आजच्या स्पर्धेच्या युगात नवयुवक भांबावून गेला आहे.... मागे पडण्याच्या भीतीने घाबरला आहे, पण आता चिंता नको...आम्ही आलो आहोत आमचे करीअर गायडंस वर्ग घेऊन...प्रत्येक भागात एका नवीन करीअर ची ओळख करून द्यायचा प्रयत्न करू...
आपल्याला गायक व्हायचे आहे काय? .. सुरेल गळा नाही, मेहनत नको, गुरूकडे शिकायला वेळ नाही? काही हरकत नाही... ते फ़ारसे महत्त्वाचे नाही...अहो एकदा आम्ही आपले काम हाती घेतले म्हणजे प्रश्नच नाही ...आमच्या ऍकॅडमीतर्फ़े आपले पॊपगायकीचे करीअर आम्ही अगदी सहज शास्त्रोक्त पद्धतीने मॅनेज करून देऊ.....होता ना,पूर्वी असा गैरसमज होता की चांगले गाणे तयार होण्यासाठी उत्तम शब्द, सुरेल आवाजावर घेतलेली मेहनत आणि मेलडी वगैरेची आवश्यकता असते...खोटंय सगळं...खास मि पा करांसाठी आम्ही आमच्या अनुभवातून उतरलेले द्न्य़ान देत आहोत...
१.तुमची इमेज महत्त्वाची आहे... तुमचं नाव कसं भारदस्त हवं..स्वत:चं फ़ालतु नाव अजिबात चालणार नाही..त्यावर सोपा उपाय आहे, अम्रुतसर किंवा भटिंड्याची टेलिफोन डिरेक्टरी घ्यावी....
तुमच्या जन्मतारखेचा जो अंक असेल त्याच्या वर्गाइतक्या आकड्याच्या पानावर जावे, वरून जन्मतारखेइतक्या आकड्याची ओळ सिलेक्ट करावी... ते तुमचे नाव.
२.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी...
३.खास भडक रंगाचे जर्द जांभळे, मोरपंखी कपडे वापरावेत...दाढी, फ़ेटा असल्यास उत्तम...
४.स्वत:ची गाणी स्वत:च तयार करा. ... (कोण म्हणाले, गीतकार वगैरे स्पेशल जॊब आहे?? काहीतरीच..गेला तो जमाना...)..थोडा पन्जाबी शब्दसन्ग्रह वाढवून घ्या..फ़ार नाही, कुडी, मुंडे, बल्ले बल्ले, शावा शावा,माही वे, तारा रारा, रबरब,वल्लावल्ला वगैरे.. ( काय म्हणता? अर्थ? अर्थाशी आपल्याला काय करायचेय??).... अहो इतक्या शब्दसंग्रहावर तुम्हाला एक अल्बम सहज करता येईल....
प्रत्येक ओळीत तेच तेच शब्द आलटून पालटून वापरावेत.. ध्रुपद तयार करायची एक सोपी युक्ती आहे, स्टीलचे भांडे जमिनीवर आपटून तो आवाज शब्दबद्ध करावा.....किंवा काही अभ्यासू आणि रिसर्च ओरिएंटेड लोकांना आम्ही मराठी बडबडगीतातील शब्द वापरायला सांगतो ( उदाहरणार्थ टुणूकटुणूक वगैरे...)
भंगडा पॊप मधील काही महत्त्वाचे गीतलेखनाचे पॆटर्न.... नमुन्यादाखल काही उदाहरणे... आपणही आपापली भरपूर बनवू शकता..
टडंग टूक ता टडंग टूक ता
तिकडम बगडम ता ता ता
ओ कुडी तेरी बल्ले बल्ले
जा मुंडे मेरे शावा शावा
धिकताना तिकताना तिकताना टिंग
तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम
माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब....
रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब....
५. मग दणकट पॊवरफ़ुल ठेका निवडून चांगल्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग उरकून घ्यावे, अगदीच अवघड जात असेल तर काही गायक आम्ही भूत-गायनासाठी उपलब्ध करून देऊ हो, ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही.
६ व्हिडिओ चित्रिकरणाबद्दल महत्त्वाच्या टिप्स...
ऐपतीप्रमाणे एक दोन गरीबांच्या मिस इंडिया घ्याव्यात, खर्या मिळाल्यास उत्तम... त्यांच्यामागे त्रेपन्न डान्स ट्रूप मधल्या तुमच्याशी लगट करत कवायत करणार्या कन्यका, आणि पुढे दाढी फ़ेटा लावलेले तुम्ही स्ट्रिप्टीज करत करत शेवटच्या कडव्याच्या शेवटच्या ओळीपर्यंत आपले सहागठ्ठी पोटस्नायू दाखवता ... ( कुठपर्यंत पोचायचे यात इथे खूप व्हेरिएशन करता येतात, गायकाच्या " लाज " या संकल्पनेवर ते अवलंबून)...
. आता फ़ारच महत्त्वाचा भाग...गाता येण्यापेक्षा हा भाग फ़ार महत्त्वाचा आहे...
७. गीतामध्ये काहीतरी फ़ालतु कॊंट्रोव्हर्सी निर्माण करावी.... रिकामटेकड्या न्यूज चॆनलना प्रसिद्धीसाठी रक्कम द्यावी...
८. काउंटडाउन शो मध्ये पैसे चारून नंबर लावावेत....
९.कोणत्यातरी चॆनलवर सुरू असलेल्या गीतगायन स्पर्धेला किंवा नाचाच्या स्पर्धेला जज म्हणून जावे. तिथे भांडाभांड करावी... जुन्या जाणत्या मंडळींना शिव्या घालाव्यात.... लक्षात ठेवावे, कशीही प्रसिद्धी, उत्तम प्रसिद्धी.....
१०. एका टुक्कार अय्टेम डान्सर चा आपण विनयभंग केला किंवा नाही यावर फ़िल्मी वर्तुळात खबर सोडून द्यावी... काही मोबाईल व्हिडिओ पसरवावेत. त्यावर निरुद्योगी न्यूज चॆनलवर जाऊन मुलाखती द्याव्यात, रडून दाखवावे... माफ़ी मागावी... आणि मग तिला प्रेमभराने आलिंगन देत तिला आपला अल्बम भेट द्यावा..... तिच्या आईच्या पाया पडून " हीच माझी आई आहे " असे ओरडून ओरडून सांगावे....
११.म्यूझिक चॆनल वर व्ही जे लोकांची असंबद्ध बड्बड सहन करत करत आणि मग त्यावरताण भम्पक बोलत बोलत मुलाखती द्याव्यात.
१२. मेनस्ट्रीम सिनेमात ( यशराज , धर्मा वगैरे मोठे मासे सापडल्यास उत्तम ) तुमच्या अल्बम मधले गाणे घुसडता आले तर पहावे.....
या साध्या साध्या टिप्स वापरल्यात तर यश तुमचेच आहे.... आम्ही अनेक पॊप गायक घडवले आहेत..घडवत आहोत...( आजकाल अनेकानेक क्लास निघत आहेत, पण ओरिजिनल एकच, भडकमकर्स करीअर गायडंस क्लास) )...लोकहो, उठा जागे व्हा.. कमी कष्टात भरपूर प्राप्ती करा, प्रचंड प्रसिद्धी मिळवा...
या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...
bhadakamakar'scareermanagementsystems.org/bhangadapop
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 4:34 pm | आंबोळी
अप्रतिम....
आयला तुमचा लै अभ्यास दिसतो राव
लै आवडला लेख.....
10 Apr 2008 - 4:36 pm | प्रमोद देव
लई ब्येस लिवलासा. ओ पाप्पे त्वाडा ज्वाब नै यार!
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले. पन काय हार्कत न्हाय.पुडल्या जन्मी तुम्च्याकडंच येनार आपून शिखाया! बल्ले बल्ले!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
10 Apr 2008 - 4:45 pm | स्वाती राजेश
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:)))))))
पण क्लासला येणार्यांचे त्यातच करीअर होईल का नाही याची काय गॅरंटी?:))))
12 Apr 2008 - 12:35 am | प्राजु
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:)))))))
अगदी नीट काढली आहे या पॉप वाल्यांची..
आवडला हा लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 4:52 pm | मदनबाण
आपला पहिला सभासद मीच होतो.....
तसे पहाल तर हा गाण्याचा किडा माझ्यात अधुन मधुन वळवळत असतो.
(आपला मदनभाऊ बाणमारे)
10 Apr 2008 - 5:07 pm | धमाल मुलगा
भडक्क मेकर शेठ,
एकदम फर्मास !
आपण करणार तुमचा हा कोर्स. बाकी, फक्त शनिवार-रवीवार असा एखादा पर्याय आहे का? तेव्हाच जमेल. नोकरी सांभाळून करेन म्हणतो. मराठी माणूस आहे हो मी!
ज ह ब ह र्ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!!
२.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी...
आणि जमल्यास नाकातुन गाण्याचा यत्न करावा. मग नियम क्र. १० ला वजन प्राप्त होतं :-))
- (मी का !) ध मा ल.
गुरुदेव,
हरकत नाही...यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची!
काय भड्डक्कमकर शेठ? बरुबर हाय का न्हाय? घेता मला अशिश्टन डायरेक्टर म्हून?
10 Apr 2008 - 10:04 pm | भडकमकर मास्तर
यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची!
लै बेष्ट धमाल शेठ.......
10 Apr 2008 - 5:03 pm | प्रशांतकवळे
झक्कास चालतील!!
आम्ही क्लास लावणारच!
प्रशांत
10 Apr 2008 - 5:10 pm | वरदा
ज ह ब ह र्ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!!
हेच म्हणते...सकाळी सकाळी पोट धरुन हसवलत तुम्ही...आता दिवस कसा मस्त जाईल......
10 Apr 2008 - 5:20 pm | मनस्वी
कशी करायची ते कृपया कळवावे.
हीहीही छान लिहिले आहे.
10 Apr 2008 - 7:05 pm | प्रमोद देव
कशी करायची ते कृपया कळवावे.
(काशी) कशी करायची..... असे वाचले.
:))))))))))
गाण्याची काशी करण्यात 'मास्टर'
गुरुदेव
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
10 Apr 2008 - 7:12 pm | छोटा डॉन
"(काशी) कशी करायची..... असे वाचले."
हो मला पण काशीच वाटले ... [ ह.घ्या.]
असो...
अजून लिहायचे आहे पण नंतर सवडीने ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 Apr 2008 - 6:25 pm | डॉ.प्रसाद दाढे
शाब्बास र॑ माज्या वाघरा.. झकास लिहिलय॑स!!
10 Apr 2008 - 7:22 pm | विसोबा खेचर
लै भारी लिवलं आहे! एकदम हाऊसफुल्ल! :)
बाकी मस्तच हजामत करून टाकली आहे...!
मलाही तुमच्या करियर गाईडन्स वर्गात नांव नोंदणी करायची आहे! गानकला ही खूप कठीण वगैरे असते असा गैरसमज मी गेली कित्येक वर्ष बाळगला होता, तो आज दूर झाला! धन्यवाद.... :)
तात्या.
10 Apr 2008 - 9:29 pm | झकासराव
जबरा लिहिलय.
आजकाल म्युजिक चॅनेल जर कधी चुकुन माकुन लावलच तर असलेच सगळे अल्बम दिसतील :)
10 Apr 2008 - 10:22 pm | ठणठणपाळ
धिकताना तिकताना तिकताना टिंग
तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम
माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब....
रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब....
हा हा हा! झकास.
10 Apr 2008 - 11:24 pm | भडकमकर मास्तर
धन्यवाद धन्यवाद.....
आमच्या क्लासला खूप मतब्बर मंडळी येणार तर...दुपारी वर्गाबद्दल पहिल्यांदा लिहिल्यानंतर रात्री पाहतो तर काय, क्लासला तोबा गर्दी......
धन्यवाद धन्यवाद.....
धन्यवाद धन्यवाद.....
11 Apr 2008 - 12:27 am | चतुरंग
आमची स्कूटर तुमच्या क्लासपर्यंत संध्याकाळी पोचेना म्हणून रात्री थोडा उशिरा आलोय;)
आमचंबी नाव घ्या ना नोंदवून? लई झकास!
चतुरंग
11 Apr 2008 - 1:27 am | बेसनलाडू
मजा आली.
(वाचक)बेसनलाडू
11 Apr 2008 - 2:04 am | ब्रिटिश टिंग्या
जॉईन करणार तुमचा क्लास.....
तशी सर्व पुर्वतयारी आहे आमची.....फक्त तुमचे मार्गदर्शन हवे....
(आपला शिष्य) टिंग्या ;)
11 Apr 2008 - 8:05 am | नंदन
मजा आ गया!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Apr 2008 - 1:06 pm | स्वाती दिनेश
मजा आ गया.. ह ह पु.
नमुन्याची गाणी तर..क्लासच!
स्वाती
11 Apr 2008 - 1:49 pm | विसुनाना
की गल की है तुस्सी, बाश्शाओ!
जिओ!
साड्डे क्लास विच मैनूभी ऍडमिशन कराओ
11 Apr 2008 - 4:36 pm | भडकमकर मास्तर
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत...
... आता नीट क्लासला यायचं आणि जोमानं अभ्यास करायचा....
....
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..
( आमची कोठेही शाखा नाही)
11 Apr 2008 - 6:16 pm | मदनबाण
काय राव मला वाटल शाखेच्या बाबतीत तुम्ही चाट्यांना पण मागे टाकणार :):):):):)
(वर्गात बसुन भलभलते आवाज काढणारा)
मदनबाण
11 Apr 2008 - 7:41 pm | वरदा
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत...
अरे वा फुकट दिसतायत क्लास की ही प्रमोशनल ऑफर आहे आमच्यासारख्या लवकर प्रतिक्रीया देणार्यांसाठी?
12 Apr 2008 - 2:25 pm | भडकमकर मास्तर
पुढचा भाग २ टाकत आहे....
.. नाट्यसमीक्षक व्हा....
:):):):):):):)
31 May 2010 - 11:16 pm | इंटरनेटस्नेही
अप्रतिम
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
1 Jun 2010 - 2:38 pm | आंबोळी
इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे?
आंबोळी
1 Jun 2010 - 6:02 pm | इंटरनेटस्नेही
इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे?
म्हणजे काय? मी समजलो नाही...
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
1 Jun 2010 - 7:06 pm | II विकास II
>>इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे?
कारे कंदील पेटवायचा आहे का?
=))
इंटरनेट्प्रेमी, गेलास तु आता ;)
10 Jun 2010 - 8:50 pm | वेताळ
:D होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार.
वेताळ
11 Jun 2010 - 5:04 pm | आंबोळी
होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार
मास्तरांचा आणि शरदिनीतैंचा भांगडा बघुन लोक किती उचकतायत त्याचे काय?
आंबोळी
11 Jun 2010 - 9:10 pm | इंटरनेटस्नेही
@श्री वेताळ
माझी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतर सदस्यानां माझ्याबाबतीत काही गैरसमज झालेले दिसतात... :''(
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.