घराला मनांचा उबारा करु!
नको तेच ते तू दुबारा करु
हवा देउनी मज निखारा करु!
भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या
पुन्हा पावसाला इशारा करु!
नको मोकळे केस झटकून तू
इथे चांदण्याचा पसारा करु!
खुले केस पाठीवरी सोड ना
खुळ्या मोगऱ्याचा पिसारा करु!
तुझ्या पाउली चंद्र उतरेल तो
कसा मी मला सांग तारा करु!
सखे लाट अनिवार होवून,ये
अता थेंब-थेंबा किनारा करु!
शमावी क्षणातच जिथे वादळे
घराला मनांचा उबारा करु!
—सत्यजित
वाचने
3519
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
व्वाह! फंटॅश्टिक!
In reply to व्वाह! फंटॅश्टिक! by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!
(No subject)
In reply to (No subject) by जेनी...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद! by सत्यजित...
ह्म्म
अहाहा!! अप्रतिम कविता..
सुंदर!
सुरेख!
धन्यवाद!