ये,बैस ना जराशी...
काव्यरस
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!
कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!
येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
—सत्यजित
वाचने
10782
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
आहाहा! क्या बात! तुमच्या
In reply to आहाहा! क्या बात! तुमच्या by प्राची अश्विनी
खूप-खूप धन्यवाद प्राची अश्विनी!
वा छान च.
वा छान च.
In reply to वा छान च. by चष्मेबद्दूर
मनःपूर्वक धन्यवाद चष्मेबद्दूर
मस्तच
In reply to मस्तच by सौन्दर्य
धन्यवाद!
कातिल!
मस्त गझल....
(No subject)
In reply to (No subject) by जेनी...
ह्म्म
वा वा क्या बात!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!क्या बात है... क्लास!झकास! !
धन्यवाद!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
आज अजून एक शेर सुचला...
In reply to आज अजून एक शेर सुचला... by सत्यजित...
मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा
In reply to मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा by रुपी
ऐन्यात
अप्रतिम खूपच छान.
मस्त!
"आलीस ना छतावर झटकून केस ओले?
मस्तं!
मस्त गझल!
धन्यवाद!
आवडली
गझल आवडली
धन्यवाद!