मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

ये,बैस ना जराशी...

सत्यजित... ·
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

सत्यजित... ·
बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

ती उत्तर मागत नाही...

सत्यजित... ·
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!

घराला मनांचा उबारा करु!

सत्यजित... ·
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु!

नजरोंको चुराकर वो...

सत्यजित... ·
नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं

और भी आसार बाकी है

drsunilahirrao ·
आखरी हथियार बाकी है (और मेरी हार बाकी है ) खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है लूट भी लोगे तो क्या लोगे यह पुरा संसार बाकी है डॉ. सुनील अहिरराव (हिंदीतील पहिला प्रयत्न)

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

सत्यजित... ·
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

पाखरे

संदीप-लेले ·
भावनांना नेहमी का आवरावे आणि अर्ध्यातून सारे का हरावे धार का लागे तिच्या दो लोचनांना काय त्याला हे कळावे बारकावे चूक होते त्यात काही गैर नाही मान्य ती त्याने करावी मोठ्या मनाने एकदा त्याने तरी माघार घ्यावी नेहमी मागे तिनेची का सरावे डाव आहे दोन वेड्या पाखरांचा दोन वेड्या पाखरांनी सावरावे एक रडता एक का हसतो कधी हो रुद्ध झाल्या पाखराला हासवावे हासता हातात घ्यावा हात त्याने ना पुन: होणार आता आर्जवावे

न किसी की ऒख का नूर हूं

शरद ·
न किसी की ऒख का नूर हूं न किसी की ऒख का नूर हूं न किसी के दिल का करार हूं, जो किसी के काम न आ सके मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१. मेरा रंग रूप बिगड गया मेरा यार मुझसे बिछड गया जो चमन खिजॉ से उजड गया मै उसी की फस्ले बहार हूं ---२ पा-ए-फातहा कोई आये क्यो कोई चार फूल चढाये क्यो कोई आ के शम्मा जलाये क्यू (जफर अश्क कोई बहाये क्यु) मै तो बेकसी का मजार हूं ---३ मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा मुझेम सुन के कोई करेगा क्या मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा मै बडे दुखों की पुकार हूं ---४ न तो मै किसी का हबीब हूं न तो मै किसी का रकीब हूं जो बिगड गया वो नसीब हूं जो उजड गया वो दयार हूं ---५