या तसे केवळ माहिती/आस्वाद म्हणून केवळ 'पुढे ढकलण्याच्या' स्वरुपात किंवा 'पुढे ढकलण्याच्या' उद्देशाने जसेच्या तसे मिपावर प्रकाशित करण्याला मिपाची मनाई आहे परंतु वानगीदाखल काही उदाहरणे देऊन त्यावर काही रसास्वादात्मक किंवा परिचयपर काही लिहिल्यास त्यात नक्कीच काही वावगे नाही! आणि जनरल डायर यांच्याकडे हे तारतम्य निश्चित आहे, त्यामुळे अजूनही असेच उत्तमोत्तम रसास्वादात्मक लिखाण मिपावर निर्धास्तपणे येऊ द्या, ही विनंती! जनरल डायर त्याचे नक्कीच स्वागत करतील अशी खात्री असू द्या! ;) तात्या.

मुक्तसुनीत 12/04/2008 - 17:36
अनेक वर्षांनी धामणस्करांच्या कविता पुन्हा एकदा वाचल्या. मनिषरावांचा शतशः आभारी आहे. धामणस्करांच्या साध्या आयुष्याबद्दल जे थोडे ऐकले त्यानुसार , आयुष्यभर डोंबिवलीसारख्या मुंबईतल्या एका उपनगरातले, वयाची तीस-पस्तीस वर्षे रोज लोकल्-ट्रेनचे धक्के खात जाणारे एक साधेसे नोकरदार आयुष्य त्यांचे होते. अशा आयुष्यात एखाद्या माणसाच्या कोवळ्या भावना, काव्यात्म वृती या सर्व गोष्टींची राखरांगोळी झाली असती. धामणास्करांच्या इतक्या सुंदर , नितळ कविता हा या दृष्टीने, मला एक छोटासा चमत्कारच वाटतो ! त्यांच्या या कविता थेट त्यांच्यासारख्या आहेत : छोट्याशा आणि विलक्षण नितळ ! "मौजे"च्या दिवाळी अंकातल्या मांदियाळीमधे त्यांची कविता अगदी नेहमी असायची. आयुष्याबद्द्ल अनाग्रही, शांत आणि विचारांचे स्फटीक गोळा करणारी. मनिषरावांमुळे या काळाची पुन्हा एकदा सफर घडली. त्यांचे.मनःपूर्वक आभार.

मनिष 14/04/2008 - 11:19
खूप वेगळ्या आणि सुरेख कविता आहेत. मी तर भारावूनच गेलो...

एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता - आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्‍या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.