✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फुटबॉल विश्वचषक :२०१४

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
गुरुवार, 06/12/2014 - 22:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु. आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच. मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42914 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

अर्जेंटिनाला काय सूधरेना

असंका
Sat, 06/21/2014 - 22:54 नवीन
अर्जेंटिनाला काय सूधरेना इराण्यांसमोर.... 60 मिनटं होउन गेली...0:0
  • Log in or register to post comments

इराण च्या गोल कीपर ला मानला

खटपट्या
Sat, 06/21/2014 - 23:12 नवीन
इराण च्या गोल कीपर ला मानला पाहिजे
  • Log in or register to post comments

मॆऎस्स्स्सीईईइ !!!!!

खटपट्या
Sat, 06/21/2014 - 23:20 नवीन
मॆऎस्स्स्सीईईइ !!!!!
  • Log in or register to post comments

जर्मनी १

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 01:41 नवीन
जर्मनी १
  • Log in or register to post comments

धक्कादायक रित्या घाना ची

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 01:44 नवीन
धक्कादायक रित्या घाना ची बरोबरी
  • Log in or register to post comments

धक्कादायक रित्या घाना चा

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 01:54 नवीन
धक्कादायक रित्या घाना चा दुसरा गोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

उत्तरार्धात सामना रंगतोय. आणि

मधुरा देशपांडे
Sun, 06/22/2014 - 01:51 नवीन
उत्तरार्धात सामना रंगतोय. आणि घाना २.
  • Log in or register to post comments

माझ्या मते घाना विजेता आहे

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 02:25 नवीन
माझ्या मते घाना विजेता आहे
  • Log in or register to post comments

जर्मनी

कंजूस
Sun, 06/22/2014 - 03:45 नवीन
जर्मनी आला आला क्लोस क्लोस आला धावून . अर्जेँटिना केला एकदाचा गोल मेस्सीने . इंग्लंड कधी उजाडायचा तो मंगळवार ?मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा .
  • Log in or register to post comments

हाहाहा

निनाद मुक्काम …
Sun, 06/22/2014 - 10:34 नवीन
हाहाहा कंजूस काका मस्तच घानाच खरा विजेता वैगैरे बोलायची कधी , बोलाचा भात अशी आहे. अजून एक धक्कादायक निकाल लागून अजून एका युरोपियन संघांना परतीचे वेध लागणार ह्या कु शंकेला पूर्ण विराम मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आमचा गरुड ह्यावेळी विश्वचषक आपल्या पंखाखाली घेणार हे नक्की
  • Log in or register to post comments

बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 22:48 नवीन
बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ खेळतायत
  • Log in or register to post comments

मूळात ह्या दोन्ही संघांचे

प्रचेतस
Sun, 06/22/2014 - 22:57 नवीन
मूळात ह्या दोन्ही संघांचे सामने पाहणे म्हणजे बांग्लादेश विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट म्याच पाहण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्

असंका
Mon, 06/23/2014 - 11:00 नवीन
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्....त्यांची कोरीयाबरोबरची मॅचही रटाळ झाली होती. रशियाला अगोदर एकही यलो कार्ड नव्हते. आज मिळाले. आणि उगीचच मिळाले असं मला तरी वाटलं. कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लै भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/23/2014 - 21:25 नवीन
कुणाला तरी यलो कार्ड दिल्याशिवाय आपण काम करतो आहोत हे लोकांना पटणारच नाही असे वाटून त्या रेफेरीने अगदी फालतू टॅकलींगसाठी कार्ड दिले. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मला आठवतंय लहानपणी जो खेळून

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 22:51 नवीन
मला आठवतंय लहानपणी जो खेळून दमला कि त्याला थोडा वेळ गोलकीपर म्हणून ठेवायचे :)
  • Log in or register to post comments

मारला एकदाचा गोल बेल्जीअंम ने

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 23:17 नवीन
मारला एकदाचा गोल बेल्जीअंम ने
  • Log in or register to post comments

जर्मनीच्या गटात नुसती धडपड

कंजूस
Mon, 06/23/2014 - 08:26 नवीन
जर्मनीच्या गटात नुसती धडपड आहे . जर्मनीचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा आपण हरणार तर नाही ना अशा मानसिकतेतून खेळाडू खेळतात .आणि चुकून गोल झाल्यासारखा आनंद दाखवतात .असं का होतं ही चर्चा नेहमी होते .पण निनाद तुझा संघ मात्र चांगला खेळ करतो .उगाच पाडापाडी करणे या गोष्टी करत नाही .प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू काढायचा आगावूपणाही करत नाहीत .अगदी पांढऱ्या टीशर्टातले जेँटलमेन .
  • Log in or register to post comments

हो पण तो म्युलर खूप नाटक करतो

खटपट्या
Mon, 06/23/2014 - 10:44 नवीन
हो पण तो म्युलर खूप नाटक करतो. ऑस्कर द्यायला पाहिजे त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी चपखल विश्लेषण

निनाद मुक्काम …
Fri, 06/27/2014 - 04:45 नवीन
अगदी चपखल विश्लेषण ह्यामागील कारण माझ्यामते असे असावे की मागच्या दोन स्पर्धांच्या मध्ये सुरवातीला आमची गरुडभरारी दणक्यात व जोशात असायची मात्र महत्वाच्या सामन्यात समोरून अवचित आक्रमण झाले कि जोशात होश हरून पराभव मिळायचा म्हणून अब कि बार जर्मन सरकार अशी घोषणा देऊन ताक फुंकून फुंकून पीत आहोत ,मोदी ह्यांनी प्रचार सभांच्या मध्ये जसे जाणीव पूर्वक आक्रमक हिंदुत्व कटाक्षाने टाळले तसे आम्ही कटाक्षाने आक्रमण करणे सुरवातीपासून टाळत आहोत. आक्रमण करण्यापेक्षा बचाव करत अचानक मुसंडी मारायची मग वेळ काढायचा असे धोरण दिसत आहे , सध्या तरी आम्हाला डोईजड होईल असा संघ दृष्टीक्षेपात नाही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

चला आज ब्राझील हरलं नाही म्हणजे मिळवलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/23/2014 - 21:24 नवीन
ब्राझील आणि क्यामेरुन या लढतीत ब्राझीलने ड्रॉवर भर दिला तरी पुष्कळ आहे, पराभव झाला तर लटकून जावू असे वाटते. आमचा ब्राझीलचा झेंडा असल्यामुळे नेयमार गोल करेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्पेन विरुद्ध कांगारूंचा

प्रचेतस
Mon, 06/23/2014 - 22:01 नवीन
स्पेन विरुद्ध कांगारूंचा सामना लै जोरदार चाललाय. आज स्पेननं टोरेस आणि व्हिला हे दोन स्ट्रायकर उतरवलेत. त्यांचे तूफानी आक्रमण चालू आहे. अजून तरी गोल नाही पण झाला तरी हे स्पेनचं वरातीमागून घोडं असेल. आणि हो, हां सामना सोनी पिक्सवर चालू आहे. सिक्सवर डच विरुद्ध चिली.
  • Log in or register to post comments

आणि इनिएस्टाच्या अप्रतिम

प्रचेतस
Mon, 06/23/2014 - 22:08 नवीन
आणि इनिएस्टाच्या अप्रतिम पासवर डेविड व्हिलाचा सुरेख गोल.
  • Log in or register to post comments

उरूग्वे इटली हा महत्वाचा

प्रचेतस
Tue, 06/24/2014 - 21:55 नवीन
उरूग्वे इटली हा महत्वाचा सामना सुरु. सामन्यातला विजेता बाद फेरीत पोहोचणार. इटलीला बरोबरी तर उरुग्वेला विजय आवश्यकच. दूसरा सामना कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड म्हणजे डेड रबर.
  • Log in or register to post comments

इटली बाहेर....

असंका
Tue, 06/24/2014 - 23:50 नवीन
इटली बाहेर.... :-(
  • Log in or register to post comments

चावरे बाबा कि जय

रघुनाथ.केरकर
Wed, 06/25/2014 - 11:29 नवीन
सुआरेझ चावला..... आता त्याच्यावर बन्दी टाकणार का? मागल्या वल्ड कप ला पण बॉल हयांडल केला होता घाना च्या वीरुद्ध
  • Log in or register to post comments

सुआरेझ चावला

असंका
Wed, 06/25/2014 - 16:39 नवीन
सुआरेझ चावला
आणि यडा स्वतःच मैदानात दात धरून बसला होता झायरात करत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

तोंडाला जाळी लावणार ?

कंजूस
गुरुवार, 06/26/2014 - 09:20 नवीन
तोंडाला जाळी लावणार ?
  • Log in or register to post comments

आज गटसाखळीतले शेवटचे चार

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 20:21 नवीन
आज गटसाखळीतले शेवटचे चार सामने. परवापासून बाद फेरी सुरु.
  • Log in or register to post comments

usa आणि जर्मनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/26/2014 - 21:57 नवीन
झुंज चालू आहे,बघताय ना ?
  • Log in or register to post comments

दोन्ही सामने आलटून पालटून

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 22:09 नवीन
दोन्ही सामने आलटून पालटून बघतोय. पुर्तुगेजांनी घानावर एक गोल चढवलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला सोनी सिक्सवर एकच म्याच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/26/2014 - 22:32 नवीन
मला सोनी सिक्सवर एकच म्याच दिसतोय दुसरा म्याच कोणत्या च्यानलवर बघताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दूसरी म्याच सोनी पिक्सवर आहे.

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 22:36 नवीन
दूसरी म्याच सोनी पिक्सवर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मनीच्या मुल्लरने उसगावावर

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 22:48 नवीन
जर्मनीच्या मुल्लरने उसगावावर एक गोल मारलाच. मुल्लरचे आता मेस्सीसह ४ गोल.
  • Log in or register to post comments

क्रिस्टियानो रोनाल्डोने शेवटी

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 23:13 नवीन
क्रिस्टियानो रोनाल्डोने शेवटी एकदाचाएक गोल मारला ब्वा. पुर्तुगेज - घाना २-१ जर्मनी - उस १-०
  • Log in or register to post comments

आता मस्त किस्सा झाला

निनाद मुक्काम …
Fri, 06/27/2014 - 04:55 नवीन
आता मस्त किस्सा झाला मला भुयारी रेल्वे मध्ये हवेत तरंगणाऱ्या काही जर्मन यक्ष व याक्षिनींचा थवा दिसला , आपल्या देशाच्या नावे जयजयकार करत असतांना त्यांच्या डब्यात मी एकटाच मिपा वाचत बसलो होतो तेव्हा एका यक्षाने मजला ,तू का नाही आनंद साजरा करत आहेस , तू कोणत्या देशाचा आहे असे विचारले , साहेब फुल फॉर्मात होते , त्याच्या खेळीमेळीच्या प्रश्नावर मी गंभीरपणे उत्तर दिले , मी अफगाणी आहे आणि अमेरिका हरल्याचा आनंद तुमच्या इतका मला सुद्धा झाला आहे , आम्ही नि तुम्ही त्यांना हरवले आहेत फक्त मैदाने वेगवेगळी आहेत , यक्षाचे इमान धाडकन खाली आले नि बिचारा गोरामोरा झाला.
  • Log in or register to post comments

नशीब की तरंगिणी अवस्थेत

यशोधरा
Fri, 06/27/2014 - 07:34 नवीन
नशीब की तरंगिणी अवस्थेत त्याने काही हातापायी केली नाही - पर्टिक्युलरली तुम्ही अफगाणी म्हटल्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा

निनाद मुक्काम …
Fri, 06/27/2014 - 16:17 नवीन
आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा दिवशी पोलिसांचे जथ्थे मोक्याच्या जागी तैनात असतात विडीयो केमेरे सर्वत्र कार्यरत असतात त्यामुळे हजारोंच्या संख्यने पुरुष महिला . युवक ,युवती व कुमार कुमारी रस्यावर आंनद साजरा करत असतांना सुद्धा बेशिस्त वर्तन होत नाहीत , त्यात तालिबान , अलकायदा ह्यांच्या संबंधी येथील जनतेला चीड येण्यापेक्ष्या भीती जास्त वाटते , माझ्याशी संवाद साधलेल्या अनेकांनी त्यांना जर्मन सैन्य अफगाण मध्ये काय करत आहे ह्याची कल्पना असल्याचे सांगून त्यांना तेथे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे कारण ह्यामुळे अफगाण निर्वासित त्यांच्या देशात येतात फुकट सारे सुख सुविधा जर्मन सरकार कडून मिळवून परत येथील समाज व्यवस्थेला नावे ठेवतात , म्हणूनच ह्यांच्याशी संबंध नको अशी बहुसंख्य लोकांची धारणा आहे , माझ्याशी हातापायी करण्याची शक्यता मा कमी वाटली कारण माझ्या कडील बेगेत नक्की काय आहे ह्याची त्याला खात्री नव्हती एखादे शस्त्र , किंवा अजून काही सगळ्यात महत्त्वाचे मी थंड नजरेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य बोललो , माझी शरीरयष्टी किरकोळ असली तरी जिव्हा चांगलीच कडक आहे , तेव्हा अनेकदा बोल बच्चन वर काम निभावून जाते. आणि मुळात २० एक वर्षाचा मुलगा , सोनेरी केसाची मधाळ चेहऱ्याची मैत्रीण बाजूला ह्याच्या कवेत असतांना ह्याला माझ्याशी संवाद साधण्याची दुर्बुद्धी कशी झाली ह्याचे मला नवल वजा राग आला. अपने काम से काम रखो भाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू

कंजूस
Fri, 06/27/2014 - 09:48 नवीन
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू आला खाली बैंडमास्तर चालले घरी . रोना रोना ना रोनाल्डो . अर्जेँटिना मेस्सीने चौघांच्या डोक्यावरून उडवलेल्या अफलातून चेंडूने चकवले . फाडू गोल . इकडे हॉटेलात नवीन डिश "मेस्सी मेस्सी "आली आहे . आपले कुवेतमधले शेफ वल्ड कपसाठी काय आंब्याची करामत करतात ते बघू .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा