Skip to main content

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

भटकंती कर्नाटकातली

लेखक कंजूस यांनी बुधवार, 11/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत.

हिंदु अस्मितेचा उदय

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 10/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram… आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे .

दुखरी नस...!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 10/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही...

दाखला

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 10/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)

पडद्या मागची व्यथा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रंगविले मुखवटे अनेक स्वत:चा चेहरा मात्र रंगविला न कधी. तालावर नाचविल्या मंचावर कठपुतळ्या नाचायला मला मिळालच नाही. मान नटसम्राटाचा मिळतो बाहुल्यांना दंश पराजयाचा मलाच का मिळावा. पडद्या मागची व्यथा कळेल का कुणाला रंगमंचावर मिळेल का कधी मान सूत्रधाराला.
काव्यरस

पर्यावरणाची ऐशी तैशी!

लेखक मीराताई यांनी सोमवार, 09/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.

भेट

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 09/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते. " राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दूताने वर्दी दिली. " आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता. " हो !" " कोण आहे ?" " नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !" राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती. काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली.

अनप्रेडीक्टेबल भाग्यश्री...!!

लेखक वटवट यांनी सोमवार, 09/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही….