मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गे...माय...आता...थकली...ग...

डॉ. दत्ता फाटक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
p1 p2

वाचने 3912 वाचनखूण प्रतिक्रिया 10

आयुर्हित 13/06/2014 - 00:35
माहेरची प्रेमळ माणसे भेटणे म्हणजे केवळ स्वर्गसुखच. खरीखुरी आनंद यात्रा घडली! सर्वांच्या नशिबी असेच प्रेम सदैव मिळत राहो हिच त्या परमेश्वराला प्रार्थना.

लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल माहेराची वाट, माहेराची ओढ, सासुरवाशीणीच्या मनांत माहेराचे स्थान वगैरे वगैरे भावनांवर बहिणाबाई चौधरींनी फार उत्कट कविता केली आहे. त्या कवितेतीलच वरील दोन ओळी. डॉ. दत्ता फाटक ह्यांची ही कथा अगदी रसरशीत, भावनांनी ओथंबिलेली आणि डोळ्यांत टचकन पाणी आणणारी झाली आहे. अभिनंदन.

चौकटराजा 20/06/2014 - 11:27
जुन्या जमान्यातले गायक जी एन जोशी यानी " स्वरगंगेच्या तीरी" नावाचे आत्मनिवेदनपर पुस्तक लिहिले. होते. त्यात मराठी भावगीत विश्वात " माहेरा" चा संचार कसा झाला याचे मस्त वर्णन आहे. काही गीते या धाग्यामुळे आठवू लागली. माझीया माहेरा जा..-..... जाणार आज मी माहेराला....ओटी भरा गं घाल घाल पिंगा वार्‍या..... भेटाल का कोणी माझ्या माणसाना माहेरीच्या ... रुण्झुन्त्या पाखरा जा माझ्या माहेरा....