मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एप्रिल फळ

विजुभाऊ ·

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 12:55
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच. झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही. क्या बात है! अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... आढीकरता 'गवताची उबदार दुलई' हे शब्द आवडले! सुंदर लेख.. पुढील भागाची वाट पाहात आहे! तात्या.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 17:01
Hapus Mango Tree विजुभाऊ :-- हे माझ्या घरासमोरील हापुस चे झाड आहे. कोण्या ऐके काळी या सुट्टी च्या दिवसांमधे आम्ही पोरे जबरदस्त कैर्‍या तोडीत असु......दीड गोणी कैर्‍या घरी अल्यावर त्याचे लोणचे,पन्हे इ. प्रकार आई करत असे..... (सध्या कोकीळ कुजन ऐकतो आहे.) आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... (कैरी प्रेमी) मदनबाण

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 17:07
तात्या चित्र मस्त आहे.....लेखाच्या सुरुवातिला हे सरकावता येइल का? तसे केले आहे! -- कर्झन वायली.

प्रगती Mon, 04/07/2008 - 18:05
वा विजुभाऊ! काय सुरेख लेख लिहिला आहे ,भाषाशैली ओघवती आहे . आंब्याच्या झाडाचे व कैरीचे इतके सुंदर रेखाटन माझ्या वाचनात नाही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला? त्यात मदनबाण यांच्या चिञामूळे "चारचांद" लागले.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 04/07/2008 - 18:06
आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! दुर्दैवी पिढी :( चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... एकदम खरे :) आणि त्यावर ढसाढसा थ॑ड पाणी ढोसायचे व गल्लीत क्रिकेट खेळायला पळायचे..हर हर..गेले ते दिवस.. विजुभाऊ..झक्कास बर॑ का..

स्वाती दिनेश Mon, 04/07/2008 - 18:14
आंब्याच्या आढी 'साठी गवताची उबदार दुलई' ही शब्दयोजना फार आवडली.आणि मदनबाण ह्यांनी सुरेख आणि उचित चित्रे चढवून आणखी मजा आणली. स्वाती

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:46
षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो...... सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी.... व्वा. क्या बात है! सुधीर कांदळकर.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 20:21
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.विजुभाऊ अगदी माझ्या मनातल बोललात बघा !!!!! अतिशय सुंदर लिहिता तुम्ही..... आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय..... (वसंत प्रेमी) मदनबाण

मदनबाण Mon, 04/07/2008 - 21:43
अत्ताच माझ्या आईला आपला हा लेख दाखवला,आणि तिने मला चांदोबा मधे आलेल्या कैरीच्या चित्राची आठवण सांगितली,चांदोबा मधे असेच एका झाडाला लटकलेल्या कैर्‍यांचे चित्र देण्यात आले होते,आणि त्याच्या खाली लिहिले होते "वसंत समयी आम्ही लटकतो कैरी होऊनी वृक्षी" कैरी पाहिली की तिला अजुनही या ओळीची आठवण होते. (मोरांबा खाणारा) मदनबाण

छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 22:49
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." एक नंबर वाक्य राव. एकदम लहानपणाची आठवण करून दिलीत ... च्यायला ह्या 'मोठेपणाने ' ज्या ज्या गोष्ती मिस कराय लावल्या त्यातली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ... "दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......" आयाया ... काय ते इमॅजीनेशन ... जबरा ... लिहीत रहा. मी वाचत आहे [ आणि प्रतिसाद पण देत आहे ] अवांतर : विजूभाउ, ह्या क्रमशः लिहण्यावर सध्या आमचा "कॉपीराईट" आहे ... तुमचे लेखन अखंड येऊद्यात ... तुम्ही असल्या अळशीपणाच्या नादाला नका लागू भाउ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 22:58
मस्त लेख आहे विजुभाऊ.... आणि फोटो पण झकास आहेत मदनबाण यान्चे.... त्यात त्या फोटोच्या कडेला मिसळ्पाव डॊट कॊम / मदनबाण हे सुद्धा भारीच

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 01:23
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." अगदी बरोबर बोललात विजूभाऊ.... लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की आमची १०-१२ जणांची गँग प्रभात रोडच्या बंगल्यांतील कैर्‍या तोडत फिरायची. मग घरातून आणलेल्या तिखट मिठा बरोबर या आंबट- गोड कैर्‍यांची पार्टी व्हायची. साला प्रभात रोडचे सुखवस्तू पांढर पेशे जाम वैतागायचे आम्हाला. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 08:04
विजूभाऊ,
एप्रिल फळाचे काय सुंदर वर्णन केले हो !!!
अंब्याच्या मोहोराचे आता कैर्‍या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे. क्या बात है, आपल्या या सुंदर  कल्पनेला आमची मनापासून दाद आहे. षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते. ओहो, क्या  कहने, कैरीला पालखीत बसवून आणल्यासारखे वाटले.कैरी या विषयावर वाचतांना  हळूवार फुलणा-या प्रेमाची अवस्था व्यक्त करत आहेत असे वाटले. सुंदर लेखन..........!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनविषय:
लेखनप्रकार
3

(इतिहास)

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Mon, 04/07/2008 - 01:07
वाटच पाहत होतो तुझ्या विडंबनाची. अगदी फर्मास झालंय बघ. खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की थोबाड सजवते ती नक्की किती थराने हे लईच बेस ;) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मदनबाण Mon, 04/07/2008 - 04:31
टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना? चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने हा क्रम तर जबरदस्त आहे..... (कुठलाही पूर्व इतिहास नसलेला) मदनबाण

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 09:40
टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना? चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने आतून येत आहे आवाज हा कशाचा? पोटात गुरगुरावे अत्ताच हे कशाने? मस्त! :)

ठणठणपाळ Mon, 04/07/2008 - 22:09
केशवसुमार, तुमच्याकडे काय विडंबनाचं मशीन आहे वाटतं? अहो, एक तरी कविता तशीच राहू द्या. तरी पण हे विडंबन चांगलं जमलं आहे.

छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 22:40
आयला विडंबनासाठी एखादं "ग्रॅमी अवॉर्ड" ठेवलं आणि ते तुम्हाला नाही मिळालं तर तिच्यायला खूनकी नदीया बहैंगी ... आणि हे काय नविन काढलतं ? स्वताच एखादी गजल लिहायची आणि लगेच त्याच विडंबन हजर ... असो. मज्जा येतीय . लगे रहो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 09:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांचा इतिहास शोधून काढल्या मी गझला जुन्या टनाने पाडू विडंबने ही आता नव्या दमाने चुकलेच आज माझे प्रतिसाद टाकला मी होईल वाद चालू तिरपा नव्या दमाने उकरून काढला मी इतिहास हा तिचा अन आली अनेक लफडी माझ्या पुढे नव्याने ठाऊक सर्व होते घडणार काय आहे ! गेलो तरी तिच्या मी होतो घरी धिटाने खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की थोबाड सजवते ती नक्की किती थराने हा ही प्रकार केला बदलून रूप गेलो गेलोच पण पकडला मग तिंबले बुटाने टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना? चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने ओढून बांधले मी नाडीस या त

एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...

भडकमकर मास्तर ·

इनोबा म्हणे Mon, 04/07/2008 - 00:31
सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? ) मलाही हाच प्रश्न पडला होता. महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार अगदी अटलबिहारींच्या भाषणासारखे... ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या.... चित्रपटात इतका छान अभिनय करणारा हा माणूस... पण या कार्यक्रमात इतका नाटकी वाटतो की,अगदी नकोसा होतो. पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल.... त्यापेक्षा मी तो कार्यक्रम बघणेच बंद केलेय. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

आता हा आदेश बांदेकर 'ताक् धिना धिन' मधे चांगले सूत्रसंचालन करीत असे. आता मात्र एकदम माज करत असतो त्या कार्यक्रमात येऊन.. आणि या सर्व कार्यक्रमातील लोकाना मराठीचे वावडे आहे का असे वाटते. एका वाक्यात ४ इंग्रजी शब्द नाही वापरले तर फाऊल मानला जातो इथे.... अगदीच चीड येणारे कार्यक्रम झाले आहेत ते सगळे. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 08:34
हे असे महागुरू, अजिंक्यतारा, इंडियन आयडॉल, वगैरेसारखे कार्यक्रम अत्यंत फालतू असतात! एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत! असो, काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही! सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून 'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही! असो! भडकमकरसाहेब, लेख चांगला आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मदनबाण Mon, 04/07/2008 - 08:42
एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत! एसएमएस पाठवुन जर कोणी विजेता बनणार असेल तर महागुरु आणि तज्ञ मंडळींची गरजच काय?

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 09:45
धन्यवाद तात्या,... काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही! हे अगदी खरे.... 'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही! हा हा हा .... :)))) .... हाणलाय जोरात.....बिचारा सचिन.... अवांतर : हा माझा मार्ग एकला हा सिनेमा सुद्धा आमचा आवडता आहे... राजाभाऊ झिन्दाबाद...

In reply to by विसोबा खेचर

चित्तरंजन भट Tue, 04/08/2008 - 10:58
हे असे महागुरू, अजिंक्यतारा, इंडियन आयडॉल, वगैरेसारखे कार्यक्रम अत्यंत फालतू असतात! एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत!
काय बोललास तात्या! एकंदरच ह्या तुफान माहितीयुगात समाजाचेच रंडीकरण फार झपाट्याने होते आहे. मराठीत एखाद्याला 'समाजाचे रंडीकरण' हा शब्दप्रयोग फार कठोर वाटल्यास त्याऐवजी "स्लटिफिकेशन ऑफ सोसायटी" वाचावे.

मनस्वी Mon, 04/07/2008 - 11:33
आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील...
स_भंशी सहमत
'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही!
तात्यांशी सहमत त्याच्या पिक्चरमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत, सुधीर जोशी, वर्षा ऊसगावकरच नेहेमी भाव खाऊन जायचे! असे माझे मत आहे. सचिन एक डायरेक्टर म्हणून ओके वाटतो. तरी नवरा माझा नवसाचा अगदीच सुमार दर्जाचा वाटला.

In reply to by मनस्वी

वर्षा Tue, 11/18/2008 - 00:17
'नवरा माझा नवसाचा' हाही 'बरा' असं म्हणायची वेळ आली 'आम्ही सातपुते' बघितल्यावर. कृपया कोणीही हा चित्रपट पाहू नये. बाकी 'गंमत जंमत', 'अशी ही बनवाबनवी' हे सचिनचे चित्रपट मात्र मला खूप आवडतात. कितीहीवेळा बघू शकेन. पण इथे कोणीतरी म्हणालं तसं सराफ-बेर्डे, वर्षा उसगावकर, सुधीर जोशी या मंडळींमुळेच हे चित्रपट जास्त लक्षात राहिलेत.

प्रभाकर पेठकर Mon, 04/07/2008 - 11:50
सचिन तू तू मैं मैं चे दिग्दर्शन करायचा. तो शो बर्‍यापैकी चालला. सासू आणि सून - रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर - ह्यांच्या मनोरंजक (?) भांडणाची ही मालिका सुरुवातीला बरी होती पण पुढे पुढे तिचे च्युईंग गम करून टाकले. पण सचिनने पैसे बरे कमावले. श्री. स्_भडकमकर आणि इतर प्रतिसाद दात्यांच्या प्रत्येक मताशी सहमत. हे सो कॉल्ड रिऍलिटी शोज पाहण्यापेक्षा तोच वेळ मिपावर कारणी लावता येतो.

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 12:11
हल्ली कोठे पहा कोठे ना कोठे पाच चॅनेल मागे साडे तीन चॅनेल वर नाच काम चालले असते......सव्वा वर गाण्याच्या स्पर्धा असतात... हे कमीच असेल तर ढु** हलवत नाच तर असे सुरु असतात् की त्या व्यतिरिक्त मानवी शरिरात इतर अवयव नाहीतच. टी व्ही लोकांची आवड ठरवतो की लोक स्वतः स्वतः ची आवड ठरवात. य बाबतीत मला एक कथा माहीत आहे... ती पुण्यमुम्बैस्कन्द पुराण या ग्रन्थात आहे. भविष्यात केंव्हा तरी विजुभाऊ नामक ‍ॠषी झाले त्यानी हे गिर्वाण नागरी पुराण लिहीले ती कथा अशी ईश्वर आणि विज्ञान् यांच्यात एकदा विज्ञानाने जेंव्हा ईश्वराला सांगितले की देवा मी तुझ्या वर मात केली आणि मनुष्याला मी दूर वीक्षेची कला देउन टाकली आहे. मानवला टी व्ही नामक यन्त्र दिले आहे. तेंव्हा ईश्वर हसुन म्हणाले तुझे बरोबर आहे.तु ती विद्या मनुष्याला दीली. पण मनुष्य त्याचा वापर निरुपयोगी कामा साठी करेल. तेंव्हा विज्ञान म्हणाले की मी यावर ही तोडगा काढेन्... विज्ञानाने मग रिमोट नामक अमोघ अस्त्र बनवले हे अस्त्र दूरुनच टी व्ही यन्त्रावर नियन्त्रण करत असे. ईश्वर हे पाहुन पुन्हा हसला आणि म्हणाला ........... विज्ञाना हुशार आहेस्........पण शहाणा नाहीस्.....ते रिमोट यन्त्र ;वापरायचे असते याचाच मानवाला विसर पडेल हे मला माहीत आहे. तात्पर्य : ( मि पा कर हुशार आहेत ...शहाणे ही आहेत ...........ते अशावेळी सरळ जाला वर मिपा ला भेट देतात) !! संदर्भः ‍ॠषी विजुभाऊ कथीत पुण्यमुम्बै पुराण सप्तम स्कन्द अध्याय सदतीस श्लोक २८ !!

नसनखवडी Mon, 04/07/2008 - 11:58
सुन्दर दिसनार्‍या सुप्रियाताईला गटवनं हे एकच बरं काम केल सचिनभावनी. प्रियाली

In reply to by नसनखवडी

प्रभाकर पेठकर Mon, 04/07/2008 - 12:05
सुप्रिया ही सचिनच्या आईची निवड आहे असे सुप्रियाच्या मुलाखतीत ऐकले होते. कुठल्या तरी लग्नात सचिनच्या आईने सुप्रियाला पाहिले होते. तिचे लग्न ठरले तेंव्हा सचिन-सारिका ही ताराचंद बडजात्याची जोडी फॉर्मात होती. सुप्रिया आपल्या मैत्रिणींना अभिमानाने सांगायची 'माझे लग्न ठरलेय, सचिनशी. अग! होऽऽ तोऽऽऽच सचिन- सारिकातला सचिन.'

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त Wed, 04/09/2008 - 22:48
सुप्रिया ही सचिनच्या आईची निवड आहे असे सुप्रियाच्या मुलाखतीत ऐकले होते. कुठल्या तरी लग्नात सचिनच्या आईने सुप्रियाला पाहिले होते. मी ऐकल्याप्रमाणे नवरी मिळे नवर्‍याला चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे प्रेम जमले व त्यानंतर त्यांनी लग्न केले. असो.. ही मालिका पाहत नाही त्यामुळे काही टिप्पणी नाही.

In reply to by नसनखवडी

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 12:05
प्रियाली?? :) काय? नांव बदलून 'प्रियाली'च्या नांवाने निरोप लिहायला ज्ञानेश्वरदादांनी शिकवलं वाटतं?! :) असो! चालू द्या,चालू द्या तुमचे पालथे धंदे! फक्त तात्याला किंवा मिपाला सुधरवायच्या गोष्टी करू नका म्हणजे झालं! तात्या तुम्हा सगळ्यांचं बारसं जेवलेला आहे! :) Thx to Misalpav's False Account Detector! :) असो, आता निघायला हवं! ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकायला जायचं आहे! म्हणजे मग पुन्हा सभ्यतेची झूल पांघरायला आम्ही मोकळे! :) (स्वगत!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली Mon, 04/07/2008 - 16:47
काय? नांव बदलून 'प्रियाली'च्या नांवाने निरोप लिहायला ज्ञानेश्वरदादांनी शिकवलं वाटतं?! :)
अहो, काही जळक्या बिब्ब्यांना प्रियालीला ठेचणे अद्याप शक्य झाले नाही त्यामुळे वय उतरली तरी पोरीसोरींना हाताशी धरून असले चाळे करत असतात.
Thx to Misalpav's False Account Detector! :)
बरं झालं कळवलं ते! नसनखवडीचं "लावण्य" बाहेर आलं.

धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 15:01
खर॑ सा॑गायच॑ तर मला ह्या कार्यक्रमात नक्की काय घडत॑ हेच कळत नाही. नव्या,ताज्या दमाच्या होतकरु कलाव॑तासाठी एक व्यासपीठ? आदेश बा॑देकरा॑च्या फुटकळ विनोदासाठी नवी तजवीज? हल्ली फारशी (?) काम॑ मिळत नसल्याने कॅमेर्‍यापुढे राहण्याची सचिनभौची धडपड? पोरासोरा॑नी स्टेजवर येऊन आधी थयथयाट करायचा, न॑तर होम मिनिष्टर वाले साहेब येऊन उग्गाच त्या दमुन गेलेल्या जीवा॑ची माप॑ काढणार....अरे, जर माप॑ काढण्यासारखीच असतील ही पोर॑, तर घेता कशाला त्या॑ना? त्यान॑तर सचिनशेठच॑ जोरदार भाषण... आम्ही तर च्यायला, तो बोलायला लागला की घरभर 'रेबीज रेबीज' करत पळत सुटतो....कस्सला चावतो तो. भडकमकर शेठ, पर्फेक्ट पकडल॑य!!!! अवा॑तरः ते तुमच॑ नाटकाच॑ काय झाल॑ हो?

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 15:10
आम्ही तर च्यायला, तो बोलायला लागला की घरभर 'रेबीज रेबीज' करत पळत सुटतो....कस्सला चावतो तो.
:))))... हे एक नंबर आहे....
अवा॑तरः ते तुमच॑ नाटकाच॑ काय झाल॑ हो?
मिसळपाव संमेलनादिवशीचे आमचे जुने नाटक अभयारण्य मस्त झाले... छोट्या प्रेक्षाग्रुहात ५० प्रेक्षकांची दाद म्हणजे मजाच आली... आपल्या शुभेच्छा होत्याच ना... :) आणि नवीन नाटक का रे भुललासि मध्ये सध्या कलाकारांच्या आपापसातल्या मतभेदांमुळे अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलले आहे... हा हा हा....

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 15:31
मिसळपाव संमेलनादिवशीचे आमचे जुने नाटक अभयारण्य मस्त झाले... छोट्या प्रेक्षाग्रुहात ५० प्रेक्षकांची दाद म्हणजे मजाच आली... वा वा!!! अभिन॑दन. वेळ नाही जमली आपली! नाहीतर आवर्जुन आलो असतो प्रयोगाला. सध्या कलाकारांच्या आपापसातल्या मतभेदांमुळे अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलले आहे... चालायच॑च. मराठी र॑गभूमी, त्यातून प्रायोगिक, आणखी काय असणार? आहे, कल्पना आहे काय होत॑ त्याची.. जाऊदे शेठ, आपण सध्या पुण्यात नाहीय्ये ना, म्हणून नायतर, आपणच उभे राहिलो असतो, क्काय? ( आणि तुम्हाला आमची स॑वादफेक, उत्तु॑ग अभिनयक्षमता इ.इ. पाहून झीट आली असती ही गोष्ट अलाहिदा. अडला हरी सुध्दा ह्या गाढवाचे पाय धरायला येणार नाही!)

अभिज्ञ Mon, 04/07/2008 - 23:24
अतिशय चांगला लेख.माझे नशिब चांगले असावे म्हणून कि काय माझ्याकडे झी मराठी चॅनेल दिसत नाही. तरी पण ह्या कार्यक्रमाचे २-३ भाग पाहिले आहेत.आपण म्हणताय ते तंतोतंत खरे आहे. आजकाल टॅलेन्ट हंट च्या नावाखाली हे असले भयानक कार्यक्रम सर्वच चॅनेलवर जोरात चालू आहेत.त्यात स्पर्धकांपेक्षा परिक्षक लोकच जास्त माज करताना दिसून येतात. झी वरचा सा रे ग म पा हा कार्यक्रम तरी बराच बरा असतो.परंतु ह्या परि़क्षक लोकांच्याहि संवादाचे काहि स्क्रिप्ट असते कि काय असा संशय ब-याच वेळा येतो. चार आण्याची कोंबडि आणि बारा आण्याचा मसाला असाच एकंदर सर्व प्रकार. सर्वच मराठी चॅनेल हे टुकार हिंदि चॅनेल्सची नक्कल करताना दिसतात. चार दिवस ...., त्या गोजिरवाण्या घरात..... सारख्या टुकार मालिका मालिका तर बघवत नाहीत.इतक्या भानगडि होउनहि हे घर गोजिरवाणे कसे काय असु शकते? ज्या पध्दतिने आपण ह्या नृत्यस्पर्धेचे विच्छेदन केले आहे त्याच पध्दतिने ह्या असल्या वर्षानुवर्षे चालु असलेल्या टुकार मालिकांचे सुध्दा विच्छेदन वाचायला आवडेल.भडकमकर साहेब ह्या विषयावरहि एकदा असाच फर्मास लेख येउ देत. अबब

In reply to by अभिज्ञ

भडकमकर मास्तर Tue, 04/08/2008 - 10:02
वर्षानुवर्षे चालु असलेल्या टुकार मालिकांचे सुध्दा विच्छेदन वाचायला आवडेल.भडकमकर साहेब ह्या विषयावरहि एकदा असाच फर्मास लेख येउ देत. कल्पना उत्तम आहे.. परंतु आम्ही मराठी डेली सोप पाहणे केव्हाच सोडून दिले आहे.... ( आम्ही तर अवन्तिका मालिकेत केलेली स्वतः ची टुकार भूमिका सुद्धा पाहिली नाही...) आणि वहिनीसाहेब नावाची एक भयन्कर मालिका चालू आहे असे ऐकतो.... आणि अवघाचि, सुखांनो या वगैरे ...आता म्हणाल नावे तर सगळी माहिती आहेत... तेवढीच माहिती आहे...

छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 23:32
मला पण मागच्या १०दिवसा पूर्वी घरी गेल्यावर "घरच्यांच्या आग्रहामुळे" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला ... डोकंच सणकल आपलं. अरे पाचळपणा करा [ आम्ही तरी दुसरे काय करतो] पण किती ? मी एक नोटीस केलं आहे हं, जे जे मराठी कलाकार कुठल्या न कुठल्या शो च्या निम्मीत्ताने "हिंदी रिऍलिटी शो" चे पाणी चाखून आले आहेत त्यांच्यामधे एक नाटकीपणाचा नवा पैलू डेवलप झाला आहे. तुम्ही बघाना आजकाल "सुप्रीया, सोनाली कुलकर्णी, सचिन " कसा लाडालाडात बोलतो. "सोनाली आणि सुप्रीयाचे बोलणे तर असे डोक्यात जाते की विचारू नका". तुमच्यातल्या कुणी "अदनान सामीच्या बोल बेबी बोल" हा कार्यक्रमातला "सचिन आणि सुप्रीयाचा" भाग जर बघितला असेल तर तुमच्या डोक्याला झीट येईल. अरे किती नाटकीपणा कराल ? जन्म इथच झाला ना? का थेम्सच्या काठावर किंवा गंगाकिनारी अलाहाबादला जन्मलात ? तो अदनान बिचारा यांना लायनीवर आणायचा प्रयत्न करत होता पण यांची गाडी सुटलीच होती .... असले "ढोंगी" ड्युडपणाचे कातडे पांघरलेल्याला देव पण वाचवू शकत नाही .... बाकी सचिनबद्दल म्हणाल तर आपण "तात्यांशी " सहमत आहे. बाकीचे पिक्चर म्हणाल तर अशोक सराफ, लक्ष्या, वर्षा, सुधीर जोशी होते म्हणून चालले. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

भडकमकर मास्तर Tue, 04/08/2008 - 09:56
मी एक नोटीस केलं आहे हं, जे जे मराठी कलाकार कुठल्या न कुठल्या शो च्या निम्मीत्ताने "हिंदी रिऍलिटी शो" चे पाणी चाखून आले आहेत त्यांच्यामधे एक नाटकीपणाचा नवा पैलू डेवलप झाला आहे. हे बरोब्बर बोललास..... मी बर्‍याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्‍या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... :)))) आनन्द आहे...

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 10:40
सगळ्या॑नी मस्त शाल जोडीतले हाणले आहेत सचिन-आदेश नामक बाष्कळ जोडीला :) खर॑ म्हणजे सध्या चा॑गले स॑गीत, लेखन वगैरे निर्माण होत नाही व उपलब्ध असलेले जुने साहित्य वाचण्याचे कष्ट फार कोणी घेत नाही, मग आदेशभावजी॑च्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोट्या॑ना पोट धरून हसू फुटणारच.. जरा पुल, चिवि वाचा की भाड्या॑नो मग कळेल विनोद म्हणजे काय.. बाकी सध्या ह्या निरूद्योगी वाहिन्या॑मुळे अर्ध्या हळकु॑डात पिवळ्या झालेल्या तथाकथीत तज्ञा॑चे पीक फारच माजले आहे. एक-दोन अल्बम थोडे फार खपल्यावर स्वतःला ह्रदयनाथ समजणारे अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी त्यातलेच आहेत. मला कल्पना आहे की माझे विधान त्या॑च्या चहात्या॑ना आवडणार नाही पर॑तु परीक्षक बनण्यासाठी आवश्यक तो अनुभव, स॑गीताचे ज्ञान व एक॑दरीत मॅच्युरीटी यायला अजुन अवकाश आहे पण तेव्ह्ढा वेळ वाहिन्या॑ना कुठे आहे? (अवधूत गुप्तेच्या कॉमे॑टस ऐकून मला तर हसूच यायचे; विशेषतः देवकी प॑डीता॑च्या (खरोखरच्या) एक्सपर्ट कॉमे॑टसच्या तुलनेत.. वरील विधाने माझी वैयक्तीक मते आहेत व त्यामुळे कुणाची मने दुखावली असतील तर माफ करा पण सुधीर फडके, ह्रदयनाथ, यशव॑त देव, वस॑त प्रभू, राम कदम ह्या॑ना॑च मी महागुरू मानतो व त्या॑च्या स॑गितरूपी लखलखत्या प्रतिभासूर्यापुढे ह्या तथाकथीत स॑गीतकारा॑चे काम 'पानी कम' आहे. 'असा बेभान हा वारा' असो वा 'जिवलगा कधी रे येशील तू' असो, त्या॑च्या जवळपाससुद्धा पोहोचणारी एकही रचना एव्हढा टेक्निकल सपोर्ट हाताशी असता॑ना ह्या महागुरू॑ना जमत नाही ही खेदाची बाब आहे. परमेश्वर त्या॑ना प्रतिभेचे वरदान देवो..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:16
पण सुधीर फडके, ह्रदयनाथ, यशव॑त देव, वस॑त प्रभू, राम कदम ह्या॑ना॑च मी महागुरू मानतो व त्या॑च्या स॑गितरूपी लखलखत्या प्रतिभासूर्यापुढे ह्या तथाकथीत स॑गीतकारा॑चे काम 'पानी कम' आहे. 'असा बेभान हा वारा' असो वा 'जिवलगा कधी रे येशील तू' असो, त्या॑च्या जवळपाससुद्धा पोहोचणारी एकही रचना एव्हढा टेक्निकल सपोर्ट हाताशी असता॑ना ह्या महागुरू॑ना जमत नाही ही खेदाची बाब आहे. परमेश्वर त्या॑ना प्रतिभेचे वरदान देवो.. लाख रुपये की बात! दाढेसाहेबांशी सहमत आहे...! तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

भडकमकर मास्तर Tue, 04/08/2008 - 16:02
उपलब्ध असलेले जुने साहित्य वाचण्याचे कष्ट फार कोणी घेत नाही, मग आदेशभावजी॑च्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोट्या॑ना पोट धरून हसू फुटणारच.. अगदी योग्य बोललात... परीक्षक बनण्यासाठी आवश्यक तो अनुभव, स॑गीताचे ज्ञान व एक॑दरीत मॅच्युरीटी यायला अजुन अवकाश आहे पण तेव्ह्ढा वेळ वाहिन्या॑ना कुठे आहे? हे ही खरेच.... वाहिन्यांच्या अर्थकारणाचे गणित वाहिन्याच जाणोत्.....तरी अवधूत पेक्षा सलिल बरा असे आमचे वैयक्तिक मत आहे...पहिल्या पर्वात अवधूत एका गायिकेला म्हणाला होता की " तू चष्मा काढ, दुसरा घाल, तुझे डोळे दिसत नाहीत इ. .."... आता गाण्याची स्पर्धा होती की मिस इन्डिया व्हायची?? ... आणि सारेगमप हा एकापेक्षा एक पेक्षा बरा कार्यक्रम आहे, इतकेच म्हणू शकतो.....( निदान त्यात प्रभाकर जोग यान्च्यासारखे गेस्ट जज तरी येतात...) ___________ वाहिन्यांवर सध्या इतकी सांस्कृतिक बोंबाबोंब आहे की हा कार्यक्रम यापेक्षा बरा, तो त्यापेक्षा बरा पण उत्तम कोणताच सापडत नाही , ही सत्य परिस्थिती... एक-दोन अल्बम थोडे फार खपल्यावर स्वतःला ह्रदयनाथ समजणारे अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी त्यातलेच आहेत. असं कधी म्हणाले ते?? आश्चर्य आहे.... हे तुमचं बेष्ट आहे, आत्ता आलेल्या लोकांची एकदम एवढ्या मोठ्या माणसांबरोबर कशाला तुलना करताय राव?? मग एकदम बोलतीच बंद होणार ना !!! { इथे फरक बघा, सचिन स्वतःच्या कार्यक्रमात स्वतःलाच महागुरु म्हणवून घेतो, त्यामुळे तो जास्ती डोक्यात जातो} समजा उद्या तुम्ही स्वतः सन्गीत देऊन भावगीतांची सीडी काढलीत आणि लोकांना ती तुफान आवडली की मग आम्ही समजा म्हणालो ," हॅ ,खळेसाहेब उत्तम सन्गीत देतात, ती मजा नाही दाढेसाहेबांच्यात..."...मग झोपलातच ना तुम्ही....कोणी नवीन काही करायलाच नको ...जे जुनं चांगलं आहे ते आहेच पण जुन्यात रमताना प्रत्येक नव्या गोष्टीला शिव्याच दिल्या पाहिजेत असे नाही, असं आपलं आम्हाला वाटतं..... पण नव्या संगीतकारांनीसुद्धा नवनवीन उत्तम शोधायच्या प्रयत्नांत राहिले पाहिजे, प्रयोग करून पाहिले पाहिजेत...तरच काहीतरी नवीन तयार होईल... चांगलं आहे की नाही ते लोक आणि काळ ठरवेल...

गिरीराज Tue, 04/08/2008 - 13:22
काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही! ... तात्यांचे म्हणणे अगदी खरे आहे... काळाच्या कसोटीवर जे चांगलं आहे ते नक्किच तावून सुलाखून बाहेर येइल आणि कचरा जळून जाईल!

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 22:57
काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! आजकाल स्वतःची सीडी काढणे काहीच अवधड नाही, मी जर तशी सीडी काढलीच तरी स्पर्धा॑ना परीक्षक बनण्याचे धारीष्ट्य (तेही देवकी प॑डीता॑सारख्या कसलेल्या व बुद्धीमान गायिकेच्या बरोबरीने?) मी निश्चीत दाखविणार नाही. वाहिन्या॑च्या बालीश निर्मात्या॑नी कितीही आग्रह धरला तरी माझी 'लेव्हल' मलातरी नक्कीच माहीत पाहिजे. 'अर्ध्या हळकु॑डात पिवळे होणे' हा वाक्प्रचार मी त्याचसाठी वापरला. अवधूतचे अथवा सलीलच्या स॑गीताची प्रत फडके- खळे॑च्या तुलनेचीआहे कि॑वा नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे पर॑तु स्वतःला एक्सपर्ट समजून अर्थहीन कॉमे॑टस देणे मलातरी हास्यास्पद वाटते. ते पद माझ्या मते खळेसाहेब, श्रीधरजी, जोगसाहेब, दशरथ पुजारी॑सारख्या मुरलेल्या व्यक्ती॑नाच शोभते.. मी येथे श्रीधर फडके॑चाही जाणून-बुजून उल्लेख केला आहे. ते वयाने पुजारी॑साहेबा॑एव्हढे मोठे नसले तरी त्या॑नी आत्तापर्य॑त दिलेल्या स॑गितातून त्या॑ना जोखता येऊ शकते. 'ऋतू हिरवाशी' 'जय जय महाराष्ट्राची' तुलना करू धजावशील काय? तसे पाह्यला गेले तर सचिनही बरा नाचतोच की ('ही नवरी असली' हे गाणे व नाच मला आवडले होते) पण तेव्हढ्याने त्याला मराठीचा (अथवा 'गरीबा॑चा' :) बिरजूमहाराज म्हणणे धार्ष्ट्याचेच होईल. परीक्षकाचे पद मिळविण्यासाठी सचिनला अजून बरीच मजल मारणे आवश्यक आहे. माझे 'सारेगमप' बद्दल हेच मत आहे. माझा नवीन गाण्या॑ना, स॑गीतकारा॑ना अजिबात विरोध नाही. पण मुळात प्रतिभेचे वरदान हवे आणि त्याबरोबर हवी प्रच॑ड मेहेनत, वाद्या॑चा अभ्यास, लोकस॑गीताचा मागोवा, प्रयोगशीलता. तू प॑चम-मॅजिकचा कार्यक्रम पाहिला आहेस, त्या तीन तासा॑त मी वर दिलेल्या सगळ्या गोष्टी प॑चममध्ये एकवटलेल्या आपण पाहिल्या होत्या.. आणि मग तयार होतात 'कारवान' आणि 'तीसरी म॑झील' ! प॑चमच्या पहिल्या चित्रपटाची गाणीसुद्धा अफाटच होती (छोटे नवाब) त्यातही त्याचे कष्ट दिसून येतात. तसे कष्ट आपल्या पिढीने घेतले तर 'लक्षात राहतील' अशी गाणी आपणही देऊ शकू..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:50
मी एकदा भीमण्णांच्या घरी त्यांची विचारपूस करायला, त्यांना भेटायला, नमस्कार करायला गेलो होतो. अण्णा जर मुडात होते. केव्हा आलात मुंबईहून? बसा घटकाभर, चहा घ्या! ते झी टीव्हीवालेही आता यायचे आहेत! झी टीव्हीवाले कशाला येणार आहेत ते मला समजेना! मनाशी म्हटलं, असेल एखादा अण्णांचा इंटरव्ह्यू वगैरे! मी आपला नेहमीप्रमाणे त्यांचा मुंबईत आता पुढचा कार्यक्रम केव्हा आहे, कुठे आहे वगैरे जुजबी चौकशी करत होतो. तेवढ्यात ती झी टीव्हीची मंडळी आली. नमस्कार-चमत्कार झाले, त्यांनी अण्णांना पुष्पगुच्छ वगैरे दिला. ती मंडळी कुठल्यातरी मेगा फयनलचे परिक्षक व्हाल का, असं अण्णांना विचारायला आली होती. अण्णांनी सुरवातीला मला ते शक्य होणार नाही असा एकदोनदा नम्रपणे नकार दिला. तरी ती मंडळी ऐकेचनात! शेवटी अण्णा त्यांना हसून म्हणाले, अहो अजून मलाच गाण्यातलं फारसं काही येत नाही! मीच अजून जमेल तसं शिकतो आहे. मग मी परिक्षक कसा काय होणार? तेव्हा मला क्षमा करा, परिक्षक वगैरे होण्याइतपत माझी पात्रता नाही! शेवटी ती झी टीव्हीवाली मंडळी हात हलवत परत गेली! :) तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

भडकमकर मास्तर Wed, 04/09/2008 - 15:21
आजकाल स्वतःची सीडी काढणे काहीच अवधड नाही, मी जर तशी सीडी काढलीच तरी स्पर्धा॑ना परीक्षक बनण्याचे धारीष्ट्य (तेही देवकी प॑डीता॑सारख्या कसलेल्या व बुद्धीमान गायिकेच्या बरोबरीने?) मी निश्चीत दाखविणार नाही. वाहिन्या॑च्या बालीश निर्मात्या॑नी कितीही आग्रह धरला तरी माझी 'लेव्हल' मलातरी नक्कीच माहीत पाहिजे. हा मुद्दा एकदम मान्य... 'ऋतू हिरवाशी' 'जय जय महाराष्ट्राची' तुलना करू धजावशील काय? नाही , शक्यच नाही...काहीतरीच काय? माझा नवीन गाण्या॑ना, स॑गीतकारा॑ना अजिबात विरोध नाही. हां.. आता कसं बोललात... तुमच्या आधीच्या उत्तरांत तसे वाटेना , त्यामुळे एवढेच जरा तपासून पहायचे होते .... काही अधिक उणा शब्द गेला असेल तर माफ करा.... :)

आंबोळी Tue, 04/08/2008 - 23:10
व्वा दाढे साहेब.... फारच मुद्देसुद प्रतिक्रीया आहे. हे रियालीटी शोज खरच किती रियल आसतात हे कोणाला माहिती आसल्यास क्रुपया येथे सान्गावे.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/09/2008 - 18:27
वयाची साठी उलटलेले श्री. केर्सी लॉर्ड आपल्यापैकी काही जणा॑ना ठाऊक असतील, तरी थोडे त्या॑च्याविषयी- स्वतः स॑गीत स॑योजक (अरे॑जर) केर्सीजी॑ची ऍकॉर्डियन व ताल वाद्या॑वर विलक्षण हुकुमत आहे. त्या॑नी अ॑गावर रोमा॑च उभे करणारे ऍकॉर्डियन पीसेस 'रूप तेरा मस्ताना', 'रूत जवा' 'अच्छाजी मै॑ हारी','बार बार देखो' इ. गाण्या॑मध्ये वाजविले आहेत. शिवाय 'ओ हसीना झुल्फो॑ वाली', 'तुमने मुझे देखा' (तीसरी म॑झील) ह्या गाण्या॑मधील धुमाकूळ घालणारा ड्रम वाजविला आहे. पाश्चात्य स॑गीत लिपीचा महान तज्ञ असलेल्या केर्सीजी॑नी प॑चमदा, मदन मोहन (तुम जो मिल गये हो' चे अप्रतिम स॑योजन) इ. बरोबर खूप काम केले आहे. तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याचा इथे नक्की काय स॑ब॑ध आहे? कटू सत्य असे आहे की एव्हढा महान कलाकार सध्या सक्तीचे निवृत्त आयुष्य जगत आहे. त्या॑च्यापाशी ज्ञानाचे प्रच॑ड भा॑डार असले तरी सध्याचा एकही स॑गीतकार वा बजवय्या त्या॑च्याकडे शिकायला जात नाही. त्या लोका॑नी खरोखरच दिवस-रात्र एक करून मेहेनत पिसली तेव्हा अशा अजरामर रचना बनल्या. दुर्दैवाने माझ्या पिढीचे लोक एव्हढी तोशीस जिवाला लावून घ्यायला तयार नाहीत. माझ्या बहिणीने जेव्हा केर्सीजी॑ची मुलाखत घेतली ते॑व्हा हीच ख॑त बोलून दाखविली. खर॑ म्हणजे म॑दार आपण दोघेही हौशी सि॑थेसायझर वादक आहोत, आपण त्या॑च्या पायाशी बसून धडे घेतले पाहिजेत.

भडकमकर मास्तर Wed, 04/09/2008 - 23:21
खरंय यार.... आपल्या पिढीत फटाफट प्रसिद्धी, फटाफट पैसा हवा असणारी मंडळी फार....( कोणाकडेही शिकायला गेले की "मी टीव्ही वर कधी दिसेन ? " असले भंपक प्रश्न पालकही विचारतात गुरूला... माझ्या भावाच्या तबला गुरूंना एका मुलाने विचारले, " मला कधी तबला येईल? " ते उखडले, " ..जन्मभर घासली तरी येणार नाही...")..... मला माहित आहे की या विषयावर तू खरंच फार तळमळीने बोलतोस... उत्तमोत्तम गुरूंकडे तू वाद्यवादन शिकला आहेस, फार मजा आली होती तुझं वादन ऐकून...( आम्ही इकडे तिकडे पाहून पाहून थोडे थोडे वाजवणारे लोक... आमच्या नशिबी असेल तर उत्तम गुरू लाभेलही...)

In reply to by उच्चैश्रवा

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 17:53
ठण्ण्ण्ण्ण्ण....... एकच नंबर !!! ह्याला म्हणतात, "सौ सुनार की, इक लुहार की" उग्गाच फाफटपसारा नाही...एक वाक्य, आख्खी ११ जणांची टीम ० धावांत तंबूत परत! उच्च...उच्चै...उच्चैश..ह्या: किती हे अवघड नाव हो! फाफललो ना मी. उच्चैश्रवा, पुणे-३० का? एकदम मला घराच्या आसपास असल्यासारखं वाटलं.

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 04/10/2008 - 18:12
माझ्या नशिबाने मला मोठ्या कलाकारा॑चे काम जवळून पाह्यला मिळाले आहे. स॑गीतकार दशरथ पुजारीसाहेब व प्रख्यात व्हायोलीन वादक रमाका॑तजी परा॑जपे या॑च्या पायाशी बसून थोडे-फार शिकता आले. तसेच मी 'आशाबा॑ई॑चे व श्रीधर फडके॑चे' एक रेकॉर्डी॑गही त्या॑च्या बाजूला उभे राहून पाहिले आहे.. विलास डफळापूरकर, सुराज साठे, मनोहारी सि॑ग, प्रभाकर जोगसाहेब यासारख्या थोर वादका॑नासुद्धा वाजवता॑ना मी खूप वेळा अगदी जवळून निरखू शकलो आहे. म्हणूनच खूप वाईट वाटते. असो, ईश्वरेच्छा बलियसी.. आशा करूया हि॑दी-मराठी चित्रपट स॑गीताचा तो सुवर्णकाळ पुन्हा येईल

आंबोळी Fri, 04/18/2008 - 11:47
एका पेक्षा एक हा कार्यक्रम मी कधीच पहात नाही. पण हा टॉपिक वाचुन त्या एका पेक्षा एक विषयी कुतुहल चाळवले होते. काल एक एपिसोड बघायची संधी मिळाली. पण तो सुध्धा मी पुर्ण पाहू शकलो नाही इतका बाचकळ पणा सुरु होता. बान्देकरांचे संवाद : (एका मुलीने डोळ्यातून पाणी काढल्यावर) आले आले चिमणी लडली.... कावूची गोष्ट सांगू? चिमणी हाशली...... या नंतर महागुरूनी एक सॉलिड डॉयलॉग मारला.... "जिनके घर शीशे के हो..." वगैरे सारखा तो फारच खतरनाक वाटला म्हणून येथे देत आहे. महागुरू: "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुध्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." (टाळ्या.... टाळ्या... वर कुणीतरी सांगितल्याप्रमाणे महागुरू डावीकडे मग उजवीकडे बघून टाळ्या स्विकारतात. क्यामेरा प्रेक्षक्,जुरी,बान्देकर्,नाचणारी मुले हे सगळे टाळ्या वाजवतायत हे दाखवून परत महागुरूंवर स्थिरावतो. टाळ्या शांत झाल्यावर महागुरू पुढचे वाक्य टाकतात) "कारण जर तुम्हाला तहान लागली आसती तर तुम्ही नक्की फसला आसतात." (टाळ्या.... टाळ्या... वर कुणीतरी सांगितल्याप्रमाण (..... कृपया वरच्या कंसातील वाचावे.... काही फरक नाही)...)

In reply to by आंबोळी

मनस्वी Fri, 04/18/2008 - 11:56
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुध्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
आजुबाजुचे जोरात गोल गोल फिरतंय असं वाटतंय.

In reply to by आंबोळी

मनस्वी Mon, 04/21/2008 - 09:57
बान्देकरांचे संवाद : (एका मुलीने डोळ्यातून पाणी काढल्यावर) आले आले चिमणी लडली.... कावूची गोष्ट सांगू? चिमणी हाशली......
असा गरीब विनोद मारल्यावर समोरची मुलगी बांदेकरला काय करेल..

भडकमकर मास्तर Sat, 05/24/2008 - 03:21
मला महागुरूंबद्दल तीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात... १.बकवास २.बकवास आणि ३.बकवास.. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गुरुनाथ Sat, 06/14/2008 - 11:09
य कार्यक्रमात नाच कमी आणि रडणच जास्त झाल आहे. रोज कोण ना कोण तरी रडत असतो/ती . आणि घरच्याना तेच पहयच असत नाचा पेक्शा.

भडकमकर मास्तर Sat, 06/14/2008 - 16:17
परवा कोण बाहेर जातो बघायला मी म्हटलं ,थोडा वेळ बघूया... तर सचिनजींची बॅटिंग थांबता थांबेना.... "...गेल्या वेळी कसं कोणाला काढलं नाही, या वेळी कसं तसं जमणार नाही, मी कसा तसा स्ट्रिक्ट आहे,..." मग आदेशचा प्रश्न, "कोणी आजारी पडला तर काय? " मग उत्तर, " शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम"...मी कंटाळून उठलो... पण करमणूक मात्र पुष्कळ झाली... मी एक पाहिलंय," ही सगळी कलाकार सेलेब्रिटी मंडळी एकमेकांना आणि महागुरूंना आदर दाखवायची खोटी गोग्गोड ऍक्टिंग छान करतात...".. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

भाग्यश्री Sat, 06/14/2008 - 22:14
ही सगळी कलाकार सेलेब्रिटी मंडळी एकमेकांना आणि महागुरूंना आदर दाखवायची खोटी गोग्गोड ऍक्टिंग छान करतात... अगदी अगदी !! सगळे आदेश बांदेकरच्या बडबडीला तर किती बोर होतात हे त्यांच्या चेहर्यावरूनच कळते.. महागुरूंबद्दल काय बोलावे !! इतका डॉक्क्यात्त कध्धी गेला नव्हता हो तो !!! हा कार्यक्रम करून बांदेकर आणि पिळगावकरांनी होती नव्हती ती प्रतिष्ठा धूळिला मिळवलीय !! हां, पण कार्यक्रम एकदम एन्टरटेनिंग हा!! मी आजकाल करमणूकीचा म्हणून बघत असते मुद्दाम ! :) http://bhagyashreee.blogspot.com/

स्वानन्द Mon, 11/17/2008 - 19:43
भडकमकर मास्तराना व समस्त मि.पा. कराना ......... महागुरू व प्रधान मन्त्री बान्देकर यान्ची बडबड टाळून फक्त मुद्द्याच बघायच असेल तर उत्तम उपाय म्हणजे झी २४ तास वरच पुनर्प्रक्शेपण बघणे. १५ ते २० मिनीटात काम तम्माम!! कशाला ती बडबड ऐका आणि त्यावर डोकेफोड करा!!

आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले... जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे... सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून???

सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३

देवदत्त ·

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 09:45
"अब तो कुछ अच्छा नही लगता रे! अब तो यही अच्छा लगता है की कुछ अच्छा न लगे!" हृषिदांच्या 'नरमगरम' चित्रपटात स्वरूपसंपतच्या प्रेमात पडलेल्या शत्रूघ्न सिन्हाच्या मुखी हा संवाद आहे. नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :)

In reply to by विसोबा खेचर

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:15
नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :) एकदम सहमत. त्याच चित्रपटात ए.के. हनगलने स्वरूप स॑पतच्या बापाचे काम केले आहे..तो आपल्या उपवर मुलीचे वर्णन सारखा 'गले का काटा है, न अ॑दर जाता है॑ न बाहर जाता है॑' असे करतो तेव्हा खूप हसू येते. तसेच त्यातील उत्पल दत्तचे कामही अप्रतिम..तो शत्रूघ्न सिन्हाला 'मै॑ बागवाली कोठी कि तरफ पिशाबभी नहि॑ करू॑गा..' अशी शपथ घ्यायला लावतो तेव्हासुद्धा ह.ह.पु.वा लागते.

नसनखवडी Mon, 04/07/2008 - 11:43
सरपंचाचा पोर म्हनजे काय गावाचा राजा झाला का काय तू? (२-३ थोबाडीत) फुकनीच्या अजून मिसरुड फुटना तुला आणि हुशारी करतोस. आकडा कुनाला लागंल काय? प्रियाली

तात्या विंचू Mon, 04/07/2008 - 12:25
झपाटलेला मधील तात्या विन्चू चा डायलॉग.... ओम भट स्वाहा.... कालच सह्याद्रीवर लागला होता...... - केबल नसलेला..... तो मी नव्हेच...

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:29
चित्रपट आठवत नाही, इतर कलाकारही आठवत नाहीत पण..... लोकेशन - कोर्टाबाहेरच॑ मोकळ॑ पटा॑गण. गाडीमध्ये बसलेला अभिनेता बहुधा वकिल. त्यान॑ नुकत॑च डॅनीला केसमधून सोडवलेल॑ / डॅनीविरुध्दची केस हरलेला. डॅनी त्या वकिलाच्या गाडीच्या टपावर डावा हात कोपरापर्य॑त आडवा ठेवून खिडकीशी झुकलेला. उजव्या मुठीमध्ये चणे. नजरेत अप्रतिम बेदरकारपणा, नजर एकटक वकिलाच्या नजरेत रोखून एक-एक चणा तो॑डात झेलतोय. वकिलः उम्मीद है, इस वारदात से तुम कुछ सिखोगे| सुधर जाओगे | डॅनी (त्याच अप्रतिम मग्रुरीत) : और अगर मै ना कहु॑ त्तो ??? एकदम खल्लास वाक्य! कित्येक दिवस मला ह्या वाक्यान॑ झपाटल॑ होत॑. एकदा तर खुद्द तिर्थरुपा॑ना आम्ही हे वाक्य टाकल॑ होत॑....पुढे आमचा कान कसा सुजला हे वे.सा॑.न.ल. दुसर॑ - चित्रपट : सातच्या आत घरात अभिनेता: निळुभाऊ वाक्यः आपल॑ हॉट्ट फेवरिट... डे॑गळ्या माझ॑ जाकिट आण, जीप काढ ! खर॑ सा॑गायच॑ तर 'सातच्या आत घरात' मधल॑ निळुभाऊ॑च॑ एक अन् एक वाक्य मला जब्बरदस्त आवडल॑ !!!!!

डायलॉगः थँक्स फॉर द कॉम्पिमेंट अभिनेता: डॉ. लागू.. हा डायलॉग मॅनेजर ने जर शिवी दिली तर लगेच उच्चारावा.... चित्रपटः नवरी मिळे नवर्‍याला अभिनेता: अशोक सराफ डायलॉगः मी हुशार आहे बालपणापासून जर कोणी कुत्सितपणाने आपल्याला तु हुशार आहेस असे म्हणाले तर त्यावर हे उत्तर द्यावे... :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:23
डायलॉगः थँक्स फॉर द कॉम्पिमेंट अभिनेता: डॉ. लागू.. हा डायलॉग मॅनेजर ने जर शिवी दिली तर लगेच उच्चारावा....
म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो) करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे. एकदा ही गा॑धीगिरी करुन बघावी म्हणतो. :-))))

In reply to by धमाल मुलगा

म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो) करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे. अहो असाच समज आमचाही होता. पण नंतर माझ्या एका पक्क्या पुणेरी मित्राने आमचे प्रबोधन केले. त्याने सांगितले संताप आणि त्रागा करून काहीही साध्य होत नसते. उलट जास्तीत जास्त शांत राहून विचार करावा की अशा लोकांचा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान कसा करता येईल. त्याला पुणेरी खवचट पणाची जोड द्यावी. मग काय विचारता साहेबा! साहेबही आपल्याशी बोलताना विचार करून बोलेल. समजा मॅनेजर ने त्याला त्याच्या मिटींगसाठी लागणारा डेटा बनवायचे काम आपल्याला दिले तर मुद्दाम त्यात खूप चूका कराव्या. आणि लगेच ते शीट रीव्हीव्यू साठी पाठवावे. त्यात खूप चूका असल्याने मॅनेजर आपल्याला त्याच्या केबिन मधे बोलावून त्या दाखवतो आणि तिथेच लगेच सुधारणा करतो . लगेच साहेबाला म्हणावे की 'तुम्ही मार्गदर्शन करता म्हणून कंपनी चालते आहे नाहीतर अवघड होते"(साहेबाच्या चेहर्‍यावर 'तुझे आहे तुझपाशी' मधल्या शामभैयाच्या चेहेर्‍यावरच्या सारखे भाव दिसू लागतात.). मग लगेच त्यावर म्हणावे 'पण सर या वेळेला कंपनीचा नेट प्रॉफीट कसा काय कमी झाला' (अर्थातच याचे उत्तर याच्यासारखे ओव्हरपेड मॅनेजर असल्यामुळे). साहेबालाही जे कळायचे ते कळते( जर तो सुज्ञ असेल तर अर्थात) परत लोकानाही वाटते कि हा फार वेळ साहेबांच्या केबिन मधे होता आणि साहेबाना काहीतरी सांगत होता. लगेच हापिसात आपले वजन वाढते. अर्थात हे सगळे करण्यासाठी आपले विहीतकर्म नीट करणे हा बेसिक क्रायटेरीया असतो हे ही ध्यानी ठेवावे.. :) :) पुण्याचे पेशवे

प्रगती Tue, 04/08/2008 - 11:21
अहो! आजकाल चित्रपटात पंजाबी भाषा व गाणी यांची ईतकी वाढ झाली आहे की आपली राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 11:45
राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो. ते खरेच आहे.............. पाकिस्तानात पण लोकाना असेच वाटते

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 12:30
राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.
असेलही तस॑. पण आपल्याला मात्र ही भाषा प्रच॑ड आवडते.काय लहेजा आहे ! काय ठसका आहे! ठसकेबाज म्हराठीन॑तर न॑बर लागतो तो प॑जाबीचाच. माझ॑ प॑जाबी गाण्या॑च॑ कलेक्शन ( हि॑दी चित्रपटातली नाहीत, प॑जाबी!) बघून एकदोघा॑नी मला विचारल॑ही होत॑, 'तुस्सी प॑जाबी हो?' त्यातुन बरेचसे दिग्दर्शक, निर्माते हे दिल्ली, प॑जाबकडचे असल्याने असेल कदाचित, त्या॑ना आपल्या 'मातृभाषेविषयी' ओढ जरा जास्त असेल. आपला महेशभौ मा॑जरेकर नाही का, त्याच्या पिक्चर्समध्ये जास्तीत जास्त मराठी माणस॑ घेण्याचा प्रयत्न करतो. जमल॑च तर एखाद॑ मराठी गाण॑ (मोडतोड करुन का होईना), शक्य असल्यास टाकण्याचा प्रयत्न करतो. - धमालसि॑ग भि॑द्रनवाले

अन्या दातार Tue, 04/08/2008 - 12:41
अपहरणचा विषय पहिल्यांदाच निघाला म्हणून त्यातील नानाचे आणखी एक वाक्य आठवले. (नाना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाषण करत असतो तेंव्हाचे) काले करतूतोंकी काली सरकार! गिरा देंगे हम इस सरकार को. यातील गिरा देंगे हे शब्द ज्या ढंगाने म्हणले आहेत, अप्रतिमच. निर्ढावलेपण आणि अभिनय याचा उत्तम वस्तुपाठ.

In reply to by अन्या दातार

देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:54
ह्याच प्रकारे सरफरोश मधील गोविंद नामदेव (वीरन) चे वाक्य. पूर्ण नाही आठवत सध्या. "जबान देने का मतलब जानते हो? अगर नही कर पाये तो मैं तुम्हारी जबान खींच लूंगा. फिर तुम किसी को जान तो दे पाओगे, पर जबान नही दे पाओगे." इथे "जबान खींच लूंगा" ज्या अंदाजात म्हटले ते मस्तच.

केशवराव Tue, 04/08/2008 - 18:04
' चाय बनाओ....... अब मुझे शक्ती चाहिये.' अमिताभच्या एक्स्प्रेशन्स बघत रहाव्या. एक्स्प्रेशन्सचा चाहता ....... केशवराव.

आंबोळी Wed, 04/09/2008 - 12:37
अशोक्,अनुप्,किशोर कुमार जेवण्याच्या टेबलवर....अशोक कुमार किशोर कुमारला समजावत आसतो... अशोक : मन्नू तुने अभी दुनिया देखी नहि है... अनुपः मन्नू अभी तुने दुनिया देखी नही.... अशोक : तूने देखी है?

In reply to by आंबोळी

देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:48
Stop trying to hit me and hit me. He is the one. and Unfortunately no one can be told what the matrix is. You have to see it yourself. तसेच Rush Hour: FBI needs this bike. ह्यावर तो बाईक वाला नाही म्हणतो. तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो. :D

In reply to by देवदत्त

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 23:54
तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो. ख्रिस टकर आहे तो....जॅकी चेन बरोबर त्याने रश अवर १,२ आणि ३ केले आहे.

In reply to by देवदत्त

एक गुरुवार, 04/10/2008 - 00:06
माझ्या अत्यंत आवडीचा पिक्चर.. अजुनही काही डायलॉग.. What is real? Don't try to bend the spoon. Instead try to think there is no spoon, then you know it's not the spoon but you are bending. The rules are similar to the rules in a computer game. Some of them can be bent others can be broken. अतिशय जबरी पिक्चर (३ ही भाग) मी आणि माझा दुसरा एक मित्र मॅट्रीक्स वर बोलून इतरांना जाम बोअर करतो..

अनिकेत Wed, 04/09/2008 - 23:36
सगळ्या डायलॉगांचा बाप. "अ फ्यू गुड मेन" मधे जॅक निकलसन.... You can't handle the truth! Son, we live in a world that has walls. And those walls have to be guarded by men with guns. Who's gonna do it? You? You, Lt. Weinberg? I have a greater responsibility than you can possibly fathom. You weep for Santiago and you curse the Marines. You have that luxury. You have the luxury of not knowing what I know: that Santiago's death, while tragic, probably saved lives. And my existence, while grotesque and incomprehensible to you, saves lives...You don't want the truth. Because deep down, in places you don't talk about at parties, you want me on that wall. You need me on that wall. We use words like honor, code, loyalty...we use these words as the backbone to a life spent defending something. You use 'em as a punchline. I have neither the time nor the inclination to explain myself to a man who rises and sleeps under the blanket of the very freedom I provide, then questions the manner in which I provide it! I'd rather you just said thank you and went on your way. Otherwise, I suggest you pick up a weapon and stand a post. Either way, I don't give a damn what you think you're entitled to. येथे पहा. बस.

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९

स्वाती दिनेश ·

गोट्या Sun, 04/06/2008 - 22:43
वा ! तर जपानला एक भेट द्यावी लागेलच असे वाटत आहे तुमचे प्रवास वर्णन पाहून / वाचून !!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

इतर भागांप्रमाणे हाही भाग सुंदर झाला आहे. जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले. शिर्षकावरुन मला त्या बेटावर काही गुढ आवाज येतो की काय असे वाटले होते असो, चित्रेही तितकीच सुंदर, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 08:19
हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा. वा! क्या बात है! संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. सुंदर वर्णन...! फोटूही नेहमीप्रमाणेच क्लास! तात्या.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 08:34
सुंदर लेखन आणि छान चित्रे,वाचायला मजा आली. कान्साई एअरपोर्ट बद्दल बरेच ऐकले आहे त्या बद्दल जर काही माहिती देऊ शकलात तर फार आनंद वाटेल. जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले. खरयं..... (सुमो कुस्ती प्रेमी) मदनबाण

प्रमोद देव Mon, 04/07/2008 - 08:36
कागीयामासान सारख्या वाटाड्या बरोबर सहल कशी मस्त झालेय. त्यातून सहलीचे आणि परिसराचे रोचक वर्णन करणारे स्वातीचे सिद्धहस्त लेखन, त्याच जोडीला दिनेशने काढलेली उत्कृष्ट छायाचित्रे असा मस्त योग ह्यावेळीही जूळून आलाय. त्यामुळे हा लेखही वाचनीय आणि प्रेक्षणीय झालाय.

सहज Mon, 04/07/2008 - 09:19
अतिशय सुंदर वर्णन, जोडीला ती पुरक छायाचित्रे!! 'कायकोयो ब्रिज' म्हणजे खरच "काय्-आहे-हो पुल'!!!! म्हणावेसे वाटते. लेख अत्यंत आवडला...

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 20:45
प्रकाशचित्रेदेखील. स्वयंशिस्त उल्लेखनीय. मुम्बईत देखील हिरवळीचे घड्याळ आहे हो. हँगिंग गार्डनच्या समोरच्या फूटपाथवर पिकनिक नूक आहे तेथे. याल तेव्हा जरूर पाहा. खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे. हे गद्य आहे की काव्य? झकास. सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:12
मुंबई मध्येही असे घड्याळ आहे ही नवीच माहिती मला मिळाली,पुढच्या ट्रीपमध्ये ते पाहण्याचा जरुर बेत करेन, धन्यवाद,स्वाती

प्राजु Tue, 04/08/2008 - 08:40
प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. स्वाती, किती सुंदर वर्णन केलं आहेस गं. मी समुद्रासाठी वेडी आहे. हे तुझं लेखन मला वारंवार जाणवून देत आहे की, जपानला आयुष्यात एकदा तरी नक्कीच जायला हवं.. किमान या प्रशांत सागरासाठी तरी.... :)) सुंदर चित्रे... वर्णन नेहमीप्रमाणेच शब्दांच्या पलिकडचे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नंदन Tue, 04/08/2008 - 12:42
अर्थात धन्यवाद :). सुरेख चित्रं आणि ओघवत्या वर्णनातून आम्हांलाही जपानची सफर घडवून आणल्याबद्दल. फुलांच्या अंथरलेल्या ताटव्याचा फोटो तर अप्रतिम!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 12:58
धन्यवाद, सांगितल्यावर लवकरच लेख वाचायला दिल्याबद्दल... नेहमीप्रमाणे छान लेखनशैली आहे. फोटो पण छान आहेत. तुझ्या वर्णनावरून तो पर्ल पुल(तुझ्या कल्पनेप्रमाणे) पाहायची खूप इच्छा होत आहे. जर योग आला तर नक्की पाहीन्..किती छान दिसत असेल ना? समुद्राजवळून रोड ची तर मजाच और असते. तुझ्या या जपान च्या प्रवास वर्णनामुळे वाटते कि एकदा तरी तिथे जाऊन यावे...

चतुरंग Tue, 04/08/2008 - 22:34
खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे. हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा. वा वा, बंदिस्त विचारांवरचा 'रुफटॉप' सरकवून वाचतच गेलो! दुसर्‍या चित्रजोडीमधली भातखाचरे आणि फुलांच्या ताटव्यांमागचा निळाशार 'प्रशांत' महासागर बघून डोळे निवले! जपानला भेट द्यायलाच हवी! चतुरंग

ऋषिकेश Sat, 04/12/2008 - 12:04
प्रथम उशीरा प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व! सध्या मुंबईत आल्यापासून जालावर येणं कमी झालंय :(
बाकी सगळीकडे फक्त पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं अथांग,विशाल!
वा! हे वाक्य बॉ फारच आवड्लं . वर्णन नेहेमीप्रमाणे छान. कागीयामासानची मैत्रीही भावली :) मला चित्रांमधे शेवटचं चित्र फारच आवडलं... विशाल लाटांना धैर्यानं सामोरं जाणारं चिमुकल जहाज मनात घर करून गेलं... पुढील भागाच्या प्रतिक्षेत :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:13
राजे,डॉ.साहेब,तात्या,मदनबाण,प्रमोदकाका,सहजराव,बेला,सुधीरजी,प्राजु,नंदन,स्वाती,चतुरंग,ऋषिकेश सर्वांनी आवाजी बेटं आणि फुकुरा बंदर आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वाती

इतिहास

अनिरुद्ध अभ्यंकर ·

ऋषिकेश Sun, 04/06/2008 - 21:06
वा! दमदार गझल
चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने
हे सगळ्यात जास्त आवडलं बाकी गझलही छान. आता कंसातला इतिहास कधी देताय ;) बाकी "लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?" इथे मात्रेची गडबड वाटतेय का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे Sun, 04/06/2008 - 23:10
काय गजल आहे रे अनिरुद्धा... उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने अगदी बरोबर बोललास रे... आता मुडदे काय करतात ते पहायचं... बाकी काहीही म्हण, या मुडद्यांनी आमचा एवढा धसका घेतलाय की,आम्हाला 'त्या' स्मशानात प्रवेश करायलाही मज्जाव केलाय रे! ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? अगदी असंच झालं बघ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

बेसनलाडू Mon, 04/07/2008 - 00:37
सशक्त गझल. यावर आपले बोलणे झालेच आहे, ते पुनरुधृत करीत नाही. गझल फारच आवडली. अशाच उत्तमोत्तम गझला, कविता लिहीत चला. (शुभेच्छुक)बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 07:20
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने वा, क्या बात है! तात्या.

उदय सप्रे Mon, 04/07/2008 - 13:03
अनिरुध्द भाऊ, एकदम "सुरेश भट" यांचा प्रभाव जाणवतोय्.....अप्रतिम !

ॐकार Mon, 04/07/2008 - 13:40
हे शेर खास आवडले- नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने

अविनाश ओगले Mon, 04/07/2008 - 20:02
उत्कृष्ट गझल... नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने एकेक जखम ही पुस्तकाच्या पानासारखी चाळून बघणं ही कल्पना वेगळी.

ठणठणपाळ Mon, 04/07/2008 - 22:03
मस्त गझल. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती दोन्ही साधलं आहे.

मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे होती सताड उघडी गाभ्यात तावदाने गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा गुंतू नये कधीही स्

आठवण...

प्रगती ·

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 08:43
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये हुई ना बात! :) तात्या.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 09:20
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये बात मे दम है..... मदनबाण

Taxonomy upgrade extras
एक आठवण आपल्याला जगवते एक आठवण संपवते एक आठवण जगायला भाग पाडते एक आठवण जीवनातले सारं शोषून घेते आयुष्य नीरस बनवते पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते (कल्पना)

चैत्रामधले मैत्र!

अशोक गोडबोले ·

विसोबा खेचर Sun, 04/06/2008 - 20:43
वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता... वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...! गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा! अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 04/08/2008 - 22:05
अतिशय सुंदर वर्णन. कविता खूप आवडली. शब्दरचना आणि योजना अप्रतिम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्व मिसळपाव सभासदांना चैत्रपाडव्याच्या शुभेच्छा!

काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती

प्रशांतकवळे ·

प्रभाकर पेठकर Sun, 04/06/2008 - 18:51
पावभाजीचा नुकताच जन्म झाला होता तेंव्हा (१९७२-७३) दिवाळीच्या एका विशेष कार्यक्रमात पुलंनी पावभाजीची एक पाककृती सांगितली होती. म्हणजे असेच, उरलेल्या भाज्या, देठ इत्यादी कचरा शिजवून भरपूर बटर घालून भाजी बनवायची आणि अशी ती भाजी पावाबरोबर खाल्ली असता 'मुंबईचा पाव रुचकर लागतो.'

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 11:31
"वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुल देशपांडे...काही हरवलेले वास्.....पुस्तक "नस्ती उठाठेव"...इथे तुम्हाला ते वाचायला मिळेल

चतुरंग Mon, 04/07/2008 - 20:07
पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? हा प्रसंग सतीश आळेकरांनी त्यांच्या 'पु लं नावाचं गारुड' ह्या लेखनात दिला आहे. ह्याबद्दल इथे वाचता येईल. (अवांतर - प्रशांत, आपला आय्.डी. मराठीतून असेल तर जास्त छान वाटेल;) चतुरंग

खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? धन्यवाद प्रशांत

पाडवा पहाट

डॉ.प्रसाद दाढे ·

मदनबाण Sun, 04/06/2008 - 18:24
हे वर्ष मला आणि आपणा सर्वा॑ना असेच स॑गीतमय आणि सुरेल जावो ..!हीच शुभेच्छा! सर्वांना..... (पंडित शिवकुमार शर्मा प्रेमी) मदनबाण

प्रभाकर पेठकर Sun, 04/06/2008 - 18:40
रागदारीतील काही कळत नसलं तरी संतूर ऐकायला खूप आवडते. मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. अगदी खरं आहे. सगळे जग झोपले आहे आणि आपण गच्चीवर, चांदण्यांनी भरगच्च, आभाळाकडे तोंड करून पहुडले आहोत आणि संतूर ऐकत ऐकत, स्वप्न आणि सत्याच्या सीमेवर, ती 'नशा' शरीरभर हळूहळू पसरत आहे असे भासते.

विसोबा खेचर Sun, 04/06/2008 - 20:49
वा दाढेसाहेब! मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत दिला आहे. मीदेखील एकेकाळी शिवजींचं संतूर अगदी मनमुराद ऐकलेलं आहे. असो, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

इनोबा म्हणे Sun, 04/06/2008 - 23:21
मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत हेच म्हणतो... संतूर आणि सतारीचा आवाज आपल्याला जाम आवडतो ... अवांतरः 'पाडव्याची पूर्वसंध्या' झाली,'गुढीपाडवा'झाला आणि 'पाडवा पहाट'ही झाली... आता 'पाडव्याची दूपार', 'पाडव्याची संध्याकाळ'आणि 'पाडव्याची रात्र',राहीली आहे.पाहूया काय होतंय ते. :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 20:10
मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. कडक उन्हातून चालत आल्यावर एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत अ॑गावर गार वार्‍याची झुळूक यावी तसे वाटले. सुरेख वर्णन शिवजी हे खरोखरच मैफीली॑चे बादशहा आहेत. . आपण म्हणता ते खरे आहे. सुधीर कांदळकर.

आज सकाळी प॑.शिवकुमार शर्मा व राहूल शर्मा या॑च्या स॑तूरवादनाने कान तृप्त झाले. तबल्याला प॑.आनिन्दो चटर्जी व पखवाजावर प॑.भवानी श॑कर अशी साथ स॑गत होती. शिवजी॑नी सुरूवातीस 'बसन्त मुखारी' हा राग वाजविला. भवानी श॑करा॑च्या धृपदाने वातावरण असे काही भारून टाकले की प्राचीन शिवम॑दिराच्या गाभार्‍यात रूद्र ऐकतो आहोत असे वाटले.. न॑तरच्या जोड-झालाने वातावरण आल्हाददायक बनले. आनिन्दो चटर्जी॑नी अतिशय नजाकतीने तबल्याची साथ केली. त्यान॑तर शिवजी॑नी भैरवी राग उपशास्त्रीय ढ॑गाने वाजविला. दादर्‍यातील ब॑दिश आणि शेवटी द्रूत त्रितालात समापन केले. स॑तूर हे वाद्यच अतिशय मुलायम आणि 'सूदी॑ग' आहे.