आज बुद्ध पौर्णिमा
त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्या,
विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या
तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन.
आपलाच मनोबा.

आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.