सोबत ..... एक किस्सा
एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.
तिच्यासोबतचा संवाद हा असा
“शी!!! देवदास किती बोर. नको जा तुम्ही, मी नाही येनार.”
“ए चल ना काय उगाच नखरे करतेस. आम्ही तुझ्यासोबत तो साइन्स बघितला होताच ना, तो काय कमी बोर होता. आम्हाला एक वाक्य कळले नाही, कुठे सुरु झाला आणि कुठे संपला काही पत्ता लागला नाही.”
“तरी पण देवदास, तो शाहरुख. नको रे बाबा. अरे खरच रे मला हिंदी पिक्चर फार बोर होतात.”
“ए च्यायला, तू जरा जास्तच भाव खातेस. सारे सोबत आहे म्हणून तुलाही चल म्हटले.”
“नको यार. सॉरी”
“नक्की. फायनल”
“हो फायनल. खरे सांगू. मला न माझा साहील सोबत नसला ना तर फार बोर होते रे.”
“मग तुझ्या त्या साहीलला पण सोबत घेउन चल ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय.”
“साहील सोबत असल्यावर मी तुमच्या सोबत का येउ?”
-मित्रहो
www.mitrho.wordpress.com
माझे मिपावरील लिखाण
वाचने
4189
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
साइन्स बघताना साहील होता का ?
In reply to साइन्स बघताना साहील होता का ? by खटपट्या
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री
In reply to अ) साहिल नसेल तर सदर स्त्री by भृशुंडी
उत्तम प्रश्न
अरेरे .. असं उत्तर मिळावं आणि
In reply to अरेरे .. असं उत्तर मिळावं आणि by मराठे
फायदा
मलाच काही कळलं नाहीये का?
देवदास आणि अश्लील चित्रपट
In reply to देवदास आणि अश्लील चित्रपट by तुमचा अभिषेक
आठवणी
In reply to देवदास आणि अश्लील चित्रपट by तुमचा अभिषेक
बस पुढचे मला काही माहीत नाही