मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यक्तिचित्रण

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

कविराज

गबाळ्या ·
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

गाज २

अबोली२१५ ·
लेखनप्रकार
गाज१ http://www.misalpav.com/node/41462 विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला. गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली "काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज" "आर ! मी वाडीच्या ह्या टोकास्नी .

गाज

अबोली२१५ ·
लेखनप्रकार
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला.

!! श्रद्धांजली !!

जागु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

आबा (क्रमश)

शेवटचा डाव ·
लेखनप्रकार
आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय त्यातील भाग एक तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
      "दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या  बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
 दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा ·
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.