Skip to main content

धर्म

युगांतर- आरंभ अंताचा!

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 19/07/2019 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

अभंग...

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 15/07/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||
काव्यरस

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

सरमद कशानी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 10/05/2019 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
कशानी हे मराठी क्रियापद नाही भारतात आलेल्या एका इराणी अवलीयाचे नाव आहे. 'सरमद कशानी' भारतात येऊन प्रेमळ आणि उदार भारतीय सम्राट औरंगजेबाने फाशीवर चढवलेला एक इराण मार्गे आलेला अर्मेनियन नग्न अवलिया होता. मूळचा कदचित ज्यू असून मुस्लिम धर्म स्विकारून त्यागला अथवा सोबतच राम - लक्ष्मण स्विकारले, व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली. काव्य स्पिरिच्युआलीझम मध्ये त्याला रस असावा. पण धर्मांधतेला प्रखर आव्हान देण्याचा स्वभाव असावा.

धर्म, विज्ञान आणि दुय्यम सत्ये

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 26/04/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या. शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आहे. (इथे कोणताही विशिष्ट धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही संकल्पना असं म्हणायचं आहे.) असं मला का वाटतं याकडे नन्तर येतो.

श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 16/04/2019 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपुर्वी व्हॉट्सप्प वर एम मीम आलेला. असे काही डेरिव्हेटीव्ह्स, इन्टिग्रल्स, पार्शियल डिफरन्शियल एक्वेशन चे चित्र होते आणि खाली मेसेज होता की - "कॉलेज संपुन १० वर्षे होत आली पण अजुनही ह्याचा उपयोग काय ते कळलेले नाहीये ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " वगैरे वगैरे. मी म्हणालेलो " तुम्हाला उपयोग करता येत नाही ह्याचा अर्थ उपयोगच नाही असा होत नाही" त्यावरुन मोठ्ठा वाद झाला ग्रुपवर . . तेव्हा एक मित्र म्हणालेला- " अरे तू इतके सीरीयसली का घेतोस? विनोद विनोद म्हणुन का घेऊ शकत नाही ? " तेव्हा त्या मित्राला म्हणालो - " कारण त्यात विनोद असा काही नाहीये, त्यात केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे.

अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/04/2019 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥ _________________________________/\________________________________ हे सारं स्वान्तःसुखाय आहे. आपल्याला कोणाला काही पटवून द्यायचं नाहीये की कोणाचं काही मत खोडून काढायचं नाही. कोणाला वाटेल हे सारं टनाटनी आहे , कोणाला वाटेल हे अज्ञानमुलक स्वात्मरंजन आहे ! असो , आपला आता कोणताच अभिनिवेश नाही , खरेतर आहेच हे स्वात्मरंजन!

नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने

लेखक माहितगार यांनी शनिवार, 23/03/2019 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा. ( जे माझे लेखन प्रथमच वाचताहेत त्यांच्यासाठी मी सर्वधर्मीय आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या चांगल्या बाजू आणि मर्यादा दोन्हीचीही या पुर्वी वेळोवेळी दखल घेऊन झालेली आहे.