साहित्यः
जुना बासमती तांदूळ - २ वाट्या
लालबुंद टोमॅटो - ५-६ नग
आलं - १ इंच
कढी लिंब - २ काड्या
काश्मिरी मिरची पावडर - १ टी स्पून (अथवा तिखट रंगहीन असेल तर
किंचीत लाल रंग)
मीठ - चवीनुसार.
साखर - चवीनुसार.
तेल - ३ टेबल स्पून
जिरं - १ टी स्पून
बारीक चिरलेली कोथिबीर - सजावटीसाठी.
तयारी:
तांदूळ २०-२५ मिनिटे भिजत टाकावेत.
गॅस वर पाणी उकळवून त्यात टोमॅटो टाकावेत. २-३ मिनिटे उकळवून ते उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या (किंवा साध्या) पाण्यात टाकावेत. गार झाले की टोमॅटोची साले काढून टाकावीत. आणि टोमॅटोचा गर मिक्सर मधून फिरवून गाळून घ्यावा. (पाणी अजिबात घालायचे नाही.)
आलं एकदम बारीक चॉप करावे.
कढीलिंबाची पाने काढून घ्यावीत.
कृती:
तांदूळ निथळवून जेवढ्यास तेवढे पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. शिजलेला भात एखाद्या ताटात पसरवून जरा थड होऊ द्यावा.
कढईत ३ टेबल स्पून तेल (आवडत असल्यास तूप घेतले तरी चालेल) तापवावे. तेल तापले की जिरं फोडणीस टाकावे. जिरं चांगले तडतडल्यावर १-२ सेकंद थांबून (जिरं लाल झाले पाहिजे.) कढीलिंबाची पाने घालावीत. कढीलिंबांच्या पानांचा वास तेलात उतरल्यावर त्यात टोमॅटोचा गर घालून परतावे. त्यात बारीक चिरलेले आले, काश्मिरी मिरची पावडर, मीठ, साखर घालून परतत राहावे. टोमॅटोचा सर्व रस पूर्ण पणे आटला पाहिजे. मिश्रण घट्टसर होत येते. तेल सुटते.
टोमॅटोच्या मिश्रणातील पाणी पूर्ण पणे आटले आहे ह्याची खातरजमा करून त्यावर भात टाकावा. भात नीट परतून त्याच्या सर्वांगास टोमॅटोचा रंग लागला पाहिजे.
चव पाहून मीठ, साखरचे प्रमाण सारखे करावे.
भात सर्व्हींग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरीने सजवावा.
शुभेच्छा....!
टीपा:
टोमॅटो मस्त लालबुंद असावेत.
टोमॅटोचे पाणी नीट आटवून टाकावे. घाई केल्यास आणि पाणी उरले असल्यास भात चिकट होतो. (मोकळा राहात नाही.)
साखरेचे प्रमाण टोमॅटोच्या आंबटपणावर ठरवावे. टोमॅटो गोडसर असतील तर योग्य प्रमाणात लिंबू रस घालावा.
आहा!
वा...
वा!
सुरेख
हे म्हण्जे एकदम झक्कास
सुरेख आणि सोपा
मस्त कृती
पुलाव..
लाल बादशाह!!!
स्वाती
चाखला हो चाखला, टोमॅटो पुलाव चाखला!!
पुलाव
धाडून
पेठकर,
ह्म्म्म्म्म्म्म....
जबरदस्त पाककृती
टोमॅटो राईस..आमची पद्धत!