फुटबॉल विश्वचषक :२०१४
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु.
आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच.
मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
![]() |
वर्गीकरण

प्रतिक्रिया
अर्जेंटिनाला काय सूधरेना
इराण च्या गोल कीपर ला मानला
मॆऎस्स्स्सीईईइ !!!!!
जर्मनी १
धक्कादायक रित्या घाना ची
धक्कादायक रित्या घाना चा
उत्तरार्धात सामना रंगतोय. आणि
माझ्या मते घाना विजेता आहे
जर्मनी
हाहाहा
बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ
मूळात ह्या दोन्ही संघांचे
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्
लै भारी
मला आठवतंय लहानपणी जो खेळून
मारला एकदाचा गोल बेल्जीअंम ने
जर्मनीच्या गटात नुसती धडपड
हो पण तो म्युलर खूप नाटक करतो
अगदी चपखल विश्लेषण
चला आज ब्राझील हरलं नाही म्हणजे मिळवलं.
स्पेन विरुद्ध कांगारूंचा
आणि इनिएस्टाच्या अप्रतिम
उरूग्वे इटली हा महत्वाचा
इटली बाहेर....
चावरे बाबा कि जय
सुआरेझ चावला
तोंडाला जाळी लावणार ?
आज गटसाखळीतले शेवटचे चार
usa आणि जर्मनी
दोन्ही सामने आलटून पालटून
मला सोनी सिक्सवर एकच म्याच
दूसरी म्याच सोनी पिक्सवर आहे.
जर्मनीच्या मुल्लरने उसगावावर
क्रिस्टियानो रोनाल्डोने शेवटी
आता मस्त किस्सा झाला
नशीब की तरंगिणी अवस्थेत
आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू