Skip to main content

धर्म

अतींद्रिय अनुभव : डॉक्टरांची तडजोड आणि भ्रूणहत्या

लेखक सत्या सुर्वे यांनी गुरुवार, 17/08/2017 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर सदाभाऊ मराठवाड्याच्या एका दुर्गम म्हणाव्या अश्या भागांत दाखल झाले आणि काही दिवसांनी मी सुद्धा दाखल झालो. सदाभाऊ हे घोरपडे घरातील द्वितीय मुलगे. प्रचंड श्रीमंती घरी वास करत असली तरी सदाभाऊ ना त्यांची काहीही पर्वा नव्हती. ते आधी डॉक्टरकी शिकायला गेले, तिथे एक मुलीच्या प्रेमात पडले आणि वडिलांच्या विरुद्ध जाऊन घरजावई म्हणून ह्या गावांत दाखल झाले. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहून एखादा चांगला कारकून पाठवण्याची विनंती केली होती. घोरपडे घराण्यात मी कामाला होतो पण दुय्यम दर्जाचा दिवाणजी म्हणूनच. मला दुर्गम भागांत इच्छा जरी नसली तरी पूर्णपणे सारा कारभार माझ्याच हातांत राहील म्हणून मी हि नोकरी पत्करली.

जोसेफिना आणि जेनचे किडनॅप

लेखक सत्या सुर्वे यांनी शुक्रवार, 11/08/2017 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट १९८७ सालची आहे. आम्ही एक नवीन बिल्डिंग बांधायला घेतली होती. पोलीस ठाण्याच्या पुढेच होती. कंत्राटदार केरळी नायर होता आणि बहुतेक कामगार ओरिसा मधील होते. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच जोसेफिना ह्या ख्रिस्ती महिलेचे घर होते आणि तिला जेन नावाची एक सुमारे १५ वर्षांची मुलगी होती. जोसेफिनाचा पती दुबई मध्ये कमला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. जोसेफिना अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि जेन वर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणून सर्वाना ठाऊक होती.

अतींद्रिय आणि भुताटकीचे अनुभव : ठेवलेली बाई

लेखक सत्या सुर्वे यांनी बुधवार, 09/08/2017 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यप्रदेश मधील घटना आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनी साठी सरकारने जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु केली आणि नेहमी प्रमाणे शेतकरी, बिल्डर, राजकारणी ह्यांचा गोंधळ सुरु झाला. अश्यांत एका आमदाराच्या फार जवळच्या माणसाचा खून झाला. प्रकरण CBI कडे गेले आणि मी जुनिअर ऑफिसर म्हणून मध्यप्रदेशला गेले. महिला ऑफिसर म्हणून मला जास्त बाहेर जाऊन काम करावे लागत नसे. बहुतेक वेळी महिलाचे स्टेटमेंट घेणे, पोलिसांच्या सोबत बसून त्यांच्याकडून माहिती घेणे आणि रिपोर्ट्स लिहिणे असाच माझा दिनक्रम असायचा. केस इतकी किचकट होती कि जवळ जवळ ५०० लोकांचे स्टेटमेंट घेणे जरुरीचे होते. (नो किडींग).

अतींद्रिय अनुभव - 1

लेखक सत्या सुर्वे यांनी शनिवार, 05/08/2017 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुस्लिम मुलगा अचानक वडिलांच्या बदलीमुळे एका १००% हिंदू गावांत पोचतो. तिथे त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात. पुढे काय होते ?

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

लेखक मार्गी यांनी शनिवार, 29/07/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.

टाईमलाईन---- हिंदू ते निधर्मी होण्याची!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 16/07/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
बाल्यावस्था( वय १० ते १३)------ धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत.

दुहेरी ब्राह्मण ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/07/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
लेख प्रस्तावना: ग्राहकाच्या दृष्टीने सहसा एका चांगल्या विक्रेत्याकडून असलेली अपेक्षा, ग्राहकाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विक्रेत्याने योग्यते मार्ग दर्शन आणि साहाय्य करावे अशी असते. पण प्रत्यक्षात एस्कीमोंच्या गळ्यात फ्रीज, टकल्याच्या गळ्यात कंगवा लटकवणारा, मातीस सोने म्हणून विकणारा किंवा आधी तर्कसुसंगत समजावून द्या, समजले नाही तर पैसे द्या (करप्ट करा) आणि तेही शक्य नसेल तर ग्राहकास कन्फ्यूज करणारा तो विक्रेता अशा प्रकारची इमेज जनमानसात उभी रहाण्यास बाकी समाजा सोबत बहुतांश विक्रेते स्वतःही जबाबदार असतात.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

वारी हो वारी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 23/06/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

भाग ३ श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 11/05/2017 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
। ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नमः । भाग ३ अध्याय १, ओवी ४३ ते ७७ जेवणाअखेरी आपण जसे डेझर्ट घेतो तसा गुरुमहिम्याचा गोड घास हेमाडपंतांनी मंगलाचारणाच्या शेवटी ठेवला आहे. गुरुकृपेचा नवलावा वर्णन करताना त्यांच्या वाणीला अधिकच गोडवा आला आहे. 'मै तेरा तू मेरा, भाव यही दृढ हो' हे हेमाडपंतानी आचरणात उतरवलं आहे. हेमाडपंत म्हणतात की सद्गुरु आपल्याला मोक्षाकडे कसा नेईल तर 'ढकलत नेईल'. आई जशी लेकराचं कल्याण करणारच मग लेकराची इच्छा असो किंवा नसो!