Skip to main content

व्यक्तिचित्रण

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चिरंजीव रॉक्स

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 10/06/2017 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १ (पर्यावरण दिनानिमीत्त)

लेखक मंजूताई यांनी गुरुवार, 08/06/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!

लाल दिवा . . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 29/05/2017 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
होय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . . मी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . . दुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . "टोल"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . . गाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . . माझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . . जनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . . आजूबाजूला कायम लवाजमा . . .

अण्णारती- विरहखंड भाग १

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
येई हो अण्णा रे माझे माऊली ये । कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।। आलिया गेलिया कोणी धाडी निरोप । कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।। काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला । घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।। अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी । अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/04/2017 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही. पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल.

फुत्कार

लेखक संदीप-लेले यांनी बुधवार, 29/03/2017 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिशोब ठेवता येणार नाही इतकी घरं मागे टाकून ती अवघड व्यक्ती प्रवास करते आहे. आतापर्यंतच्या प्रवासात अनेक दो-या तिच्या नाळेला जोडल्या होत्या. अनेक दिशांनी त्या दोऱ्या तिची नाळ खेचत आणि विवशतेने ती व्यक्ती त्या अगम्य शक्तींच्या निर्हेतुक खेचाखेचीत, नाळ तुटणार नाही अशा दिशेने फरफटत जाई. ती धूर्त व्यक्ती, हळूहळू एकेक दोरी कापत, आता अशा स्थितीत आहे की आपण फरफटतो आहोत याचे भान सुटले आहे. काळसर्पावर विजय मिळवल्याचा सामान्य मानवी उन्माद, तीव्र प्रकाशाने अधू झालेल्या तिच्या नजरेत गर्वाने फडकतो आहे.