Skip to main content

फुटबॉल विश्वचषक :२०१४

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 12/06/2014 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु. आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच. मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!

वाचने 43011
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, ओझील, पोडोल्स्की असे एकापेक्षा एक सरस खेळाडू. आक्रमक्र खेळामुळे जर्मनीचे सामने पाहणे अजिबात कंटाळवाणे होत नाही.

आपली टीम काही तिकडे पोचत नाही. इतरांच्या खेळाचाच आनंद घेऊया! माझ्या मुलाचे अजून ३ पेपर्स शिल्लक आहेत. एक उद्या आहे आणि तो रात्री मॅचेस बघणार आहे. तेव्हा मी पण लाथा मारायचा खेळ बघेन म्हणते!

कॉलेज ला बुट्टी?

In reply to by विनायक प्रभू

सर प्रवेश प्रक्रिया चालु आहे, आमच्या प्रवेश समितीचे कामकाज बारा ते पाच आहे. सर्व वर्गास (कला वाणिज्य व विज्ञान) 11 वी ते पदवी पर्यन्त प्रवेश देणे चालू आहे. तज्ञ प्राध्यापक, भव्य इमारत, भव्य ग्रंथालय...भव्य.. :) -दिलीप बिरुटे

सामना सुरु होतोय. स्टेडियम गच्च भरलय !

क्रोएशियान चांगलं आक्रमन केलंय आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोलही केला अतिशय सुरेख असा खेळ क्रोएशिया करतंय. आमचं ब्राझिल चाचपड़तय सालं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल स्वयंंगोल झाला ब्राझीलच्या मार्सेलोकडून.

In reply to by प्रचेतस

या मार्सोलोला काल झोप आली नसती जर पुढचे दोन गोल झाले नसते तर..काल ब्राझीलच्या खेळाडूना उपान्त्य फेरीच्या पराभवाची आठवण झाली असेल. बाकी या मार्सलोला बघितल्यावर सत्यसाईंबाबाची आठवण झाली. चेहरापट्टी सेम आहे :) -दिलीप बिरुटे

नेयमारने पहिला गोल 29 व्या मिनिटाला वतीने नोंदवला... सुरेख.

सेकंड हाफची 20 मिनिटे संपलीत क्रोएशियाच्या उत्तम बचावापुढे ब्राझीलचे मार्कोलो,फ्रेड आणि नेयमार हुल्क ढीले पडले आहेत...ब्राझीलला जिंकायचे असेल तर आक्रमण करावेच लागेल नस्ता क्रोएशिया गोल नोंदवून कधी पुढे जाईल हे ब्राझीलला कळणारही नाही.

ब्राझील जिंकले पण मनं जिंकली ती क्रोएशियानं. शेवटच्या काही सेकंदात क्रोएशियाला संधी मिळाली होती ती गेली आणि शेवटच्या त्या काही सेकंदात ब्राझिलच्या ओस्करने तीसरा गोल नोंदवला. शेवटच्या वाढीव् मिनिटातला खेळ संपला. शुभ प्रभात :) -दिलीप बिरुटे

डोक्याला वाटतंय की स्पेन चं पारडं जड आहे... पण मनाने अर्जेंटिना ला सपोर्ट आहे. मेसी, अग्वेरो, तेवेज, यांचे चमत्कार बघायची इच्छा आहे... ब्राझील ला होम क्राउड चं अ‍ॅड्व्हान्टेज वगैरे असलं तरी शक्यता कमी वाटतेय का कोणास ठाउक. पोर्तुगाल मात्र सरप्राईझ ठरू शकते. काल मॅच बघितली नाही. झोपलो. आज स्पेन ची बघेन.

जर्मनी जर्मनी फक्त जर्मनीच. :)

ब्राझील व जर्मनी यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे. नेदरलँड्स विजेते ठरले तरी आवडेल. कॅमेरूनने १९९० चा चमत्कार पुन्हा एकदा दाखवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

:) :ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे चोळावे लागले. नंतर नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं.

मेक्सिको आणि केमेरून यांच्यात सामना सुरु आहे, खेळाची पाच मिनिटे झाली आहेत, मेक्सिको आक्रमण करतोय पण गोल मधे रूपान्तर करणे दोघांनाही अजुन जमले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पूर्वार्धातला खेळ संपलाय. गोल करण्याची संधी मेक्सिकोलाच जास्त मिळाली पण गोल होऊ शकला नाही. सामना म्हणावं तसा अजूनही रंगेना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मेक्सिकोच्या पेरोल्टाने केला बा गोल. १-० अजूनही गोल झाला तर मेक्सिकोच करेल असे वाटते. क्यामेरुन मधे काय दम दिसेना. अर्थात खेळ उत्तम करेल तो जिंकेल म्हणा. -दिलीप बिरुटे

०-०. हे असले बारके देश पण फायनल्समधे खेळतात आणि आमच्या लोकांना जमत नाय? शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे.

In reply to by पैसा

लवकरच एफ. पी. एल. आपले ते "फूटबॉल प्रीमीयर लीग" चालू होईल.

मेक्सिको चांगले खेळले आणि जिंकले :) शुरा :)

वॅन पर्सीच हेडर खतरनाक. आणि रॉबेनचा गोल तर निव्वळ भिश्क्याव.... ४था गोल कॅसियासने फुकटचा दान केला. पण एकंदरीत flying Dutchmen! *biggrin* स्पेन २०१० मध्ये पण पहिला गेम हरलेले- पण इतका भीषण नाही!

In reply to by भृशुंडी

वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
+१११ स्पेनचा गोलकिपर सुद्धा आ वासुन फक्त बॉलकडे बघतच राहीला. पण एकंदरीत कालचा स्पेन वि. नेदरलँड(हॉलंड) चा सामना रोमहर्षक झाला. मज्जा आली.

युरोपियन देशाची भिशी लावल्याप्रमाणे आपापसात विश्वविजेते पद वाटून घेतात , ह्यावेळी मला हॉलंड ला संधी असल्याचे वाटते. आम्ही नेहमीच सेमी फायनल पर्यंत येतो , त्यामुळे काय होणार ह्याची आधीच माहिती असल्याने डोक्याला नाही तर घशाला त्राण देत घश्याखाली बियर रिचवली जाते. अंतिम सामन्यात आपण नसल्याने बेफिकारीने सामना पाहण्याची मज काही औरच

हेडरचे गोल बंद करायला हवेत .कॉर्नरमधून एकाने चेंडू अगदी जाळीपाशी मारायचा आणि डोक्याने दुसऱ्याने आत घुसडायचा की झाला गोल काही मजा नाही . फक्त डोक्याने चेंडू अडवायची परवानगी हवी . दोन प्रतिस्पर्धी आणि एक गोलाडव्याला चकवत एखादा खेळाडू चेंडू जाळीत हळूच सोडतो ते फार मजेशिर वाटते .आणखी दोन तीन कसबी प्रकारही खेळाची मजा वाढवतात .रेकॉर्डीँग केलेला खेळही बघायला मजा येते .कधीकधी एवढे गूंग होतो की समोर ठेवलेला गरम चहा गारढोण होतो . बॉल सतत दुसऱ्याकडे तटवायचा योग्य वेळ येईपर्यँत चे मर्म जाणणारे तीन चार खेळाडूच(मेसि वगैरे) जिंकून देतात .मीच गोल करीन या विचाराचे असले की पराभव निश्चित .अशांनी टेनिस खेळावे मध्यभागी आडवी जाळी लावलेल्या 'कोर्टात'.

इंग्लंड वि. इटली सामना पहायचा आहे. बघू योग येतो का? लॅटीन अमेरिका आणि युरोप व्यतिरिक्त एकतरी संघ फायनल मध्ये असावा असं वाटतं. (जपान कडे डोळे लावून आहे).

कोलंबिया वि. ग्रीस सामना सुरु होतोय. काय अंदाज नै कोण जिंकेल. पाहात राहु. उत्तम चाली, उत्तम पासेस, असं काहीसं दिसावं. -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर चाल रचुन झालेला पहिला कोलंबियाचा गोल आठव्या मिनिटाला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.

In reply to by प्रचेतस

कोलंबियाचा खेळ ग्रीस पेक्षा कितीतरी पटीने उत्तम होता. कोलंबियाने 3-0 ने ग्रीसला धूळ चारली.

शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.

In reply to by शिद

स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे

दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .

In reply to by कंजूस

*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.

In reply to by रंगोजी

मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.

जर्मनी आणि पोर्तुगल आता थोड्याच वेळात भिडणार आहेत. एक चांगला सामना बघायला मिळावं असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.

जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.

जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ

अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.

In reply to by वेल्लाभट

डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.