ती उत्तर मागत नाही...
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा
मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा!
मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी
ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
ती जाता सहजच म्हणते,'स्वप्नात आज मी येते'
हलकेच झोपही माझ्या,डोळ्यावर येते तेंव्हा!
सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी
निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा!
हे आता उमगत आहे,माझीच गझल आहे 'ती'
ती उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा!
—सत्यजित
वाचने
2822
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सोसून कसा सोसावा! हा भार
In reply to सोसून कसा सोसावा! हा भार by जेनी...
मनःपूर्वक धन्यवाद जेनी!
व्वाह! मजा आ गया.
In reply to व्वाह! मजा आ गया. by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!
धन्यवाद!
सुन्दर! जरि उत्तर मागत नाही
In reply to सुन्दर! जरि उत्तर मागत नाही by अनन्त्_यात्री
उसवून काळजाला,छिद्रे हजार