मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . . आतातरी जरा शुध्दीत बोल . . . . शुध्दीत बोल . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

वाचने 25893 वाचनखूण प्रतिक्रिया 31

गॅरी ट्रुमन Tue, 07/11/2017 - 16:31
जबराट. काव्य वगैरे माझा प्रांत नाही म्हणून मिपावरील कविता वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही. या कवितेच्या शीर्षकावरून कविता नक्की कोणावर असणार याचा अंदाज आला आणि थोडी घाबरतच कविता बघितली. आणि ती प्रचंड आवडली :)

कानडाऊ योगेशु Wed, 07/12/2017 - 08:18
कविता आवडली. परंतु भाजपा केंद्रातच ठिक आहे. भाजपाचे राजकारण गुजरात धार्जिणे आहे त्यामुळे महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपा झाले तर अवघड आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण उ.ठा शिवाय पर्याय नाही.

सुज्ञ Wed, 07/12/2017 - 12:02
उधू ची भाषा भारी .. भारी शास्ताखान ,वाघनखे ,तलवारी .. तलवारी मुंबईत तुंबल्या गटारी. . गटारी विकासाच्या नावाने बोंबाबोंब .. बोंबाबोंब उद्धू .. तू माझ्याशी गोड बोल . गोड बोल

चौथा कोनाडा Wed, 07/12/2017 - 17:18
:-)))) भन्न्नाट जमलंय ! इस्को बोल्ते, करंट ट्रेण्डको कॅच करना ! आता मिपावर असल्या विडंबन गाण्याची स्पर्धा घ्यावी ! कंपूंनी त्याचे व्हिडो करुन पाठवावेत ! मिपाकट्टा मंग जबर्दस्त रंगेल :-)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

श्रीगुरुजी गुरुवार, 07/13/2017 - 15:38
या कवितेत मला तरी काही इश्यू दिसत नाही. ही कविता एक साधी वात्रटिका आहे. यापेक्षा जास्त विनोदी विडंबने रोज माध्यमातू प्रसिद्ध होतात ज्यात पुढार्‍यांची मनसोक्त खिल्ली उडविलेली असते (उदा. 'सकाळ'मधील ढिंग टांग). या कवितेत बदनामीकारक, अश्लील, बीभत्स असे काहीही नाही.

वरुण मोहिते गुरुवार, 07/13/2017 - 15:42
तुम्ही अमित शहा किंवा मोदींवर एक कविता करा ना . माझ्या नावाने प्रसिद्ध करतो . मस्त हसण्यासारखी .

एस Sat, 07/15/2017 - 16:20
एकच नंबर! मूळ आरजे मलिष्काचे गाणेही भारी आहे. खरेच बृहन्मुंबई महापालिकेला लाज वाटली पाहिजे. दर वर्षी तीच नालेसफाईची नाटके, तेच रस्त्यांवरचे खड्डे आणि तोच गेंड्याच्या कातडीहून निर्ढावलेपणा.

एस Wed, 07/19/2017 - 10:27
शिवसेनावाले आता त्या आरजे मलिष्काच्या मागे हात धुवून लागले आहेत असे दिसतेय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिच्या घरी म्हणे डेंग्यूच्या अळ्या सापडल्या! आत्ताच बऱ्या सापडल्या?

कंजूस Wed, 07/19/2017 - 13:47
दुसय्रांची व्यंगचित्रे काढतात त्यांना स्वत:ची व्यंगचित्रे का आवडत नाहीत? चक्क भडकतात. विरोधी मतही खपत नाही. जहांगिरच्या फोटो प्रदर्शनात पाहिलं आहे .